एकूण 318 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...
जून 26, 2019
पुणे : घरी जेवण करत असताना कमी जेवण पडल्याने मुलाने आईसह भावाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री कोंढवा येथे घडली. याप्रकरणी उच्चशिक्षित मुलाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवी चंद्रकांत सरतापे (वय 30, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी...
जून 26, 2019
नवी दिल्ली: मित्राच्या पत्नीवर प्रेम जडलं. दोघांमध्ये प्रेमसंबधही निर्माण झाले. दोघेही अखंड प्रेमात बुडाले. मात्र, प्रेमामध्ये मित्राचा अडसर येत होता. यामुळे मित्रानेच मित्राचा काटा काढला. मित्राची हत्या करणाऱ्या 20 वर्षाच्या युवकाला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मित्राच्या पत्नीसोबत...
जून 26, 2019
बिझनेस वुमन - अश्‍विनी गिते, संस्थापक, ई-बिझनेस सोल्यूशन स्मार्ट फोनच्या जमान्यात अश्‍विनी गिते यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘ई-बिझनेस सोल्यूशन’ या नावाने...
जून 26, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुण आणि तरुणीचे लग्न जुळले. परंतु, काही दिवसांनी किरकोळ कारणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होऊन लग्न तुटण्याची वेळ आली. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणीने पोलिसांच्या महिला सहायता कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबप्रमुखांची समजूत काढली आणि लग्न...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 26, 2019
मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर आज विधान परिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे लोकायुक्तांनी मान्य केल्याने प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली. तर, लोकमंगलने व्याजासकट...
जून 25, 2019
मुंबई : हार्बर मार्गवर सर्व लोकल सिमेन्स लोकल धावण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील जुन्या रेट्रोफिटेड बनावटीच्या लोकल बाद झाल्या असून, या लोकल भंगारात जाण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावर सध्या 40 लोकल असून, या लोकलच्या 612 फेऱ्या चालविण्यात येतात. रेट्रोफिटेडच्या लोकलमधून प्रवास...
जून 25, 2019
पुणे - मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयश आल्याने त्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेला बसला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल कायद्यातील तरतुदीनुसार महापालिकेचे १५ कोटी रुपये गोठविले आहेत. पुणे शहरातील मुळा आणि मुठा नदीच्या प्रदूषणासंदर्भात आमदार राहुल कुल आणि संग्राम...
जून 24, 2019
व्याहाड खुर्द (जि. चंद्रपूर) ः भारतीय सैन्यदलाचा राजीनामा देऊन वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी स्वगावी परतलेल्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना 22 जूनला रात्री साडेनऊच्या सुमारास उटी गावाजवळ घडली. प्रमोद कुडावले असे मृताचे नाव आहे. तो सावली तालुक्‍यातील किसाननगरातील रहिवासी आहे. किसाननगर...
जून 23, 2019
आपण आकडे "ऍस्की' किंवा "एबसिडीक' पद्धतीनं मांडले, तर त्यांच्यातल्या गणिताचे नियम आपल्याला सहजपणे ठरवता येत नाहीत; आणि त्यामुळे त्या नियमांचा वापर करून इलेक्‍ट्रॉनिक सर्किट्‌सही बनवता येत नाहीत. म्हणून ही गणितं करण्यासाठी बायनरी पद्धतीचा वापर करतात. म्हणजे जिथं आकड्यांचा वापर मजकूर किंवा टेक्‍स्ट...
जून 23, 2019
सोलापूर : घटस्फोट हा शब्द तसा नकारार्थीच.. रोज न्यायालयात कोणाचा ना कोणाचा तरी घटस्फोट होतच असतो, पण घटस्फोट आणि लग्न हे दोन्ही एकाच वकिलांनी करून देणे तसे दुर्मिळच. ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्या पुढाकारामुळे एका घटस्फोटित मुलीचा पुनर्विवाह झाला.  प्रेरणा ही आपल्या पतीच्या जाचामुळे खूपच त्रस्त होती...
जून 23, 2019
चांगल्या परिस्थितीत राहणारे सुशिक्षित लोक पैशाच्या लोभानं गुन्हेगारीच्या मार्गावर किती सहजपणे पाऊल ठेवतात हे पाहून अनेकांना धक्का बसला होता. आपण कधीच पकडले जाणार नाही अशी मिकी, रुबिना आणि सुरजितची खात्री होती; पण गुन्हा करताना प्रत्येक पातळीवर त्यांनी त्यांच्या खुणा सोडल्या होत्या. मिकी, सुरजितसिंग...
जून 22, 2019
मुंडीकोटा (जि. गोंदिया) ः येथील सात दुकानांत चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 21) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. नागरिकांच्या सतर्कतेने दोन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. उमेश विद्याधर धुर्वे (वय 27), शक्‍ती नारायण चाचेरे (वय 30,...
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
जून 22, 2019
पुणे - कर्वे रस्त्यावरील बॅंक ऑफ इंडियाच्या 293 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये व्हेरॉन कंपनीच्या मुख्य संचालकास बॅंकेचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत केली असण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व सक्तवसुली संचालनालय (ईडी) या तपास...
जून 22, 2019
पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली...
जून 22, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची खाबूगिरी सुरू आहे. रुग्णांना औषधे ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे, खासगी दवाखान्यात जाण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयात पाठविणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन...
जून 22, 2019
नियंत्रण आणि बंदिस्तपणाला आव्हान देणाऱ्या आणि खुलेपणाचा, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या संस्थांचे आकर्षण समाजात नेहमीच असते. पण या स्वातंत्र्यालादेखील नियमनाचे कोंदण असावे लागते, याचा विसर पडला तर मात्र अनर्थ घडतो. या इशाऱ्याची पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे सामाजिक संज्ञापनाच्या क्षेत्रात...