एकूण 142 परिणाम
जून 25, 2019
पुणे - आगामी विधानसभा निवडणुकी-मध्ये रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) हा भाजपसोबतच राहील; परंतु आमचा पक्ष कमळच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. याबरोबरच भाजप-शिवसेना महायुतीकडे विधानसभेसाठी १० जागांची मागणी करणार...
जून 21, 2019
रत्नागिरी - कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या मागणीला मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी 500 कोटींची आर्थिक तरतूद शक्‍य नसल्याचे उत्तर देऊन कोकणच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने 20 वर्षे हा प्रश्‍न लोंबकळत ठेवला आहे. सर्वंकष मत्स्य शिक्षण, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि विकासासाठी मत्स्य...
जून 05, 2019
मुंबई - आगामी निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) चिन्हावरच लढवल्या जातील, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी आज मंत्रालयात बोलताना दिली. विधानसभेची आगामी निवडणूक घटक पक्षांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रयत...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत सुळे...
मे 22, 2019
बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस...
मे 10, 2019
मालवण - एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटी पकडून त्या नष्ट करण्याबाबत कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया केंद्रस्तरावर सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री व पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्पष्ट केले. ही माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्याच्या...
मे 07, 2019
औरंगाबाद - पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा आणि हाताला काम द्या, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील हंडा मोर्चाने सोमवारी सर्वांचे लक्ष वेधले. सरकारने चाऱ्याच्या रेल्वेगाड्या तयार ठेवल्या असल्याची विधिमंडळात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी घोषणा केली होती; मग या रेल्वे कुठे...
मे 06, 2019
जत - पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी तालुक्‍यातील दुष्काळी भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळ पीडित शेतकऱ्यांनी पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा छावणी, शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न, यामुळे आलेले दारिद्र्य, आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन ठोस पावले कधी...
मे 04, 2019
पंढरपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी तिजोरी खाली करण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत माढा, बारामती आणी सांगलीसह राज्यात महायुती 40 जागा जिंकेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज व्यक्त केला. दुष्काळी पहाणी दौऱ्याच्या...
एप्रिल 21, 2019
पुणे : "'बारामती लोकसभा मतदार संघात यंदा इतिहास घडणार आहे. हा इतिहास घडत असताना कार्यकर्ते व मतदारांनी अलिप्त न राहता विजयाचे शिल्पकार बनावे. बारामतीत रासपने तण छाटल्याने भाजपचे कमळ फुलणार आहे. रासपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील न राहता विजयासाठी जीवाचे रान करावे.'' ,असे आवाहन दुग्धविकास व...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...
एप्रिल 20, 2019
आमची भूमिका भाजप हा महाल असला, तरी आमचा राष्ट्रीय समाज पक्ष त्याच्याशेजारील झोपडी आहे. त्यामुळं भाजपनं आमच्या झोपडीचा आदर करावा. जमलंच तर झोपडी शेकरायला तणसाच्या पेंड्या द्याव्यात. त्यामुळंच मी कमळाच्या चिन्हावर लढण्यास ठाम नकार दिला. नाहीतर मला बारामती अथवा माढ्यातून उमेदवारी मिळत होती. पण, मला...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली....
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या नेत्यांना भाजपने यंदा लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून चार हात लांबच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख,...
एप्रिल 13, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) - सध्या सर्वत्र लोकसभेचे वारे वाहत आहे. गेल्या दहा वर्षापुर्वी लोकसभा मतदार संघाची नव्याने रचना झाली. सोलापूर जिल्ह्यातील चार व सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ असा एकत्रित माढा लोकसभा मतदार संघ तयार करण्यात आला. नव्याने रचना झाल्यापासून या मतदार संघावर राष्ट्रवादीची...
एप्रिल 13, 2019
पुणे - मनसेचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या पुण्यात सिंहगड रस्त्यावर सभा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाचवेळी पुणे आणि बारामती अशा दोन्ही मतदारसंघात भाजपला लक्ष्य करणार आहेत. त्यामुळे या सभेबाबत उत्सुकता वाढली आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यास जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर राज यांच्या राज्यभर सहा सभा...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....