एकूण 15 परिणाम
जानेवारी 12, 2019
यवतमाळ : यवतमाळ लोकसभा मतदारसंघ जागावाटपामध्ये कॉंग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी या मतदारसंघात विजयाची खात्री असलेला उमेदवार कॉंग्रेसकडे नसल्याने पुन्हा विरोधकांचे पारडे जड झाल्याची चर्चा आहे.  एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला यवतमाळ मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. आता या...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - पुणे शहर लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच आहे, त्यामुळे ही जागा पक्षाकडेच ठेवा. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याचे काम एकदिलाने करू, असा एकीचा सूर शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मुंबई येथील बैठकीत गुरुवारी पक्षश्रेष्ठींसमोर आळवला. राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसची पुण्यात जास्त ताकद आहे, त्यामुळे...
ऑक्टोबर 04, 2018
वाशीम : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेचा बेलाग बालेकिल्ला असलेल्या वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात निवडणूक पूर्व राजकीय चाचपणीला सुरुवात झाली आहे. गेली 20 वर्षे शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युती धर्म पाळणार्‍या भाजपला या मतदार संघात ‘एकला चलोरेची’ भूमिका निभवावी लागणार असल्याचे चित्र समोर येत...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या समर्थनार्थ आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
जुलै 24, 2018
उल्हासनगर - अनधिकृत इमारती नियमित करण्याची प्रक्रिया गेल्या आठ वर्षांपासून ठप्प पडलेली आहे.जवळपास 5 हजार 900 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे 442 कोटी 50 लाख रुपयांचा महसूल बुडू लागला आहे. या वस्तुस्थितीची हकीकत दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या उपसभापती...
जुलै 14, 2018
डोंबिवली :सर्वत्र फोवावत चाललेली बेकायदा बांधकामे, 27 गावांचा महापालिकेला असलेला कडाडून विरोध, संपूर्ण प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची लागण, सर्वाधिक त्रासदायक असे ध्वनी-वायू-पाणी प्रदूषण, सर्वत्र वाढते कचऱ्याचे साम्राज्य, रुग्णालयांनाच तातडीने उपचारांची गरज अशी दयनीय अवस्था आणि निकृष्ट दर्जाच्या...
जुलै 13, 2018
नागपूर - एकमेकांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलफेक केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व भाजपचे सुरेश धस यांच्यात परिषदेत चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही विषयाला धरून बोलण्याच्या सूचना केल्या....
जुलै 12, 2018
नागपूर - राईनपाडा येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात यावे. तसेच, या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील राईनपाडा...
जुलै 06, 2018
नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या...
जून 13, 2018
भिवंडी - माझ्या विरोधात भाजपकडून खोटे गुन्हे दाखल करून मला अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे; मात्र मला त्याची पर्वा नाही. आमची लढाई विचारांशी आहे, ती आम्ही जिंकणार असल्याचा दावा करत याचिकेतील सर्व आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज फेटाळून लावले. भिवंडी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर...
जून 01, 2018
सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहरात झालेला काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचा उल्लेख "फ्लॉप शो' म्हणूनच करावा लागेल. विस्कळित नियोजन आणि गर्दीचा अभाव हे त्याला कारणीभूत ठरले. सरकारने जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याची जाणीव मतदारांना करून देण्यात...