एकूण 3460 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...
जून 19, 2019
पिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 19, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज राज्यातील...
जून 19, 2019
मुंबई - व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) विक्री करण्यासाठी आलेल्या राहुल कृष्णाजी दुपारे (53) याला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. विद्याविहार पश्‍चिमेकडील कामा लेन येथे एक व्यक्ती "अंबरग्रीस'ची बेकायदा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मैत्रानंद खंदारे...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
जून 19, 2019
प्रभातफेरीकरिता बाहेर पडते, तेव्हा ट्रॅकवर सहसा कोणी नसतं. परतताना काही नित्याचे चेहरे दिसायला लागतात. बोलायला फुरसत नसते. नाव-गाव काय, कुठं राहतात, नोकरी की व्यवसाय, काही ठाऊक नाही. समोरासमोर येताच नजरा चुकवून जाणाऱ्यांना मी हसून ‘सुप्रभात’ म्हणत अभिवादन करते. सुरवातीला कुणी प्रत्युत्तर द्यायचं,...
जून 18, 2019
मालेगाव : महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गूळ बाजार सरदार चौक भागात मंगळवारी (ता. 18) अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मुख्य चौकातील पत्र्याची शेड, दोन दशकांपासून असलेली नादुरुस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने उचलून हटविण्यात आली. परिसरातील सुमारे 27 हातगाड्यांचे...
जून 18, 2019
इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 18, 2019
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह धायरी, शिवणे, उत्तमनगर भागात तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेला दिले.  धायरी येथील कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरीचे प्रकरण सकाळने उघडकीस आणले होते. याबाबत विधान सभेत आमदार भीमराव...
जून 18, 2019
सातारा - प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली वृक्षलागवड आणि संगोपनाची चळवळ आता लोकप्रतिनिधींच्या स्तरावर सरकारने नेली आहे. वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रत्येक तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. यामुळे प्रशासनाच्या कामावर लोकप्रतिनिधींचा...
जून 18, 2019
अन्नधान्याबाबत देश स्वयंपूर्ण झाला असला, तरी विपुलतेमुळे काही प्रश्‍नही निर्माण झाले आहेत. आज भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे अपेक्षित राखीव साठ्यापेक्षा कितीतरी जास्त धान्यसाठा सरकारकडे पडून आहे. ‘अ न्नं बहु कुर्वीत, तद्‌ व्रतम्‌’ असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. या सुवचनानुसार भारतात समाधानकारक...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीतर्फे आज संपूर्ण राज्यात सुरू केलेल्या "ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव' आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.  या आंदोलनाची सुरूवात सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...
जून 17, 2019
नाशिक ः बबिता..."तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम नव्हे बरं. ही आहे, नाशिकची बबिता. स्वभावानं शांत, कुणाबरोबरही पटकन मैत्री करणारी. तिच्या डोहाळे जेवणासाठी मांड्याचा बेत अन्‌ उत्सवात रंगल्या फुगड्या, भोजनाच्या पगंती झाल्यात. पंचवटीतील बळी मंदिर परिसरातील या अनोख्या कौटुंबिक सोहळ्याची माहिती शहरभर...
जून 17, 2019
आजरा - हात्तीवडे (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दिनकर आण्णाप्पा पाटील (वय 65) हे शेतकरी जखमी झाले. बामणीकी नावाच्या शेतात ते आज सकाळी जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. गवत कापत असतांना गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमाराला ही घटना...
जून 17, 2019
कागल - राजकारण आणि समाजकारणात सतत व्यस्त असलेल्या राजकीय व्यक्तींच्या जीवनात कुटुंबासमवेत आनंद घेण्याचे निवांत क्षण तसे दुर्मिळच असतात. शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष असलेले राजे समरजितसिंह घाटगे यांनी काल (शनिवार) पुण्यात सहकुटुंब...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 17, 2019
कोल्हापूर - नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याच्या प्रकरणात एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा हात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणातील आणखी तपशील येत्या दोन दिवसांत उघड होईल. प्रकरण अंगलट येण्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करून आपले ‘हात’ वर करण्याचे काम संबंधित...
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...