एकूण 273 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ''अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,'' असेही ते...
नोव्हेंबर 04, 2019
उत्पादकांच्या ३५०० कोटींच्या उत्पन्नावर ‘पाणी’;  ५० हजार एकराला फटका सोलापूर - कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी बागांमध्ये पाणी साचले आहे. कुठे मुळकूज, फळकूजसह फुलगळीचे प्रकार घडले आहेत. परिणामी...
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी: पालघरसह ठाणे परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने या क्षेत्रातील भातशेतीवर पाणी फिरवल्याने बळिराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने धान्य खराब झालेच, शिवाय पावलीदेखील कुजल्याने आर्थिक तोटा झाल्याने सहकारी संस्था व बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे. बोर्डी...
नोव्हेंबर 03, 2019
मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन...
नोव्हेंबर 03, 2019
बदनापूर (जि.जालना) - "काही खरं नाही भाऊ, उन्हाळ्यात विकतच्या टॅंकरने मोसंबीच्या बागा जगविल्या. आता अतिवृष्टीमुळे बागेत पाणी साचून मोसंब्या कुजत आहेत आणि फळगळही होत आहे. जणू निसर्गाने शेतकऱ्यांचा पिच्छाच धरला आहे... आता सरकारने तरी मदत करावी,' अशी व्यथा राजेवाडी (ता. बदनापूर) येथील वयोवृद्ध फळ...
नोव्हेंबर 02, 2019
यवतमाळ : डोळ्यातदेखील मातीमोल होणारे पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ्याला अश्रूधारा लागल्या आहेत. अवकाळीने सर्वच हिरावून नेल आहे. आता पुन्हा काही शिल्लक राहिले नाही. तरीही अवकाळी थांबण्याचे नाव घेत नाही. आणखी किती रडवशील रे पावसा? असा प्रश्‍नच जणू हतबल झालेला शेतकरी वरूणराजाला विचारत आहे. अवकाळीने...
नोव्हेंबर 01, 2019
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे...
ऑक्टोबर 30, 2019
मालेगाव : यंदा चांगल्या पावसाच्या गोड कौतुकात बळीराजासह सर्वच सुखावले.. आगामी वर्षात दुष्काळी चिन्ह पुसण्यास हा पाऊस कारणी लागेल हा या कौतुकाचा केंद्रबिंदू.. मात्र इतक्या पावसाच्या दीर्घ मुक्काम झेलण्याची मानसिक तयारी नसल्याने वैतागावस्था बघावयास मिळत आहे. शहरी ग्रामीण भागासह शेतमळ्यात आता पावसाला...
ऑक्टोबर 29, 2019
पुणे : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले नाहीत. त्यांना मदत मिळणे तर लांबची गोष्ट. त्यामुळे येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत जर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाली नाही तर शेतकरी स्वाभिमानी...
ऑक्टोबर 17, 2019
 राजापूर - गावच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योगदानाचा सुंदर मिलाफ करताना गावची नागरी स्वच्छता, यशस्वी ग्रामसभा आणि विविध वैयक्तिक व शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्‍यातील...
ऑक्टोबर 16, 2019
मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या पाखरे पितापुत्रांनी कमी खर्चिक शेती पध्दतीचा अंगीकार केला आहे. इंच-इंच जागा पिकांखाली आणत त्यांनी उत्पन्नासाठी मिश्र पिकांचा आधार घेतला. विविध फळबागांची लागवड करीत वृक्षसंपदा जपली. कायम अवर्षणाची स्थिती असल्याने सिंचन व्यवस्था सक्षम करताना शेततळे,...
ऑक्टोबर 13, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) -  गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. गतवर्षीही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यामुळे यंदा मोसंबीचे उत्पादन...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमधून लोकसहभाग, जलयुक्त शिवार अभियानातून जलसंधारणाची कामे होत आहेत. त्या जोरावर टँकर बंद होत आता सिंचनाची सुविधा तयार होऊन शेतकऱ्यांना बागायती पिके घेणे शक्य झाले आहे. सातारा जिल्ह्यातील राऊतवाडी (ता. कोरेगाव) हे या पैकीच गाव आहे. ग्रामस्थांच्या एकीतून झालेल्या कामांमधून...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 23, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यातील कृषी विभागाची अवस्था वाईट असून, सुमारे 71 हजार शेतकऱ्यांसाठी केवळ दहा कृषी सहायक आहेत. त्यामुळे या अपुऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यातही उशीर होत आहे. त्यामुके एक कृषी मंडळ वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. फुलंब्री...
सप्टेंबर 16, 2019
कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  जिद्द, मेहनत, चिकाटी यासोबत अभ्यासपूर्ण नियोजन करून पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीचा नवीन प्रयोग करून लिंबोणी (ता. घनसावंगी) येथील शेतकरी तथा माजी सरपंच सुंदरराव काळे यांनी आपल्या शेतीची प्रगती साधली. दुष्काळाशी दोन हात करीत तीन एकर डाळिंबाची बाग जगवली. यातून 35...
सप्टेंबर 10, 2019
प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) हे तंत्रज्ञान अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तमिळनाडू राज्यात चांगले रुजले आहे. फळबाग लागवडीसह वृक्षलागवड, औषधी वनस्पती, भाजीपाला लागवड आदींसाठी या राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यातून अवर्षणातही तग...
सप्टेंबर 10, 2019
बोर्डी ः बोर्डी परिसरात गेल्या महिनाभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिकू बागायतदारांची परिस्थिती बिकट केली आहे. चिकूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडावरील फळे कुजून पडली आहेत; तर झाडे मृतावस्थेत आली आहेत. सततच्या पावसामुळे चिकू फळबागा आणि  उत्पादनावर संकट कोसळले आहे.  डहाणू तालुक्‍यात...