एकूण 354 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
काशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने कधी देणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  जिल्ह्यातील ऊस हंगाम वेगात सुरू आहे. कारखान्यांकडून गाळप क्षमतेपेक्षा जास्त...
फेब्रुवारी 17, 2019
अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत ज्या...
फेब्रुवारी 16, 2019
पाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर आहेत. आजही सुधागड तालुक्यातील कोंडी धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर आहे. येथील विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक च्या पुढील शिक्षणासाठी...
फेब्रुवारी 16, 2019
सोलापूर - राज्यातील शिक्षक भरतीवर अनिश्‍चिततेची टांगती तलवार कायम असताना 23 जानेवारी 2017 च्या परिपत्रकानुसार उपशिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदस्थापना; तर 2014 च्या "ग्रामविकास'च्या अधिसूचनेनुसार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी, असे निकष असतानाही तेरा जिल्हा परिषदांनी त्याचे उल्लंघन केले आहे...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ‘स्वयंम’ या कृत्रिम उपग्रहाच्या अभिनव यशानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सीसॅट-२ या उपग्रहाची निर्मिती करत आहेत. वातावरणातील प्रभारीत कणांचा अभ्यास आणि उपग्रहाची भ्रमणकक्षा बदलण्यासाठी सौर पंखांचा वापर या संशोधनाचा वापर सीसॅट-२ मध्ये केला जाणार आहे, अशी माहिती...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेने अकरा ‘मोबाईल टीचर’ नियुक्त केले आहेत. या विशेष शिक्षकांनी महापालिका क्षेत्रातील वाड्यावस्त्यांत पाहणी करून ६०१ दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या चिमुकल्यांना...
फेब्रुवारी 12, 2019
मोदी लाटेत ऐनवेळी भाजपने दिलेला तरुण चेहरा म्हणून कार्य नसतानाही डॉ. हीना गावित यांनी नऊ वेळा मतदारसंघ राखलेले, ज्येष्ठ नेते माणिकराव गावितांचा पराभव करून नवा इतिहास रचला खरा, पण काँग्रेसने आता भाजपला खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. आदिवासी जनतेसाठी प्रियांका गांधी यांची सभा घेत राज्यातील प्रचार...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुष्काळ आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यातील या संभाव्य संकटावर मात शेतकऱ्यांमधील अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने...
फेब्रुवारी 11, 2019
चिपळूण - येथील स्थानिक मार्केटमध्ये काजूगराचे दर किलोमागे १०० ते १५० रुपयांनी कोसळले आहेत. याचा बागायतदारांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. काजू बीला चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू लागवड झाली. पारंपरिक शेती व्यवसायाला आंबा पिकाबरोबरच काजूच्या उत्पन्नाची जोड मिळाली....
फेब्रुवारी 10, 2019
प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम...
फेब्रुवारी 10, 2019
अनेक देशांतले राजकीय नेते व विचारवंत संशोधन व ज्ञान यांच्या आधारे, आगामी काळात काय करता येईल, यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक देशांत कधी ना कधी तरी सुवर्णयुग होतं; पण तिथल्या राजांनादेखील दोन हजार वर्षांपूर्वी दाताला कीड लागल्यावर वेदना सहन कराव्या लागत असत; म्हणून तिथले विचारवंत भविष्यात सुवर्णयुग...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - यंदा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. या वर्षाची सुरवात दरवर्षीप्रमाणे बारावी, दहावीच्या परीक्षेने होईल. 21 फेब्रुवारीला बारावी तर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच "हॉट...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेली साडेतीनशेहून अभ्यासपूर्ण संशोधने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत (विद्या परिषद) धूळ खात पडून आहेत. त्यांचे ना दर्जात्मक विश्‍लेषण झाले, ना अन्य शिक्षकांना ती मार्गदर्शनासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत....
फेब्रुवारी 07, 2019
बालक-पालक "मला गणित अजिबात जमत नाही,' असं जेव्हा मुलगा जाहीर करतो तेव्हा बहुसंख्य पालकांना ते अजिबात पटत नाही. हलकासा धसका किंवा धक्काच. त्यांचंही बरोबरच असतं. "गणित' तसं महत्त्वाचं असतंच. अनेक अभ्यासक्रमांसाठी ते अनिवार्य असतं, पण तो पुढचा विचार सोडला, तरी शाळेत तर गणित टाळता येत नाही. ते "अजिबात...
फेब्रुवारी 07, 2019
प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - झोमॅटो’, ‘स्विगी’ आणि उबेर इट्‌सवरून जेवण मागवणे, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसभर थकल्यामुळे घरीच टीव्हीसमोर बसून आरामात खवय्येगिरीचा आनंद लुटण्यासाठी युवावर्गासह अनेकजण घरपोच जेवण व नाश्‍ता बोलावू लागले आहेत. त्याचा फटका उपराजधानीतील ‘स्ट्रीट फूड’ व्यवसायाला बसू...
जानेवारी 30, 2019
पुणे - ‘‘मातृभाषेतून शिकल्यावर कोणतेही नुकसान होत नाही; मातृभाषेत शिकताना मनावर कोणतेही ओझे नसते. परकी भाषा आधी अवगत करून मग त्यातून शिकणे जास्त अवघड असते. त्यामुळे जी भाषा समजायला सोपी, त्या भाषेतून शिक्षण घेणे अधिक सोयीचे आहे,’’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी आज येथे...
जानेवारी 29, 2019
एकाच वेळी अनेक स्तरांवर सामाजिक काम करणाऱ्यांविषयी आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असते. परंतु, काही जणांचा जीवनप्रवास समजून घेताना आदराबरोबरच कुतूहल जागं होतं. अशांपैकी मला भेटलेल्या दोन व्यक्ती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे आणि विलास चाफेकर. कोल्हे यांनी मेळघाटातील छोट्या गावात केवळ एक रुपया फी घेऊन...
जानेवारी 25, 2019
तशी मला झोपेबद्दल फार अडचण नाही, पण स्वप्नं फार पडतात नि बरीचशी काही काळ तरी लक्षात राहतात. त्याचे अर्थ काढण्याचा उद्योग मी करत नाही, जसा भविष्य वाचण्याचा करत नाही. झालं काय की थंडी वाढली नि भरपूर सर्दी-खोकला झाला. तो काही कह्यात येईना. सतत तोंड लांब नि डोळे आध्यात्मिक भाव दाखवणारे. नाकानं श्‍वास...
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...