एकूण 153 परिणाम
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 16, 2019
नवी दिल्ली : पाच वर्षं झाली त्या गोष्टीला.. 'इथे मित्रपक्षांचे कडबोळे घेऊनच सत्ता चालवावी लागते' या गृहीतकाला छेद देणारा निकाल भारतीय जनतेने दिला, त्याला आज बरोबर पाच वर्षं पूर्ण झाली. सकाळपासून निकाल लागण्यास सुरवात झाली.. 'ट्रेंड्‌स' पाहून विश्‍लेषक, राजकीय पक्ष आणि माध्यमांची बोटे तोंडात गेली...
मे 15, 2019
प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 12, 2019
नवी दिल्ली : बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधान केले होते. दरम्यान, ढगाळ हवामानाबाबतच्या विधानाची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी...
मे 10, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने क्रिकेटपटू गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गंभीरने त्याचा डुप्लिकेट मोटारीवर उन्हात उभा केला होता आणि स्वत: मोटारीत बसल्याने तो चर्चेत आला आहे. गंभीरच्या...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 07, 2019
मुंबई: महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून दिलासा देण्यात आला असून वाढता दुष्काळ पाहता राज्याला 2160 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून...
मे 07, 2019
नवी दिल्ली : भारताच्या पाच खलाशांचे नायजेरियातील चाच्यांनी अपहरण केले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. शिवाय, नायजेरीयातील भारतीय उच्चायुक्तांना या खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. स्वराज यांनी ही बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून,...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...
मे 07, 2019
सोसायटीतील वॉचमन केवळ प्रवेशद्वारावरचा चौकीदार नसतो, तो असतो त्या सोसायटीतील प्रत्येकाचा जवळचा कुणीतरी. अनिलमामा आमच्या सोसायटीचे वॉचमन होते. दिवसभर त्यांची ड्युटी. अपार्टमेंटची झाडलोट किंवा इतरही कामे, सभासदांसाठी दिलेले निरोप, नोटिसा वगैरे करून ते प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या टेबल खुर्चीशी येऊन बसत...
मे 06, 2019
भादोही (उत्तर प्रदेश) : "महामिलावटी'त सहभागी असलेल्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या संपत्तीचा गुणाकार करण्यासाठी केला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर आजही हल्लाबोल केला.  येथील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सप-बसप-रालोद...
मे 05, 2019
प्रतापगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत....
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 03, 2019
पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर या...
मे 02, 2019
जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे चौकीदारांची रांग...
मे 02, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 12 वीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर केला. केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा मुलगा जोहरने ही परिक्षा पास करत 94 टक्के गुण मिळवले आहेत. मुलगा पास झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपला आनंद ट्विटरवर व्यक्त केला. स्मृती इराणी यांनी ट्विट करत म्हटले...
मे 02, 2019
रायबरेली : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चक्क विषारी सापांशी खेळण्याचा अनुभव घेतला.  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्या सध्या प्रचार करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या प्रियांका यांनी रायबरेली मतदारसंघात...
मे 01, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी वापरलेली "चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्याच कायदेशीर अडचणी वाढविणारी ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशांना आपण चुकीच्या पद्धतीने मांडले असल्याचे खडे बोल न्यायाधीशांनी राहुल यांना सुनावत...