एकूण 44 परिणाम
एप्रिल 20, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रचारात सक्रिय आहेत की नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. नगरसेवकांनी आपापल्या भागात प्रचाराची जबाबदारी पार पाडून त्या संदर्भातील रोजचा अहवाल छायाचित्रासह स्थानिक आमदार व मुख्यमंत्र्यांना द्यावा लागत आहे. यामुळे भाजपच्या...
एप्रिल 16, 2019
आळंदी - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आळंदीतील भाजपचे सर्व नगरसेवक युती धर्म पाळणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि आढळराव यांच्यात दिलजमाई करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे.  नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली....
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हा सामना चांगलाच तापला आहे. एकीकडे कोल्हे यांच्या प्रचार गाजत असताना दुसरीकडे आढळराव पाटील यांची रॅलीही चर्चेत आहे. लोणी काळभोर येथे आज (ता. 15) सकाळी निघालेली प्रचार रॅली...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यातील लोकसभा निवडणुकीत सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. त्यामुळे ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, असेच या निवडणुकीचे ब्रीद...
एप्रिल 04, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुण्यातून जोशींसह दहा उमेदवारांचे अर्ज निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाकडून उमेदवारी : जोशी महायुतीच्या बारामती...
एप्रिल 04, 2019
भोसरी - ‘खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि माझ्यात काही विषयांवर मतभेद होते. मात्र, मी आढळराव-पाटील यांच्याविरोधात कधीही अपशब्द वापरला नाही. आमच्यातील मतभेद मिटले असून, कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचाराला लागावे. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव-पाटील यांना सर्वाधिक मतदान मिळवून देऊ,’’ अशी ग्वाही...
एप्रिल 03, 2019
भोसरी : एक मेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या दोन दादांचे भोसरीत मनोमिलन झाले. युतीधर्माचे पालन करण्यासाठी दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर आले. शिवसेनेचे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या सरमर्थकांनी भोसरीत वियजी संकल्प मेळावा साजरा केला. या मेळाव्याला...
मार्च 31, 2019
पिंपरी - खासदार होण्याची इच्छा होती. सर्व पातळीवर तयारी केली होती. कार्यकर्त्यांना महापालिकेत चांगली पदे दिली, वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम घेऊन ब्रॅंडिंग केले. अमाप खर्चही केला, मात्र परिस्थितीच अशी ओढविली की युती झाल्याने निराश होऊन घरी बसावे लागले. त्यातूनही काही हालचाली कराव्या म्हटल्या तर...
फेब्रुवारी 27, 2019
पिंपरी - स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावरून भाजपतील गटांमध्ये यंदा पुन्हा वाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संतोष लोंढे यांनाच स्थायी समितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 22, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार असून, या सदस्यांतील एकाची निवड समितीच्या अध्यक्षपदी होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद मार्चच्या पहिल्या आठवड्यात निश्‍चित होणार असून, ते कोणत्या गटाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष ...
जानेवारी 10, 2019
पिंपरी - ‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या शास्तीची धास्ती धरू नका. पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ९) दिली. पवना जलवाहिनीस विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारी सेवेत...
डिसेंबर 24, 2018
पुणे - ‘‘भारत माता हाच माझा धर्म असून, वंदे मातरम ही माझी जात आहे. मानवतेच्या भावनेतून आपण एकमेकांकडे पहिले पाहिजे. मात्र आज देशात धर्म, जात, पक्ष या माध्यमातून वेगवेगळे गट पडले आहेत. दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून...
डिसेंबर 19, 2018
पिंपरी - शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावर येत्या आठवडाभरात स्वच्छताविषयक...
डिसेंबर 12, 2018
सहकारनगर - दहशतवाद, नक्षलवाद असे गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहेत. अशा वेळी राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्र प्रथम हा विचार ठेवून सर्वानी एकत्र यावे, असे आवाहन ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे चेअरमन मनिंदरजित सिंग बिट्टा यांनी केले. पद्मा प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती यांच्या संयुक्त...
डिसेंबर 03, 2018
भोसरी - जीवनदायी ठरणाऱ्या इंद्रायणी नदीचे पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होणारच नाही, याची खबरदारी सर्वप्रथम नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी नदी स्वच्छतेचा वसा नागरिकांनी घेतला पाहिजे,’’ असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत केले.  भोसरीतील कै. अंकुशराव...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील (प्रभाग क्र.८) २.४७ एकर जागेवरील सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाच्या कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंकचे (पहिला टप्पा) नुकतेच उद्‌घाटन झाले. यापूर्वी, शहरातील खेळाडूंना विमाननगर (पुणे) अथवा कासारसाई (हिंजवडी) येथे सराव, स्पर्धा आणि...
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा वर्धापन दिन सोमवारी (ता. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरवासीयांनी "सकाळ'ला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. ...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शिक्षकांनाही धन्वंतरी स्वास्थ्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंजूर केला आहे. शिक्षकांची ही मागणी गेल्या २५ वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती. विशेष म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांनाही या विमा योजनेचा...