एकूण 16104 परिणाम
नोव्हेंबर 28, 2016
तिरुअनंतपुरम - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ माकप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. गेल्या 42 वर्षांपासून ते संघात सक्रिय होते आणि विविध पदांवर त्यांनी काम...
नोव्हेंबर 27, 2016
कोइमतूर : चप्पल दुरुस्त करणाऱ्या चांभाराला केंद्रीय कपडा मंत्री स्मृती इराणी यांनी दुरुस्तीची किंमत म्हणून चक्क शंभर रुपये दिले. वास्तविक त्या चांभाराने केवळ दहा रुपयांचीच मागणी केली होती. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  ईशा फाउंडेशनच्या एका कार्यक्रमाला आल्यानंतर स्मृती इराणी यांची चप्पल...
नोव्हेंबर 27, 2016
इस्लामाबाद - भारतापेक्षा पाकिस्तानला मूलतत्त्ववाद्यांचा धोका अधिक आहे. हा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कमार जावेद बाज्वा यांनी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल बाज्वा यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुखपदी नियुक्ती...
नोव्हेंबर 27, 2016
तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत; तसेच उद्योजक बनण्याचे कौशल्य त्यांच्यात निर्माण व्हावे, यासाठी ख्यातनाम परदेशी विद्यापीठांशी करार करण्यात येत आहेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) गुणी सदस्यांनाही ही संधी मिळणार आहे. ती त्यांनी सोडू नये, असे अभिजित पवार यांनी येथे सांगितले.  इस्राईलमधील...
नोव्हेंबर 27, 2016
ग्रीनलॅंडचं नाव वस्तुतः ‘आइसलॅंड’ असायला हवं होतं; पण ते ग्रीनलॅंड कसं पडलं याची कहाणी मोठी गमतीदार आहे. गुलामाचा खून केला म्हणून एरिक द रेड या नॉर्वेजियन माणसाला सन ९८२ मध्ये आइसलॅंडमधून हद्दपार करण्यात आलं होतं. तो आइसलॅंडच्या वायव्येकडच्या एका फिओर्डच्या ठिकाणी येऊन राहिला व शेती करू लागला. चार-...
नोव्हेंबर 27, 2016
सांगली : पाचशे व हजाराच्या नोटाबंदीनंतर पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी 83 लाखांची रोकड जप्त केली. रोकड जप्त केल्यानंतर प्राप्तीकर विभागाला कळवून केवळ पोलिस नामानिराळे राहिले असे चित्र दिसते. त्यामुळे आता प्राप्तीकर विभागाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे रोकड जप्त प्रकरणात काही...
नोव्हेंबर 27, 2016
मुंबई : मोहापासून दूर राहून सामाजिक कार्याचा वसा घ्या. तुमच्या प्रत्येक कृतीमागे समाजाचे हित आणि संविधानाचे भान असले पाहिजे, असा मोलाचा सल्ला माजी न्यायमूर्ती धनंजय देशपांडे यांनी दिला. समाजकारणातून राजकारणाचे धडे गिरवण्याची सुरुवात करण्यास सज्ज असलेल्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन)...
नोव्हेंबर 27, 2016
नागपूर : बालभारतीच्या पुस्तकांमध्ये 'क्‍यूआर कोड'चा वापर विद्यार्थ्यांना सहजरीत्या मोबाईलवर वाचण्यासाठी देण्याचे काम करण्यात आले. सोलापूरचे तंत्रस्नेही शिक्षक रणजित डिसले यांनी तयार केलेल्या 'क्‍यूआर कोड'ला आता परदेशातही मागणी आहे. त्यांच्या 'कोडेड टेक्‍स्ट बुक'चा प्रयोग थायलंड आणि मलेशिया...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावर टीका करत सिब्बल यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज असून देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मिनाक्षी...
नोव्हेंबर 26, 2016
वाचलेलं पुस्तक काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं, पूर्वी पाहिलेला चित्रपट काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं यात पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळत असतोच, पण त्या कलाकृतींचा दीर्घ काळानंतर पुन्हा आस्वाद घेताना त्यांचं आकलन पुन्हा नव्यानं होतं, त्यांची उंची- खोली नव्यानं समजते, उथळपणाही नव्यानं समजतो आणि पूर्वी...
नोव्हेंबर 26, 2016
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज (ता. 26) अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. आता उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या राजकारणाची दिशा काय राहील, त्यांच्या चलनबंदीच्या निर्णयाचे काय परिणाम होतील, या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न. केंद्रातील आपल्या सरकारची निम्मी कारकीर्द पूर्ण...
नोव्हेंबर 26, 2016
मुंबई : केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर जिल्हा सहकारी बॅंकांवर घातलेल्या निर्बंधांबाबत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेच्या स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर...
नोव्हेंबर 26, 2016
वेंगुर्ले ः ""माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे; मात्र भाजप कोणावरही आकसाने कारवाई करीत नाही,'' असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. येथील पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी श्री. पाटील येथे आले होते....
नोव्हेंबर 26, 2016
चिपळूण ः रमेश कदम शिवसेनेच्या संपर्कात होते, यात तिळमात्र शंका नाही. ते किती आव्हाने अथवा प्रतिआव्हाने देवोत, शिवसेनेची दारे त्यांनी ठोठावली होती, हे मी ठामपणे सांगू शकतो. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ही बाब सौम्यपणे सांगितली. मी, कदम यांच्या "पावलां'चा साक्षीदारच आहे,' अशा शब्दांत रमेश कदम...
नोव्हेंबर 26, 2016
पुणे : अंतिम प्रभागरचनेत जाहीर झालेल्या बदलामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीला काही ठिकाणी फायदा तर काही ठिकाणी फटका बसण्याची शक्‍यता आहे.  धनकवडीमध्ये माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी गटनेते वसंत मोरे स्वतंत्र पॅनेलमधून परस्परांविरुद्ध रिंगणात येतील. सिंहगड...
नोव्हेंबर 26, 2016
नवी दिल्ली : प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने "एनसीआर'सह संपूर्ण दिल्लीत फटाक्‍यांच्या विक्रीवर आज बंदी घातल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर फटाक्‍यांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करा, असा आदेशही न्यायालयाने केंद्रीय प्रदूषण...
नोव्हेंबर 26, 2016
पुणे : धुवाधार पाऊस पडूनही पावसाळा संपताच थेंब थेंब पाण्यासाठी पानवडी आसुसलेली असायची. रुद्रगंगाही दिवाळीच्या आसपास शांत व्हायची... अन्‌ मग हंडाभर पाण्यासाठी बाया-बापड्यांची डोंगरकपारीत भटकंती सुरू व्हायची. वर्षानुवर्षांचं हटकून दिसणारं हे चित्र बदलायचं, असं तनिष्कांनी ठरवलं. दोन वर्षांच्या अथक...
नोव्हेंबर 26, 2016
नाशिक : चलन तुटवड्यातून व्यापाऱ्यांनी मार्ग काढत शेतकऱ्यांना धनादेश, ऑनलाइन बॅंक खात्यात पैसे देण्यास सुरवात केली असताना नाशिकमधून दिवसाला 12 हजार टन कांद्याची निर्यात होऊ लागली आहे. आठवड्यानंतर वाहतुकीसह सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर आठवड्याला देशांतर्गत 40 हजार टन कांदा पाठविण्याचा मार्ग मोकळा...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई -  अस्पृश्‍यविरोधी लढा आणि आंबेडकर चळवळीत महत्व असलेल्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोध करणाऱ्या खटल्याचा तपशीलवार माहिती देणारा खंड राज्य सरकारच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती वर्षाच्या निमित्ताने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केला जाण्याची शक्‍यता आहे...
नोव्हेंबर 25, 2016
मुंबई : राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांनी व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1400 कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची, तर त्यानंतर पुणे महानगरपालिका...