एकूण 107 परिणाम
जानेवारी 29, 2019
गडहिंग्लज - बदलती जीवनशैली आणि आहारातील बदलामुळे मुलांना जन्मजात विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हृदयाच्या संबंधित आजाराचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष शालेय आरोग्य तपासणीतून उघड झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात तब्बल अशा १२१ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत....
जानेवारी 19, 2019
बारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित झाले. या कृषिक प्रदर्शनात आज नांदेड, गडचिरोली, हिंगोली, परभणीपासून अगदी सातारा, कोल्हापूर, चंदगड, बेळगाव,...
जानेवारी 12, 2019
आजरा - आजरा-चंदगड तालुक्‍याच्या जंगल परिसरात चार हत्तींचा कळप वावरत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस, मेसकाठी यासह विविध पिकांचे कळप नुकसान करीत आहे. या आठवडाभरात कळपाने उसाचे मोठे नुकसान केले. पोळगाव (ता. आजरा) येथील जानबा गुडुळकर यांचे एरंडोळ रस्त्यानजीक असलेल्या शेतातील उसाचे...
जानेवारी 11, 2019
चंदगड - इसापूर (ता. चंदगड) येथे वाघाच्या हल्यात म्हैस ठार झाली. बुधवार ते गुरुवार (ता. 9, 10) दरम्यान ही घटना घडली. गावातील सुरेश गवस यांनी बुधवारी सकाळी आपली अकरा जनावरे चरण्यासाठी जंगलात सोडली होती. सायंकाळी त्यापैकी केवळ दहा जनावरे घरी परतली. म्हैस परत आली नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी...
जानेवारी 03, 2019
चंदगड -  येथील ग्रामंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबतची अधिसूचना आज राज्य शासनाच्या नगरपंचायत विभागाने प्रसिध्द केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आदेशाची प्रत चंदगडच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केली. गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, शिवाजी पाटील, नामदेव पाटील,...
डिसेंबर 31, 2018
निपाणी : महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकावर एका मनोरुग्णाने ब्लेड सह धारदार वस्तू नी जीवघेणा हल्ला केल्याची घटना निपाणी येथील हालसिद्धनाथ कारखान्याजवळ रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाळवे मळ्याजवळ घडली. या हल्ल्यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना  ...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - कोल्हापुरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिश्‍चन धर्मीयांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि...
नोव्हेंबर 11, 2018
ढेकोळी (ता.चंदगड) - येथे जंगलालगतच्या शेतात आज बिबट्याने एका बकरीवर हल्ला करून तिला ठार मारले. pic.twitter.com/b80tEFuAWK — sakal kolhapur (@kolhapursakal) November 11, 2018 याबाबत मिळालेली माहिती अशी की सटुप्या बेचार बेळगुंदकर आज सकाळी बकरी चारण्यासाठी शेतात गेले होते. जंगला लगतच शेत असल्याने...
नोव्हेंबर 01, 2018
चंदगड - जंगमहट्टी (ता. चंदगड) धनगरवाड्यावर दोन मोठे आणि दोन लहान हत्तींचा वावर असून काल रात्री त्यांनी काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. ऐन सुगीच्या हंगामातच हत्तींचा कळप इथे दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. धनगरवाड्यावरील पाणवठ्यावरही हत्तींच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे...
ऑक्टोबर 31, 2018
कर्नाटकातील हत्तींनी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करून आता दीड दशकाचा कालावधी उलटला. गवे, रानडुक्कर यांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे हत्तीच्या रूपाने मोठे संकट उभे राहिले. हत्तीने महाराष्ट्रात प्रवेश केला, तोच मुळी एका महिलेचा जीव घेऊन! त्यानंतर कलिवडे येथील एका वृद्ध शेतकऱ्याचा दुसरा बळी गेला...
ऑक्टोबर 11, 2018
स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनावरील अंधश्रद्धेच्या दबावाखालील सामाजरचनेत वावरणाऱ्या देवदासी व जोगता हे घटक आजही उपेक्षित आहेत. अशा घटकांना या अनिष्ट रूढी-परंपरेतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगू देण्यासाठी ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीद्वारे देवाला मुलगी किंवा मुलगा सोडण्याची प्रथा...
ऑक्टोबर 06, 2018
चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या...
ऑक्टोबर 04, 2018
असळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे. चंदगड, आजरा, राधानगरी, बोरबेटमार्गे टस्कर हत्ती १९ मे रोजी गगनबावडा तालुक्‍यात आला...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर -‘‘आम्ही चकाट्या पिटत गावातल्या कट्ट्यावर बसलेलो असायचो. एखादी ट्रॅव्हल बस आम्हाला बघून वेग कमी करायची. डोळ्यावर किंवा डोक्‍यावर गॉगल असलेला एकजण बसमधून उतरायचा. ‘इकडे बघायला काय काय आहे’, असे आम्हाला विचारायचा. आम्ही हौसेने त्याला सांगत राहायचो; मग तो आमच्यातल्या एकाला ‘चल येतो का?...
ऑगस्ट 29, 2018
कोल्हापूर - दीड महिन्यांहून अधिक काळ सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरला झाला आहे. पाण्याने साचलेली शिवारे व डोळ्यादेखत कुजणारी पिके असे विदारक चित्र प्रथमदर्शनी जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आहे. गगनबावडा, पन्हाळा, आजरा, चंदगड, गारगोटी तालुक्‍यांत पिकांची वाताहत झाली आहे. हमखास...
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर - जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने आज दिलेल्या माहितीनुसार, राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २० फूट पाच इंच आहे. राधानगरी गेट नंबर तीन, चार, पाच, सहा अशी चार गेट खुली झाली; तर विसर्ग ७३१२ क्‍युसेकनेच सुरू आहे. गेली सलग तीन महिने पाऊस सुरू आहे. आजही पावसाची...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
ऑगस्ट 05, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का? नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का?  होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का?  नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...
ऑगस्ट 02, 2018
चंदगड - तालुक्‍याच्या कर्नाटक सीमेवरील कलिवडे ते बिदरमाळ हा सुमारे पंधरा-वीस किलोमीटरचा जंगल परिसर वाघाच्या दहशतीखाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत वाघाकडून चार जनावरांवर हल्ला झाला असून, जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्थानिक धनगर समाजातील पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे.  ऐतिहासिक किल्ले...