एकूण 2660 परिणाम
डिसेंबर 16, 2018
कोलंबो : महिंदा राजपक्षे यांनी आज अखेर श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील राजकीय संघर्ष आजअखेर संपुष्टात आला. विद्यमान अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनीच राजपक्षे यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड केल्यानंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. आता राजपक्षे यांच्याऐवजी रानिल...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
डिसेंबर 15, 2018
माजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व राहणार इंदौर, मध्यप्रदेश) अशी...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35, रा....
डिसेंबर 15, 2018
नवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या नेपाळमध्येही भारतापेक्षा जास्त महिला लोकप्रतिनिधी राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडून जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत आज हे धक्कादायक...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. राधिका दिसायला जेवढी सुंदर तेवढाच मृत्यूही तिच्याबाबत भयंकर होता, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स करत आहेत. राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती गेल्या...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी अजिवन कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांनाही अपहरण करणे व खून करणे अशा दोन्ही कलमांमध्ये अजिवन कारावास ठोठावला आहे.  टिळकनगरातील गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतून...
डिसेंबर 14, 2018
कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू अशताना...
डिसेंबर 14, 2018
पुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी प्रतिकृती ९ गुंठ्यांत साकारली आहे. आर्थिक स्थिती नसतानाही केवळ किल्ल्यांच्या प्रेमाखातर त्यांनी हा भव्य प्रकल्प उभारला आहे. हिंजवडीत भाड्याच्या घरात बर्वे...
डिसेंबर 14, 2018
अकोला - शेतकऱ्यांनो, माकडापासून सावधान ! माकडाच्या हल्ल्यात तुम्ही जखमी किंवा जिवाची हानी झाली, तरी नुकसानभरपाई मिळणार नाही. कारण वनविभागाच्या नियमानुसार, हिंसक पशूंनी हल्ला केला, तरच आर्थिक नुकसानभरपाई मिळू शकते आणि वनविभागाच्या लेखी माकड हे हिंसक पशू नाही. जिल्ह्यातील शेत शिवारात हरीण, काळवीट...
डिसेंबर 14, 2018
सातारा - जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व खासगी रक्तपेढ्यांतून रक्त मिळण्यात येणाऱ्या अडचणी जिल्ह्यातील थॅलेसिमीयाच्या रुग्णांच्या जिवावर बेतत आहेत. समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या समन्वयाने त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी रुग्णालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून यावर तातडीने तोडगा...
डिसेंबर 14, 2018
कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांचा संसद बरखास्त करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय येथील सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. यामुळे आपल्या वादग्रस्त निर्णयांमुळे घटनात्मक पेचप्रसंगांची साखळीच निर्माण करणाऱ्या सीरिसेना यांना आणखी एक धक्का बसला आहे.  संसदेने किमान साडेचार वर्षांचा...
डिसेंबर 13, 2018
महाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत असलेल्या दोघा पोलिसांना तिघांनी मारहाण केली आहे . आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा...
डिसेंबर 13, 2018
सातारा - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. येथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - यवतमाळमधील अवनी वाघिणीच्या वादग्रस्त मृत्यूनंतर आता वाघ, सिंह आणि बिबट्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने जंगल क्षेत्रांच्या सीमा निश्‍चित कराव्यात, अशा मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. वाघ आणि सिंहांच्या 10 वर्षांतील आकस्मिक व संशयास्पद मृत्यूच्या घटनांबाबत...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास राऊत (चौथी),...
डिसेंबर 12, 2018
बारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. मध्यंतरी बारामतीत तिघांनी दारुच्या नशेत असताना गाडी...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक अत्याचाराने पीडित आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणारे 90 टक्‍के लोक परिचित, जवळचे नातेवाईक असतात. त्यांच्याच विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. देशात निर्भया, कोपर्डी, उन्नान, कथुआ या घटनांची...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध भिक्‍खूचे नाव...