एकूण 265 परिणाम
ऑक्टोबर 06, 2018
मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादीच्या  कार्यालयात सुरू झाली असून, या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. सुमारे 9 तास चालणाऱया या बैठकीत आज एकूण 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा...
सप्टेंबर 27, 2018
गोवा - दिल्लीतील इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत आज पर्वरीतील सचिवालयात मंत्रिमंडळ बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन सुरळीत न चालण्यावर झाला असल्याचे मत मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. राज्याचे प्रशासन सुरळीत चालण्यासाठी दर बुधवारी...
सप्टेंबर 27, 2018
कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राजाराम सहकारी साखर कारखान्यासह जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा याच आठवड्यात होत आहे. या सभा होण्यापूर्वीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर या तिन्ही संस्थांच्या सभांचे पडसाद उमटणार...
सप्टेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना देशात नव्या राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे. २० जून ते १८ ऑगस्ट २०१८ या दरम्यानच्या अवघ्या ६५ दिवसांत निवडणूक आयोगाकडे तब्बल ३२ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. निवडणूक जवळ येईल तशी राजकीय पक्षांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. राजस्थान...
सप्टेंबर 14, 2018
सटाणा : महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल आज शुक्रवार (ता. १४) रोजी बागलाण तालुका कॉंग्रेस कमिटी व बागलाण तालुका युवक कॉंग्रेसतर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून एकच जल्लोष करण्यात आला.  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई - लोकसभा आणि विधानसभेला एकापेक्षा अधिक मतदारसंघांतून उभे राहण्याच्या उमेदवाराच्या प्रयत्नांना आता चाप बसणार आहे. दोन्ही मतदारसंघांतून निवडून येणारे आणि नंतर एका मतदारसंघाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लादणाऱ्या उमेदवारांकडून त्या निवडणुकीचा खर्च वसूल केला जाणार आहे. या संदर्भातील महत्त्वाची...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
ऑगस्ट 29, 2018
मोखाडा (पालघर) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप विद्यार्थी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष सन्नी सानप यांनी पालघर जिल्हा विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश येलमामे यांची निवड केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून...
ऑगस्ट 13, 2018
महाड : ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. यासाठी 9 ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे.  ऑक्टोबर 2018 ते एप्रिल 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
जुलै 17, 2018
सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात...
जुलै 15, 2018
मंगळवेढा : गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंके पाटील यांनी जाहीर केल्या पण या निवडीने मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली. शहर व तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना पक्षाला...
जुलै 02, 2018
चिपळूण - पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे महासचिव सुनील तटकरे यांच्याएैवजी परभणीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांना उमेदवारी निश्‍चित झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे....
जून 27, 2018
अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. एसजी मार्गवरील एसजीव्हीपी गुरुकुल येथे आयोजित भाजपच्या चिंतन शिबिरात अमित शहा यांनी 2014 प्रमाणेच 2019 च्या निवडणुकीत गुजरातमधील सर्वच्या सर्व 26...
जून 02, 2018
मुंबई  - भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यास अवघ्या नऊ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी भीती असल्याने युतीबाबत फेरविचार करावा, अशी भूमिका शिवसेनेतील एका गटाने घेतली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयधोरणांविरोधातील संयुक्त आघाडीत शिवसेनेला जागा...
मे 31, 2018
कैराना - उत्तर प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती आले आहेत. त्यावर देशाचे विभाजन करणाऱ्या प्रवृत्तींचा हा पराभव असल्याचे मत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे. कैराना आणि नूरपुरच्या जनतेचे, तसेच कार्यकर्ते आणि सगळ्या भाजपविरोधी एकत्र आलेल्या पक्षाचे हे यश आहे...
मे 31, 2018
मुंबई - नेत्यांची फोडाफोडी, मतदानाच्या टक्‍केवारीचा वाद आणि मतदान यंत्रातील घोळामुळे गाजलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या उद्या (गुरुवारी) जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  मतदान यंत्रातील बिघाडामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघात आज 49 मतदान...
मे 29, 2018
भंडारा/पालघर - भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आज अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया खोळंबली. ईव्हीएममधील बिघाडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना बंद मशिनच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांची दमछाक झाली. पालघर मतदारसंघात...
मे 28, 2018
विजयवाडा : भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याची चर्चा देशभर सुरू असताना तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) वेगळीच भूमिका घेतली आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी हे 'संयुक्त आघाडी'तर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे आम्हाला मान्य नाही. आंध्र...
मे 27, 2018
वाल्हेकरवाडी  : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या छायाचित्र व बातम्याचे प्रदर्शन पिंपरी-चिंचवड येथील नितीन चिलवंत यांनी बालगंधर्व कलादालन  पुणे येथे दि. २७, २८, २९ रोजी भरविले आहे. या...