एकूण 4329 परिणाम
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली...
जून 24, 2019
नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल पुणे - नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज मोठा पल्ला गाठत राज्याचा जवळपास निम्मा भाग व्यापला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा...
जून 23, 2019
नाशिकः डॉक्‍टरांची काहीही चुक नसताना बेशिस्तपणे, झुंडशाहीने त्यांना मारहाण केली जाते. लाठ्याकाठ्या घेऊन डॉक्‍टरांसोबतच दुसऱ्या रूग्णांनाही त्रास दिला जातो. तोडफोड केली जाते. या प्रकारांमुळे आजचा सुशिक्षित, सेवाव्रती डॉक्‍टर निष्कारण भरडला जात आहे. त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे. अशा डॉक्‍...
जून 23, 2019
औरंगाबाद : शहराची पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आता समांतर ऐवजी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. आचार संहितापुर्वीच यांची मंजुरी केली जाणार आहे. या विषयी मंत्रीमंडळाच्या विस्तरांनंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली आहे. अशी माहिती उद्योग, खाणीकर्म, अल्पसंख्याक विकास, वक्‍...
जून 23, 2019
डोणगाव : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील मेहकर तालुक्यात बोलेरो-कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघे जागीच ठार झाले. हा अपघात अंजनी बु. नजीक आज (रविवार) पहाटे चार वाजता झाला. या अपघातील मृतक औरंगाबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.  औरंगाबाद येथील क्षीरसागर कुटुंबीय नागपूर येथे आपल्या...
जून 23, 2019
लासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) - ‘शेतकऱ्यांना नाडाल, तर पीकविमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे दिला. पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, यासाठी लासूर स्टेशन येथे शिवसेनेचे राज्यातील पहिले पीकविमा मदत केंद्र...
जून 23, 2019
औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात...
जून 22, 2019
आता पाकिस्तानवर होणार 'फायनान्शियल स्ट्राईक'...व्हिडिओकॉनच्या 6000 कर्मचाऱ्यांना नाही 10 महिन्यांपासून वेतन...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - चक्क मुख्यमंत्री शाळेत झोपले चादर टाकून! - चारा, कोळशानंतर आता झाला कंडोम...
जून 22, 2019
औरंगाबाद: व्हिडिओकॉन समूहाचा औरंगाबाद येथे सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. मात्र सध्या या प्रकल्पात कर्मचाऱ्यांचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती आहे. मागील तब्बल 10 महिन्यांपासून व्हिडिओकॉनच्या कर्मचाऱ्यांचे त्यांचे वेतन मिळालेले नाही. या कारखान्यातील कामकाज जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे...
जून 22, 2019
औरंगाबाद : पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस बरसला असून, मोठ्या खंडानंतर पाऊस आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.  बीडमध्ये ९.४ मिमी पावसाची नोंद बीड : जुन महिन्याच्या सुरुवातीला...
जून 22, 2019
मुंबई - वर्धापन दिन धडाक्‍यात साजरा केल्यानंतर शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे अधिक घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्रभरात एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या नियुक्‍त्या येत्या ११ दिवसांमध्ये करण्याचे निर्देश शिवसेना भवनात...
जून 21, 2019
परभणी - शहरातील दत्तधाम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकून खून करणाऱ्या दरोडेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. शांतीवर कॉलनीतील ऋषीकेश वासुदेव चक्रवार यांच्या घरी 30 मे रोजी रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदून ठेवला आहे. परिणामी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे आणि न्या. आर. जी....
जून 20, 2019
औरंगाबाद - महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्‍लबतर्फे देशातील पहिले "इल्युजन म्युझियम' अर्थात "मयसभा' तयार करण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर, केंद्र समन्वयक धनश्री कासार-अक्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे सचिव...
जून 19, 2019
औरंगाबाद : "प्रत्येक क्षेत्र रिस्क असते पोलिस क्षेत्र महिलांसाठी अजिबात रिस्क नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची यंत्रणा त्यांच्या भल्यासाठी काम करते, पोलिस क्षेत्र महिलाबरोबर पुरुषासांठी एक फॅन्टास्टिक जॉब आहे. या क्षेत्रात महिलांनी यावेत. कारण एखाद्या प्रश्‍नाला तोंड देताना ती परिस्थिती हातळण्याची...
जून 19, 2019
औरंगाबाद : रूढी-परंपरांना बगल देत नंदनवन कॉलनी येथील प्रधान-खैरे कुटुंबीयांनी मंगळवारी (ता. 18) मुलांच्या साक्षगंध सोहळ्यात तृतीयपंथीयांचा संविधानाची प्रत देऊन सत्कार केला व सामाजिक समतेचा संदेश दिला.  माजी नगरसेवक बंडू प्रधान व उषा प्रधान यांची मुलगी सांची व डॉ. भास्कर खैरे व डॉ. प्रभा खैरे यांचा...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात आली आहे. त्यानुसार...