एकूण 98 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
टाकवे बुद्रुक - अत्यल्प शेती, तीही पावसाच्या भरवशावर... लेकरांचं पोट भरायला त्यांनी गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली...आईने धुणीभांडी, तर वडिलांनी माळीकाम केले...चार लेकरांचं पोट भरता भरता त्यांना सरकारी शाळेतून शिक्षणही दिले. आई-वडील दोघे अशिक्षित. आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुली शिकल्या. तर,...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं तर जिद्द ही हवीच. मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळतेच. परीक्षेत अपयश आले, तरी खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि नियमित अभ्यासावर भर द्यायला हवा,’’ असा कानमंत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या...
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळ तालुक्‍यातून परदेशात तसेच स्थानिक बाजारपेठेत सुमारे दोन कोटी २५ लाख गुलाब फुलांची विक्री होऊन सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुक्‍यातील फूल उत्पादकांनी दिली. निर्यातीपेक्षा स्थानिक बाजारपेठेत फुलांना मिळालेला चांगला दर हे यंदाच्या...
फेब्रुवारी 15, 2019
बेबडओहोळ - मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या २०१ सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी १९८ गावांत जनजागृती करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांत ६० नोंदणीसह पवन मावळातील २८ गावांतील ग्रामस्थांनी या विवाह सोहळ्याला प्रतिसाद देत मदत व रोख स्वरूपात रक्कम...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त तळेगाव (दाभाडे) येथील फ्लोरीकल्चर पार्कमधून सुमारे ४० लाख लाल गुलाब जगाच्या विविध भागांमध्ये निर्यात झाले आहेत, तर देशांतर्गत विविध राज्यांमध्येदेखील तितकी सुमारे ४० लाख फुले पाठविण्यात आल्याची माहिती तळेगाव फ्लोरीकल्चर ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. एस. जम्मा...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे - महादजी शिंदे यांच्या २२५ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात वानवडी येथील शिंदे छत्रीस भेट देण्यात आली. या उपक्रमास इतिहासप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने दर रविवारी पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंना ‘वारसा दर्शन’ कार्यक्रमात भेट दिली जाते...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून चर्चा सुरु असतानाच आज (मंगळवार) पार्थ पवार यांनी भेटीगाठी घेत आढावा घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. ३४ गावे आणि ३७९ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे सव्वा लाख लोकसंख्या तहानलेली असून, त्यांना ५९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक १८ टॅंकर बारामती तालुक्‍यात सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ५९ टॅंकरपैकी ११ शासकीय,...
फेब्रुवारी 11, 2019
वडगाव मावळ - वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था गेल्या दहा वर्षांपासून मावळ तालुक्‍यातील तिकोना किल्ल्यावर विकासाची छोटी-मोठी कामे करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून गडाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतला आहे. या दोन्ही...
फेब्रुवारी 02, 2019
दहा तासांत २७४ मॉडेल्सची काढली २१६७ छायाचित्रे पुणे: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्रकार आकाश कुंभारने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अशा प्रकारची छायाचित्रे काढणारा आकाश हा...
डिसेंबर 28, 2018
टाकवे बुद्रुक - वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या वीरगळी अथवा वीरस्तंभ आंदर मावळात त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे. दगड अथवा लाकडी स्तंभाच्या या वीरगळी दुर्लक्षित आहे. मानवी चेहरा, कमळ, घोडा, चंद्र, तलवार या स्तंभावर कोरलेले आहे. या प्रत्येक कलेला प्रतीकात्मक असा अर्थ आहे; परंतु या...
डिसेंबर 27, 2018
नारायणगाव - रसायनअंशमुक्त (विषमुक्त) शेती उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद २०० शेतकऱ्यांना देशी गाय खरेदी व निविष्ठानिर्मितीसाठी ४५ हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दोनशे शेतकऱ्यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या...
डिसेंबर 26, 2018
वडगाव मावळ - माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या काँग्रेस प्रवेशाला व त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यास मावळ तालुक्‍यातील काँग्रेस कार्यकर्ते अनुकूल असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी ॲड. खंडूजी तिकोने यांनी दिली.  ॲड. तिकोने यांनी या बाबत अधिक माहिती देताना सांगितले...
डिसेंबर 24, 2018
पिंपरी - ‘चूल आणि मूल’ ही महिलांबाबतची संकल्पना कधीच काळाआड गेली आहे. अनेक महिला विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवित आहेत. त्यातीलच एक म्हणजे वाहनचालक. पुरुषांच्या बरोबरीने आता महिला वाहने चालवू लागल्या आहेत. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिल्या गेलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा (वाहन...
डिसेंबर 22, 2018
वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यात मूलभूत सुविधांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.  २०१८-१९ या आर्थिक वर्षात तालुक्‍यातील विविध गावांतील मूलभूत विकासकामांचे प्रस्ताव सरकारच्या ग्रामपंचायत व पंचायत राज विभागाकडे पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांना...
डिसेंबर 20, 2018
तळेगाव दाभाडे - स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक राबविलेल्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे स्वरूप बदलले. त्यांनी बसविलेली महाराष्ट्राची घडी आजही उचकटलेली नाही, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त...
डिसेंबर 17, 2018
कळस - पुणे जिल्ह्यातील वनजमिनीवरींल अतिक्रमणांवर वनविभागाने हातोडा उगारला आहे. जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, मुळशी, मावळ या तालुक्‍यांतील वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्यावर वनगुन्हे दाखल करण्याबरोबरच...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी - आलिशान मोटारीसाठी दोघांना ‘चॉइस नंबर वन’ (पसंती क्रमांक) हवा होता..., ते दोघेही एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याचे निकटवर्तीय..., लिलाव सुरू झाला..., दोघांमध्ये चढाओढ लागली... आणि अखेर एकाने ‘नंबर वन’ पटकविला... त्यासाठी मोजले तब्बल सात लाख रुपये. हौसेला मोल नाही, असे म्हणतात. मग, ती हौस...
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 11, 2018
टाकवे बुद्रुक - शिक्षणासाठी मदतीची साद घालणाऱ्या स्वप्नील मालपोटेला सामाजिक संस्था, दानशूर आणि गृहिणींनी मदतीची हात दिला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणाची वाट सुकर झाली आहे.  ‘सकाळ’मध्ये स्वप्नीलला पुढे शिकता येणार? याविषयी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत मदतीचा ओघ सुरू झाला असून,...