एकूण 156 परिणाम
मे 22, 2019
औरंगाबाद : बाजारात दाखल झालेल्या नव्या ज्वारी आणि गव्हाला मोठी मागणी दिसून येत आहे. यंदा गव्हाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जुन्या मोंढा, बाजार समितीत नव्या गव्हाला दोन हजार 300 ते चार हजार 500 रुपयांचा दर मिळत आहे; तर फिल्टर केलेल्या ज्वारीला दोन हजार 300 ते तीन हजार 200 रुपयांचा दर...
मे 19, 2019
सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे. कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते. मिरचीला उन्हाळ्यात...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 10, 2019
तेरखेडा - साहेब, मी कसं बी जगंल, पण जितराबाचं काय, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. यंदा रब्बीची पेरणीच झाली नसल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस चाऱ्याची राखण करावी लागत आहे. जनावरांच्या...
मे 08, 2019
भेंडवळ (बुलडाणा) : संपुर्ण शेतकरी जगताचे लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे अंदाज बुधवारी (ता. 8) पहाटे वर्तविण्यात आले असून ज्वारी, बाजरी, तुर या पिकांचे चांगले वर्ष दर्शविले आहे. येत्या वर्षातही चारा-पाण्याची वाढू शकते. देशात घुसखोरीच्या घटना वाढणार असून आर्थिक क्षेत्रात अडचणी वाढण्याची शक्यता आहे...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 17, 2019
पावसाची हलकीशी सर आली. अवकाळी, मृदगंधाचं आंदण देऊन गेली. अद्याप माणसाला कुपीबंद करता न आलेला हा सुवास. अर्थात, तो असिनोमायसेटिस नामक जिवाणूंच्या स्पोअर्समुळे येतो हे शोधून काढण्यापर्यंत आपण मजल मारली आहे, तेव्हा कुणी सांगावं उद्या असे मातीच्या सुगंधाचे स्प्रे येतीलही बाजारात. मात्र, तो असा अवचित...
एप्रिल 10, 2019
दोन महिन्यांत २४ लाख लिटरची घट, जनावरांना मिळेना मुबलक चारा सोलापूर - राज्यात भयावह दुष्काळ पडला तरीही जनावरांना छावण्यांची प्रतीक्षाच आहे. राज्यातील सुमारे ८२ लाख जनावरांना चाऱ्याची गरज आहे; परंतु सद्यस्थितीत ८६९ छावण्यांद्वारे साडेपाच लाख जनावरांनाच चारा दिला जातोय. उर्वरित जनावरांना मुबलक चारा...
एप्रिल 09, 2019
ईळेगांव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे दिगंबरराव, मारोतराव, कैलास, विलास या चार काळे भावांचे एकत्रित कुटूंब व मध्यम ते भारी प्रकारची ५० एकर जमीन आहे. विहीर, बोअरची सुविधा आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे गेल्यावर्षी कौडगांव शिवारात जमीन घेतली. तेथे बोअर खोदून दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे शेतातील...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - ‘‘अवंदाच्या दुस्काळानं गावातल्या समद्या इहिरी आटल्या, तव्हा पाण्यासाठी मानसागणी जित्राबांचे हाल व्हत्यात. आतापोस्तर लई येळा दुस्काळ पाहिला. ७२ च्या दुस्काळात पाण्याचे एव्हढे हाल नसतील, तेव्हढे आता हैत... जनावरांसाठीचा कडबा चार हजार रुपये शेकडा; तर रुपयाला यक उसाचं वाढ मिळतंय. खाटकाच्या...
मार्च 24, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे बागा जळाल्या, जनावरे उपाशीपोटी दावणीला बांधावी लागताहेत, लेकींची लग्ने राहिली ईतकेच नव्हे तर आता जगायचं कसं अशी चिंता लागली आहे, अशी भावना परंडा तालूक्‍यातील शेतकरी (जि. उस्मानाबाद) व्यक्त करत आहेत. ज्वारीचे कोठार या नावाने परंडा तालूक्‍याची राज्यात ओळख असली तरी दुष्काळामुळे...
मार्च 19, 2019
मंगळवेढा - शहरामध्ये आद्यवत नाट्यग्रृह नसल्यामुळे नाट्य कलावंतांची कुचंबणा होत आहे. नाट्यकलावंतांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृह होणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकेतून प्रयत्नांची गरज आहे. पंढरपूर पाण्याचं, सांगोला सोन्याचं आणि मंगूड अस्सल दाण्याचं याप्रमाणे संताची नगरी म्हणून...
मार्च 12, 2019
जळगाव: तालुक्‍यातील देऊळवाडा शिवारामधील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह शोध घेणाऱ्या वनपालावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तीघांना बिबट्याने चावा घेत जखमी केले. दरम्यान जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात तीघांवर उपचार सुरु आहे.  जळगाव तालुक्‍यातील देऊळवाडे शिवारात असलेल्या शेतात प्रमोद संजय सोनवणे (वय 18)...
मार्च 10, 2019
शरदराव आणि नाना पहाटेच उठून फिरायला जात आणि येताना भाजी, दूध घेऊन येत. दुपारी बारा वाजता सुमनताई आणि माईंचा स्वयंपाक झाल्यावर चौघं एकत्र बसून जेवण करायचे. चारचा चहा झाल्यावर शरदराव-नाना फिरायला जायचे, आणि माई- सुमनताई मंदिरात जायच्या. शरदराव आणि नानांची चांगलीच गट्टी जमली होती. माई तर सुमनताईंवर...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - दुष्काळ जाहीर होवून चार महिने झाले तरी जनावराचा चारा, रोहयोची कामे, पाण्याचे टँकर यांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात सध्या तरी प्रशासन कमी पडले आहे. कागदोपत्री नियोजन करण्याऐवजी प्रत्यक्ष नियोजन कधी होणार याची प्रतिक्षा तालुक्यातील जनतेला लागली आहे. तालुक्यात लहान मोठे मिळून दीड लाख पशुधन...
फेब्रुवारी 28, 2019
बीड - खरिपात पावसाने पाठ फिरविली आणि रब्बीतही परतीचा पाऊस न झाल्याने चाऱ्याचे पीक आलेच नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न बिकट झाल्याने पशुपालक हैराण आहेत. मात्र, किचकट शासन निर्णयामुळे छावण्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. जिल्हाभरातून छावण्या सुरू करण्याचे...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई : जुन्नर येथील गोळेगाव (लेण्याद्री) येथे नुकत्याच झालेल्या द्राक्ष महोत्सवाला (Grape Festival) गुजरात, राजस्थानसह राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, अलिबाग, औरंगाबाद आदी शहरातील सुमारे 800 पर्यटकांनी भेट देऊन ग्रामीण आणि कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. शहरी भागातील नागरीकांना आणि विशेषत: तरुण...
फेब्रुवारी 17, 2019
वैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशाच काही खास वैदर्भीय पाककृतींविषयी.. महाराष्ट्रातला ईशान्य भाग हा एकेकाळी मध्य...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे मराठवाड्यातील चाऱ्याची स्थिती गंभीर झाली आहे. पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर  असताना चाऱ्याची (कडबा) किंमत प्रतिशेकडा २,५०० रुपये, अशी रेकॉर्डब्रेक झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. कडब्याचे भाव वाढल्याने एका बैलजोडीचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे. यंदा...