एकूण 97 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
महाराष्ट्र माझा : मराठवाडा  यंदा मराठवाडा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. या पार्श्‍वभूमीवर महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या योजना प्रत्यक्षात आल्याशिवाय त्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा या आठवड्यात मराठवाड्यात आहे...
ऑगस्ट 14, 2019
‘तलावांचे जिल्हे’ अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया या भात उत्पादक जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व झिंगे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या या व्यवसायांची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांना अस्मानी आणि सुलतानी अशी ग्रहणे लागली आहेत, त्याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात भंडारा,...
जून 29, 2019
तेरावी विधानसभा कॅमेऱ्यात गुरुवारी कैद झाली. मतदारसंघात मन गुंतलेल्या आमदारांनी स्मृतिकोषात खास जागा असलेल्या या छायाचित्रासाठी गर्दी केली. बहुतेक चेहरे 2014 च्या मोदी लाटेत प्रथमच निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातलेच एक. अभ्यासू, प्रामाणिक आमदार ही...
जून 25, 2019
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरील सरकारचे अपयशच नव्हे, तर संवेदनहीनताही समोर आली असून ती धक्कादायक आहे. त्याविषयी सत्ता उपभोगत असलेल्या पक्षानेच तारस्वरात बोलणे, हाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांत बारा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली थेट सत्ताधाऱ्यांनीच...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत असा त्रिशतकी...
मे 25, 2019
साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...
एप्रिल 23, 2019
निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे. संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 04, 2019
निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या जनसमूहांना आश्‍वासने देताना कोणताच राजकीय पक्ष हातचे काही राखून ठेवीत नाही. वचने देताना कंजूषपणा कशाला करायचा, असाच त्यांचा आविर्भाव असतो. परंतु सत्तेत आल्यानंतर जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा त्याचा आश्‍वासनांशी मेळ कसा घालायचा, हा यक्षप्रश्‍न उभा राहतो. त्यातून मार्ग...
फेब्रुवारी 28, 2019
राज्याचे अर्थचित्र समग्रपणे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यापुढे उभे करणे हे अर्थसंकल्पाद्वारे व्हायला हवे. पण तसे झालेले नाही. वित्तीय तुटीविषयीचे मौन बरेच बोलके आहे. दुष्काळ निवारणाशी संबंधित बाबींसाठी केलेली भरीव तरतूद आणि नव्याने सवलतींची खैरात करण्याचा टाळलेला मोह याच फक्त अर्थसंकल्पाच्या जमेच्या...
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
फेब्रुवारी 06, 2019
महाराष्ट्राला तीव्र दुष्काळाने ग्रासले असतानाच, मराठवाडा, तसेच पाणीटंचाई असलेल्या विदर्भासारख्या अन्य भागांत एक नवाच धंदा तेजीत आला आहे आणि तो म्हणजे कूपनलिका खोदण्याचा. अर्थात, शेतात कूपनलिका घेतली म्हणजे पाणी लागेलच, याची खात्री तर बिलकूलच नसते, तरीही पाच-सहा महिन्यांनी पाऊस सुरू झाला की याच...
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
जानेवारी 24, 2019
शिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि वसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखेर सात वर्षांनी त्यांच्या स्मारकाचे काम गती घेऊ लागले आहे! अर्थात, लोकसभा निवडणुका अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर...
जानेवारी 16, 2019
मकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु अलीकडील काळातील घडामोडी पाहता ऊसातील हा गोडवा दिवेसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसते. राज्यात साखरेच्या दराचे शुक्‍लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोंडी...
जानेवारी 10, 2019
शिवसेना- भाजपमध्ये  आजवर सुरू असलेल्या ‘नुरा कुस्ती’चे रूपांतर थेट खडाखडीत झाले आहे. कोण कोणाला पटकणार, याचे उत्तर  निवडणूक निकालानंतरच मिळेल. पं तप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात विविध विकास योजनांचे उद्‌घाटन करत असताना, तिकडे मराठवाड्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘युतीची चर्चा गेली...