एकूण 10 परिणाम
October 29, 2020
औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने राज्यभरात मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सरकारविरोधात दंड थोपटून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शहराच्या दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री तथा पालकमंत्री...
October 20, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोचले आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहीमेच्या सर्वेक्षणातून विविध आजारांची लक्षणे असलेल्या एक लाख लोकांची माहिती प्राप्त झाली आहे. त्या लोकांच्या प्राधान्याने तातडीने आटीपीसीआर चाचण्या करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी...
October 17, 2020
औरंगाबाद : नवरात्रोत्सवास शनिवारपासून (ता.१७) प्रारंभ होणार आहे. घराघरात मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यासाठी शुक्रवारी (ता.१६) घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.    मराठवाड्यातील...
October 09, 2020
औरंगाबाद : शहरासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ५५ दिवसांमध्ये १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. मात्र, आघाडी सरकारला केवळ निविदा अंतिम करण्यासाठी ३६५ दिवस लागतात, हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. यासंदर्भात डीपीडीसीच्या बैठकीत...
October 06, 2020
औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६९ टक्के झाले आहे. उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना खाटा वाढवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात ८०० खाटांची वाढ झाल्याची माहिती अपर...
September 29, 2020
औरंगाबाद : कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरू असून, वेगवेगळ्या किमतीत हे इंजेक्शन विकले जात आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. रुग्णांची फरफट थांबावी आणि इंजेक्शन योग्य किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी ही इंजेक्शन अन्न-औषध प्रशासनाच्या देखरेखी खाली एकाच...
September 26, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यात पडणाऱ्या सरासरी पाऊसापेक्षा १६० टक्के जास्त पाऊस झाला आहे. आज कन्नड तालुक्यातील काही गावात  प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहाणी केली. यात बऱ्याच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतात पणी सचले,काही ठिकाणी दलदलची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे...
September 18, 2020
औरंगाबाद ः कोरोना काळात रुग्णांची ने-आण करण्यासाठी महापालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय व त्यांच्या पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पुढाकर घेत रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्याला महापालिकेतील...
September 17, 2020
औरंगाबाद ः मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर विकास प्राधिकरण झाले पाहिजे, यासाठी औरंगाबाद विकास प्राधिकरणाचा विचार व्हावा. विकासच्या पोकळ गप्पा न होता तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. १७) व्यक्त केले. यंदा चांगला पाऊस झाला...
September 15, 2020
औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. महिनाअखेर शासकीय आणि खासगी अशा सर्व रूग्णालयांत एक हजार ८०८ पर्यंत खाटांची वाढीव उपलब्धता होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोविड केअर सेंटर खासगी...