एकूण 79 परिणाम
डिसेंबर 12, 2019
नाशिक ः शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राच्या धोरणास अनुसरुन जुलै 2017 मध्ये गटशेतीच्या योजनेला भाजपच्या राज्य सरकारने मान्यता दिली. 2017-18 मध्ये 196 गटांना मान्यता देण्यात आली आणि 2018-19 मध्ये 200 गटांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. कृषी विभागाच्या कारभारात योजनेचा वेग संथ राहिला. 400...
डिसेंबर 12, 2019
नांदेड : पीएम किसान योजने अतंर्गत जिल्ह्यातील तीन लाख ९१ हजार ७३८ पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. परंतु, यातील दोन लाख ५६ हजार नावे आधारनुसार नसल्यामुळे शेतकऱ्यांची स्वत: अथवा सीएससी केंद्राच्या माध्यमातुन ते दुरुस्त करावे लागणार आहे. अन्यथा अशा शेतकऱ्यांचा लाभ तात्पुरत्या...
नोव्हेंबर 15, 2019
नगर : ""सरकार स्थापनेसंदर्भात महाशिवआघाडीत चर्चा सुरू आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती व शेतकऱ्यांच्या विकासाला गतिमान करणारे स्थिर सरकार लवकरच राज्यात स्थापित होणार आहे,'' असा विश्‍वास रोहित पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.  आमदार पवार यांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात...
नोव्हेंबर 14, 2019
अमरावती : जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये अवेळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या मदतीतून वरुड तालुका पूर्णपणे हद्दपार झालेला आहे. सर्वेक्षणात नुकसानच समोर न आल्याने वरुड तालुक्‍याला मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे, तर मोर्शी तालुक्‍याला सर्वात कमी मदत मिळण्याची चिन्हे आहेत. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर...
नोव्हेंबर 12, 2019
कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांची "कृषिधन' या बियाणे कंपनीकडून फसवणूक झाली आहे. दर्जेदार बियाण्यांच्या नावावर कमी दर्जाचे भेसळयुक्त बियाणे मिळाले आहे. त्यातून पिकात लोंब टाकण्याची, गर्भ पकडण्याची व उंचीची तफावत जाणवत आहे. पिकात मोठ्या प्रमाणात "खेड' (कमी दर्जाचे पीक)...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे - राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची यंदा पावसाने पूर्ण वाताहत केली. सोयाबीन पीक नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६० टक्क्यांवर किमान नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे किमान २२ हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत....
नोव्हेंबर 06, 2019
पुणे - सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. यातील सुमारे ९० हजार एकरवरील बागा १०० टक्के वाया गेल्याचा दावा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने केला असून कृषी विभागाने ५० हजार एकर द्राक्ष बागा नष्ट झाल्याचे म्हटले आहे. सर्व हंगामाचा विचार करता द्राक्ष...
नोव्हेंबर 05, 2019
नारायणगाव - जुन्नर तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. हवामानातील बदलाची माहिती आगाऊ मिळावी, यासाठी तालुक्‍यात दहा किलोमीटर अंतरावर एक हवामान केंद्र उभारण्याचा पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येईल, अशी ग्वाही कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले. अवेळी पावसामुळे तालुक्‍यात द्राक्ष, डाळिंब,...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेत असते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्या निर्णयांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जे समाजाच्या हिताचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिताच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मात्र जास्त रस घ्यायचा, असे अधिकाऱ्यांचे धोरण आहे. हे उलटे...
सप्टेंबर 11, 2019
३७० रद्द केल्यामुळे काश्‍मिरी शेतकऱ्यांची भावना; अभ्यासदौऱ्यासाठी पुण्यात आणणार पुणे - डोंगरउतारावर असलेल्या आमच्या शेतावर सफरचंद, भाजीपाला, सुक्‍यामेव्याची शेती केली जाते. मात्र, बाजारपेठेला जोडणारे रस्ते आणि शेतीपूरक उद्योगांच्या अभावामुळे आमचे मोठे नुकसान होते. कलम ३७० हटविल्यामुळे आता प्रक्रिया...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कृषी विभागाने जोरदार झटका दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित मिश्रखताचा पुरवठा केल्याबद्दल सहकारमंत्र्यांच्या कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमंगलवर कडक कारवाई करायची की नाही, याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून कृषी खात्यात...
ऑगस्ट 21, 2019
फुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व मालक यांच्याविरुद्ध फुलंब्री, वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खत निरीक्षक तथा फुलंब्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या...
जुलै 19, 2019
नाशिक - वाळूच्या लिलावातील ‘मलिदा’ हा विषय एकीकडे चिंतेचा असतानाच दुसरीकडे पर्यावरण आणि कररूपाने मिळणाऱ्या महसुलाचा प्रश्‍न कायम राहायचा. आता मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय नियमांचे बंधन आले असून, पर्यावरण नियंत्रण समिती गुगल मॅपिंगद्वारे वाळूच्या उपलब्धतेची खात्री करून घेतली जाते. या...
जून 25, 2019
मुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली. जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन...
जून 12, 2019
नाशिक - आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांच्या शिफारशींसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे....
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शेतकरी आणि शेतमजूर उभा राहत नाही, तोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था मंद गतीने चालत राहील. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून सत्यक्रांती केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : कृषी आयुक्तालयात लाखो रुपयांचा मलिदा दिल्यानंतरच निविष्ठा परवाने देण्याऱ्या भ्रष्ट परंपरेचा जुनाट आणि भक्कम साखळदंड अखेर तुटला आहे. परवाने वाटपातील ‘मानवी हस्तक्षेप’ पूर्णतः बंद करून शेतकरी उद्योजक व कंपन्यांना एक मार्चपासून थेट ‘ऑनलाइन’ परवाने मिळणार आहेत.  ‘अग्रोवन’मधून गुण नियंत्रण...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने दडपून ठेवलेल्या परवान्यांचे वितरण करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी थेट आयुक्तालयावर धडक दिली. परवाने वाटल्याशिवाय हलणार नाही, असे सांगत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी संचालकांच्या दालनात  ठिय्या दिल्यामुळे अधिकारी हादरले...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - निवृत्तीला अवघे तीन आठवडे उरले असतानाच विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या गळ्यात पुणे येथील क्रीडा व युवक कल्याण आयुक्‍तपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांच्या जागी धडाकेबाज कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर यांची नियुक्‍ती करण्यात...