एकूण 2665 परिणाम
फेब्रुवारी 08, 2018
मुंबई - नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा महाराष्ट्राला फायदा होईल, त्यांना मंत्री करा अशा हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या विषयावर राणे यांची मदत होईल, तसेच शिवसेनेने नव्याने सुरू केलेली भाषा लक्षात घेता त्यांचा उपयोग होईल, असे दिल्लीतही सांगितले जात आहे. नारायण...
फेब्रुवारी 08, 2018
पिंपरी - महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्यासह भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची नावे बुधवारी लॉटरी पद्धतीने वगळण्यात आली. समितीतील भाजपच्या दहा नगरसेवकांचे आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या एका अपक्ष नगरसेवकाचे स्थायी समितीच्या सदस्यत्वाचे...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - चांदणी चौकातील जैवविविधता प्रकल्पाच्या (बीडीपी) ५० एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत केली. विशेष म्हणजे, जागा ताब्यात घेऊन शिवसृष्टीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पुढील...
फेब्रुवारी 07, 2018
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि देहू अशा आठ गावांचा शहरात समावेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने सोमवारी केला. आताच्या निर्णयामुळे शहराचे आणि गावांचेही निश्‍चितच भले होईल. औद्योगीकरणात पुणे शहराचे जुळे भावंडं म्हणून पिंपरी चिंचवड जन्माला आले....
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - सर्वांना प्रेरणा मिळेल असे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करून सरकारला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस यांच्या...
फेब्रुवारी 07, 2018
नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर...
फेब्रुवारी 07, 2018
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक संपत आलेली असताना शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दिशेने जातात आणि आपली भावना बोलून दाखवत तीव्र नाराजी व्यक्‍त करतात... मंत्रिमंडळाची बैठक संपताना देसाई हे रावल यांना म्हणाले, "हे बरंय, आम्ही...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई : राज्य सरकारने निश्चित केलेली तुरीची जिल्हानिहाय प्रती हेक्टरी उत्पादकता वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून, सरकारने तातडीने उत्पादकतेच्या आकडेवारीत सुधारणा करावी आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण तुरीची खरेदी करण्याबाबत पणन महासंघाला आदेश द्यावेत, अशी मागणी...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुकर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेत तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे 11...
फेब्रुवारी 06, 2018
सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करणार, असे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाचा त्यांना व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. यामुळे खोटारड्या सरकरावर आता युवकांचा विश्‍वास राहिलेला नाही. आगामी काळात युवकांना रोजगार न मिळाल्यास मंत्रालयावर मोर्चा...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाइन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून...
फेब्रुवारी 06, 2018
कल्याण - कोरेगाव भीमा दंगलीनंतरच्या "बंद'ला हिंसक वळण लागल्यामुळे राज्यभर अटकसत्र सुरू करण्यात आले होते. या कारवाईत अन्याय झाल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशावरून राज्याचे अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी सोमवारी कल्याण येथून राज्याचा...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - बालरंगभूमीचा पाया रचणाऱ्या, बालरंगभूमीला सशक्त दृष्टिकोन देणाऱ्या सुधाताई करमरकर (वय 83) यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा आहे. बालरंगभूमीचा भक्कम आधारस्तंभ आणि सशक्त असा पाया सुधा करमरकर यांनी घातला. परदेशातून शिक्षण घेऊन त्यांनी आपले सर्वस्व बालरंगभूमीला...
फेब्रुवारी 05, 2018
कल्याण : 3 जानेवारीला रोजी झालेल्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर अनेक शहरातून आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी पाहता राज्य शासनाच्या आदेशानुसार आज पासून महाराष्ट्र दौरा सुरू केला असून प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता...
फेब्रुवारी 04, 2018
औरंगाबाद : "भूजल खाते माझ्याकडुन जाता जाता वाचले आहे. हा विभाग अशी मागणी जलसंपदा मंत्री राम शिंदे यांना त्यांच्याकडे पाहिजे असल्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मी जोर लावल्याने तो प्रयत्न सफल होऊ शकला नाही," अशी स्पष्टोक्ती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. भूजल...
फेब्रुवारी 04, 2018
मुंबई : आदिवासींच्या बनावट जमात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावणाऱ्या 11 हजार 770 सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतून एकाच वेळी इतक्‍या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रकार राज्याच्या इतिहासात प्रथमच घडणार...
फेब्रुवारी 04, 2018
चौदाव्या वित्त आयोगामुळं ग्रामपंचायतींना प्रचंड आर्थिक बळ मिळालं आहे. सरपंचांना खूप अधिकार मिळाले आहेत. मात्र, हे अधिकार वापरण्यासाठी तितकं कौशल्यही या सरपंचांकडं असणं गरजेचं आहे. सरपंचांच्या अभ्यासावर ग्रामविकासाची गुढी उभी राहणार आहे, त्यामुळं हा अभ्यास सगळ्यांनीच नेमक्‍या पद्धतीनं करणं आवश्‍यक...
फेब्रुवारी 04, 2018
नेरळ : भाजप सरकार जनतेच्या सेवेसाठी सत्तेवर आले. आम्हाला सत्ता उपभोगायची नसून राबवायची आहे. त्यामुळे परिवर्तन घडवून विरोधकांना कायमचे घरी बसवणार, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कर्जत येथे भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.  कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
फेब्रुवारी 03, 2018
रत्नागिरी - पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पत्राची अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील १७०.९९ कोटींच्या आराखड्यातील ३० टक्के कपात करण्यात येऊ नये, असे पत्र श्री. वायकर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये देऊन विनंती केली होती. ती विनंती...