एकूण 14 परिणाम
जानेवारी 26, 2020
मी परत आलो. तुकारामानं तयार केलेला पिठलं-भात एव्हाना थंड झाला होता. बाकीच्या सगळ्यांनी जेवण आटोपून घेतलं होतं. मी जेवायला बसलो आणि पहिला घास घेतानाच उपाशी गोरोबाचा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं आला... हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी येऊन वर एक नजर टाकली. हा गड आणि त्याभोवतीच्या सगळ्या निसर्गसौंदर्यानं मनात...
जानेवारी 19, 2020
भरत्याला जरी लोक वेडा म्हणत असले तरी मला तो बिलकूलही वेडा वाटला नाही; पण समाजाकडे एक तराजू आहे, त्यात शहाणे आणि वेडे तोलले जातात. एखाद्यानं एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याचं वेड समजून घेण्याऐवजी समाज त्याला वेडा ठरवून मोकळा होतो. भरत्याचं गुलालाचं वेड साऱ्या शाळेला ठाऊक होतं. भरत्याच्या...
जानेवारी 12, 2020
राधाची उत्सुकता अधिक न ताणता ती बाई म्हणाली : ‘‘चार वर्सांमागं तिच्या बापाला ‘प्रस’ चोरताना बघून पोलिस त्याच्या मागं धावले. पोलिसांना चुकीवताना त्यो रेल्वेखाली आला अन्‌ घात झाला त्येचा! हास्पिटलात नेताना पोलिसान्ला त्यो म्हनला, ‘ही प्रस माह्या पोरीला द्या..आन्‌ तिला लई शिकाया सांगा.’ अभयच्या...
जानेवारी 05, 2020
‘ओ बाबा, अगं आई’ असा धोषा लावत आपल्यामागं फिरणाऱ्या आपल्या मुलांचं सांगणं आपण कधी गंभीर होऊन ऐकलं आहे काय? ऐकलंच तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याजवळ गोष्ट आहे. वयानं मोठे झालेले लोक जी गोष्ट पाहणं, ऐकणं, सांगणं विसरून गेलेले आहेत...अशी गोष्ट. अशी गोष्ट आहे त्यांच्याजवळ! काही काही गोष्टी कधी...
डिसेंबर 15, 2019
अद्‍भुत, विस्मयजनक अंटार्क्टिका खंडावर आम्ही जवळजवळ नऊ-दहा दिवस होतो. आमची अठरा दिवसांची क्रूझ एक्स्पीडिशन क्रूझ होती. निरनिराळ्या बेटांच्या जवळ हिमनगांचा अंदाज घेऊन आमची मोठी क्रूझ थांबायची आणि मग झोडियाक या छोट्या रबराच्या बोटीतून आम्ही गटागटानं त्या बेटावर उतरायचो. क्रूझिंग म्हणजे त्याच...
डिसेंबर 01, 2019
ज्येष्ठ संगीतकार-गझलगायक-तबलावादक रवी दाते हे परवा (ता. तीन डिसेंबर) ८० वर्षं पूर्ण करत आहेत. ‘रसिकाग्रणी’ म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला गेला ते वडील रामूभैया दाते आणि थोरले बंधू प्रसिद्ध भावगीतगायक अरुण दाते अशा या दोघांचा रसिकतेचा, कलेचा वारसा रवीजींना घरातूनच मिळाला.‘शब्दांच्या पलीकडले’, ‘शाम-ए...
नोव्हेंबर 10, 2019
प्रत्येक व्यक्तीला आपलं कूळ, घराणं, पूर्वज यांच्याविषयी कुतूहूल असतंच. आपण सगळे ‘माकडाचे वंशज’ आणि ‘सेपिअन्स’ असल्याचं माहीत असलं, तरी आपल्या आधीच्या पिढ्या काय करत होत्या, याचं औत्सुक्य संपत नाही. त्यात एखाद्या लढवय्या, सत्ताधारी वंशाचा, घराण्याचा वारसा असेल, तर ही माहिती इतिहास म्हणून पुढे येत...
ऑक्टोबर 27, 2019
कुविचारांच्या दंगलीला आता मालेगावात स्थान नाही. इथं मुस्लिम दिवाळी साजरी करतात आणि हिंदू ईद साजरी करण्याच्या तयारीत मुस्लिमांना मदत करतात. हिंदू-मुस्लिम ज्या ज्या गल्लीत एकत्रित राहतात त्या त्या गल्लीत मालेगावसारखं बंधुभावाचं वातावरण तयार व्हायला हवं. त्या दिवशी मी नाशिकला असताना श्रीराम पवार...
सप्टेंबर 01, 2019
सणांच्या मुळाशी कृतज्ञतेची ही आदिम प्रेरणा असावी. बुद्धिपूजा आणि शक्तिपूजा! जगणं सुरंगी करण्याची ही निमित्तं शतका-शतकांपूर्वीची आहेत. ती नितळता आज पुन्हा शोधायला हवी; एका अर्थानं गंगेनं पुन्हा गंगोत्रीकडं जायला हवं. उत्सवाचं केवळ कर्मकांड झालं, की उरतात ते केवळ देखावे! टरफल्यांच्या सजावटीपेक्षा...
सप्टेंबर 01, 2019
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’ ‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
सप्टेंबर 01, 2019
आईला काय आवडायचं, ती कशी हळवी होती आणि जणू देवाचंच रूप कशी होती हे कविताताई मला तन्मयतेनं सांगत होत्या. मुली आईविषयी किती हळव्या असतात आणि त्याच हळव्या मुलीची आई जर आता हयात नसेल तर जुन्या आठवणींमुळे त्यांना अश्रू अनावर होऊन त्या किती भावुक होतात हे मी प्रत्यक्ष पाहत होतो... बुलडाण्याची सकाळ...
ऑगस्ट 25, 2019
प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांचं नुकतंच (ता. १९ ऑगस्ट) निधन झालं. त्यांच्यातल्या माणुसकीच्या विविध पैलूंचं दर्शन सिनेपत्रकाराच्या नजरेतून... सिनेपत्रकारितेत कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘जान-ए-वफा’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खय्यामसाहेबांना मी प्रथम भेटले होते. आजही तो प्रसंग मला जशाच्या तसा...
ऑगस्ट 04, 2019
‘रोशन व्हिला’ बंगला मिळवण्यासाठी आम्हाला खूप शोधाशोध करावी लागली. महाबळेश्वरमध्ये एके ठिकाणी आम्हाला हा बंगला सापडला आणि त्या बंगल्याच्या रूपानं नेमकं ‘कॅरेक्टर’सुद्धा सापडलं. तो बंगला तसा फार वापरात नव्हता आणि त्याच्या केअरटेकरना त्याचं नेमकं नाव माहीत नव्हतं. त्याच्याजवळच्या डच बंगल्याच्या...