एकूण 6914 परिणाम
डिसेंबर 15, 2018
उल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा फ्लेक्स झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रमोद पंडित असे संबंधित तरूणाचे नाव असून, तो कॅम्प नंबर 4 मधील...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने त्या स्क्रॅप झाल्याचा निष्कर्ष तपासणी पथकाने काढला आहे, अशी माहिती समितीचे सभापती तुकाराम मस्के यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, या संदर्भातील निकाल आठ...
डिसेंबर 15, 2018
पुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावांमधील लोकसंख्येचा विचार करण्यात आला नाही, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी यांनी सांगितले. तेव्हाच, लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता आणि गरज याबाबतचा सविस्तर...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...
डिसेंबर 15, 2018
पुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून डिसेंबरअखेर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील मतदान केंद्रे, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये...
डिसेंबर 15, 2018
सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होत.  भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९६६ च्या तुकडीचे अधिकारी असलेले...
डिसेंबर 15, 2018
येवला - बोकटे येथील भैरवनाथ महाराज यात्रेसाठी आरक्षित पाणी पालखेड डावा कालव्याला सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी द्यावे अशी मागणी अंदरसुल, बोकटे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर धोरण्याच्या निषेधार्थ तिरडीवर एका शेतकऱ्याला झोपवून...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने आखले आहे. गुरुवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ते मंजुरीसाठी ठेवले आहे. नवीन धोरण मंजूर झाल्यास अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या संस्था व...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 14, 2018
नांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला घाटीच्या आतदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 14) पहाटे अडीचच्या सुमारास ती दगावली. शीतल साईनाथ कीर्तिकर असे मृत मुलीचे नाव...
डिसेंबर 14, 2018
सोलापूर : स्मार्ट सिटीचे आकर्षण बनलेल्या होम मैदानावर कोण प्रातर्विधी किंवा घाण करणार असेल तर त्यांना आता सावध व्हावे लागेल. जे कोण घाण करेल त्यास लाठीचा प्रसाद देण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यासाठी होम मैदानावर पोलिसांचा स्वतंत्र तंबू असणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिस...
डिसेंबर 14, 2018
कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू अशताना...
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
अकोला - गर्भपाताच्या गोळ्या अवैधरीत्या विकणाऱ्या संध्या रमेश चांदेकर हिला येथे सापळा रचून अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी (ता. 13) दुपारी 12 वाजता अकोला येथे टॉवर चौकात...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल १२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. आठ महिन्यांत २४ लाख ७१ हजार विनातिकीट प्रवासी आणि परवानगीपेक्षा जादा वजनाचे सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच रेल्वेने गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १३ कोटींचा जादा...
डिसेंबर 14, 2018
सातारा - जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व खासगी रक्तपेढ्यांतून रक्त मिळण्यात येणाऱ्या अडचणी जिल्ह्यातील थॅलेसिमीयाच्या रुग्णांच्या जिवावर बेतत आहेत. समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या समन्वयाने त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी रुग्णालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून यावर तातडीने तोडगा...
डिसेंबर 14, 2018
वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे. गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी...