एकूण 7631 परिणाम
February 23, 2021
मुंबई- आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या आयुषमान खुराणानं सोशल मीडियावर एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने आपल्या नव्या चित्रपटाविषयी सांगून प्रेक्षकांना गोड बातमी दिली आहे. तो पुन्हा अभिनव सिन्हा यांच्याबरोबर काम करणार असून त्या चित्रपटाचं नाव अनेक असे आहे. या दोघांची...
September 23, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेचं प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूडमधील एक अभिनेत्याचाही समावेश आहे. टाइमच्या यादीत भारतीय लोकांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एड्सवर संशोधन करत...
January 12, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये स्टार पदापर्यंत पोहचायचे झाल्यास पाठीशी कुणाचा हात असावा लागतो. थोडक्यात कुणी गॉडफादर हवा असतो हे आतापर्यंतच्या बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांच्या करिअरवरुन दिसून आले आहे. आजही इंडस्ट्रीमध्ये असे कलाकार आहेत ज्यांच्य़ामागे गॉडफादर आहे. मात्र असे काही अभिनेते आहेत ज्यांना कुणाच्याही...
September 16, 2020
जीवनावश्‍यक वस्तू कायदा रद्द करण्यासह विविध निर्णयांची घोषणा करून शेतकरीहिताचे ढोल पिटणाऱ्या सरकारने कांद्याचे भाव वाढताहेत म्हणताच निर्यातबंदीचे नेहेमीचे अस्त्र वापरले. कांद्याच्या प्रश्‍नाचे दुष्टचक्र अद्यापही कायम असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे. आधीच कोरोनाच्या साथीमुळे पिके बाजारात नेता न...
September 26, 2020
बिहारचे राज्य कॉंग्रेसने गमावले, त्यास यंदा 30 वर्षे पूर्ण होत असतानाच, कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या निवडणुकीत तेथील जनता पुन्हा आपले राज्यकर्ते निवडण्यासाठी सज्ज आहे. या तीन दशकांच्या काळात काही महिन्यांचा अपवाद वगळाता, नितीश कुमारच 15 वर्षे मुख्यमंत्री होते. मधल्या आठ-दहा...
September 29, 2020
‘म्हातारा न इतुका, की अवघे पाऊणशे वयमान!’ अशा पंक्‍ती सत्तरी ओलांडल्यावरही एका षोडषवर्षीय कन्येशी लग्न करू पाहणाऱ्याची टर उडवण्यासाठी ‘शारदा’ नाटकात नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिल्या होत्या. त्यास आता शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली, तरी भारतीय काही आपले सरासरी वयोमान पाऊणशेपर्यंत नेऊ शकलेले...
October 07, 2020
‘कोरोना’च्या सावटाखाली होणाऱ्या देशातील पहिल्या मतदानाला अवघे तीन आठवडे उरले असतानाच, बिहारच्या राजकारणाला  एक नवेच परिमाण मिळाले आहे. त्यामागे अर्थातच भाजपची खेळी आहे. भाजपच्या या खेळीतील प्रमुख खिलाडी ‘लोकजनशक्‍ती पक्षा’चे केंद्रात मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान हे...
October 08, 2020
स्वातंत्र्यानंतर १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुका प्रचंड बहुमताने काँग्रेसने जिंकल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब झाले. त्यानंतर पुढची सलग १२ वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळली. इंदिरा गांधी यांनीही पंतप्रधानपदाची धुरा १५ वर्षें वाहिली. मात्र,...
October 10, 2020
अमेरिकी कवयित्री लोइस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल सन्मान जाहीर झाला, तेव्हा जगभरातले साहित्यवर्तुळ काहीसे स्तिमित झाले असणार. कारण हे नाव तसे अनपेक्षितच म्हटले पाहिजे. गेली काही वर्षे बंडखोर, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने मुखर होणाऱ्या कविश्रेष्ठांकडेच नोबेल पुरस्काराचा मान चालून जाताना...
October 27, 2020
शिवसेनेच्या गेल्या पाच-साडेपाच दशकांच्या इतिहासात यंदाचा दसरा अनेकार्थांनी आगळा-वेगळा होताच; शिवाय त्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि ‘पक्षप्रमुख’ असा डबल रोल करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जणू फटाक्‍यांच्या हजाराच्या माळा लावून आसमंत दणाणून सोडला. शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याचे एक वैशिष्ट्य...
October 30, 2020
कोरोनाच्या सावटाखाली देशात प्रथमच होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी केवळ पार पडले असे नाही, तर ५४ टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी आपला कौल ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त केला. मतदानाची ही टक्‍केवारी २०१५ मधील विधानसभा आणि त्यानंतर २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा...
November 24, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधत ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेचे धोके समजावून सांगितले आणि आपल्याला पुन्हा ठाणबंदीच्या दिशेने जायचे नाही, अशी ग्वाहीही दिली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन देण्याआधीच्या काही तासांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, येत्या आठ...
November 28, 2020
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरील नेपथ्य गेल्या वर्षी दिवाळीनंतर आरपार बदलून गेले! दिवाळीच्या चार दिवस आधी लागलेल्या निकालांनंतर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार येणार, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच हवे, असा आग्रह धरला. भाजप काही तो हट्ट पुरविण्यास...
December 01, 2020
भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याच राज्यात भाजपला चंचूप्रवेशही करता आला नाही....
December 02, 2020
समुद्रमंथनात हाती लागलेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे कल्पवृक्ष, तो देवादिकांनी लांबवला. तो हस्तगत करून देवाधिदेव इंद्रदेवाने मेरूपर्वतावरील नंदनवनात रुजवला. इच्छेचे फळ देणाऱ्या या कल्पतरूसाठी दानवांनीही प्रचंड संघर्ष केला, अशा आख्यायिका पुराणात सापडतात. आख्यायिकाच त्या... इच्छा फलद्रुप करणारा...
December 03, 2020
ऊर्मिला मातोंडकर या १९९० च्या दशकात तरुणाईवर गारुड करणाऱ्या गुणी अभिनेत्रीने अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे मुंबईतील अवघे ‘बॉलिवुड’ उत्तर प्रदेशात खेचून नेण्यासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबापुरीत ठाण मांडून बसले असतानाच, एक ‘स्टार’ अभिनेत्री शिवसेनेत जाते, एवढ्यापुरती ही...
December 04, 2020
आपल्याकडच्या दाहक जातवास्तवाने एका मोठ्या समूहाचे मानवी हक्क पायदळी तुडवलेच; आणि अर्थातच सामाजिक सौहार्दातही अडसर निर्माण केले. अगदी आधुनिक काळात आणि शिक्षणाचा सर्वदूर प्रसार झाल्यानंतरही मनामनांत ठाण मांडून बसलेल्या जातीविषयक धारणा उखडल्या गेल्या नाहीत. त्यामुळेच त्या घालवण्यासाठी सर्वतोपरी...
December 05, 2020
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ने शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील पाचही जागा जिंकल्यामुळे राज्यातील जनतेने या सरकारला दिलेली ही वर्षपूर्तीची भेटच म्हणावी लागेल! खरेतर या मतदारसंघांची मानसिकता ही सर्वसाधारणपणे विरोधी उमेदवारांच्या बाजूची असते आणि त्याहीपेक्षा...
December 26, 2020
अवाढव्य उद्योग-व्यवसाय किंवा कंपन्या चालवत बसणे, देवाधर्माच्या क्षेत्रात उठाठेवी करणे, चित्रपटांसारख्या क्षेत्रात उतरणे, ही सरकारी कामे आहेत का, असा प्रश्न अनेकदा चर्चिला जातो. काही सुजाणांच्या मते ही सरकारची कामेच नाहीत, सबब हे आतबट्ट्याचे उद्योग थांबवून ते ते क्षेत्र व्यावसायिकांच्याच हाती सोपवणे...
November 25, 2020
स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वतःचे नगरविकासाचे नियम असले, तरी राज्यातील शहरांच्या विचका झालेल्या रचनेचा तोंडवळा पाहिला, की ही शहरे नेमकी कुठल्या रचनेच्या चौकटीतून आरेखली गेली आहेत, असा प्रश्न पडतो. आजवर नगरविकासाच्या नियमांचे सुसूत्रीकरण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला. मात्र, हे प्रयत्न त्या-...