एकूण 22314 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी (ता.१८) सकाळपासून धुकट वातावरण दिसून येत होते. शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षाही अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका जाहीर...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा यकृताचा आजार बळावल्याने त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात असतानाही अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांना रविवारी (ता.२०) रुग्णालयातून घरी सोडण्याची शक्‍यता आहे. अनेक चाहत्यांनी त्यांना ‘लवकर...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील (पीएमसी बॅंक) गैरव्यवहाराच्या प्रकरणात एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राला अटक करण्यात आली. विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी त्यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात दिले.  विशेष न्यायाधीश पी. राजवैद्य यांनी...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई:  जगातील निम्म्याहून अधिक जनता ही शहरांत राहते आणि 2050 पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक नागरिक शहरांकडे कूच करणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सिटी उभारण्यास फायदेशीर ठरणार असून सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या "स्मार्ट एशिया' प्रदर्शनात स्मार्ट सिटी पर्याय...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - ‘तुमच्या आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा निर्णय घेण्याची संधी पाच वर्षांनी येते. आता जर सुज्ञपणे मतदान झाले नाही, तर निर्दयी बहुमत तुम्हाला चिरडून टाकेल. तेव्हा मतदानाला जाण्यापूर्वी हे ऐका. तुमची स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या,’’ असे आवाहन राज ठाकरे...
ऑक्टोबर 19, 2019
राज्यात ९१ हजार जणांवर कारवाई; ६० कोटींची रोकड, दारू जप्त मुंबई - निवडणुकांच्या काळात समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात अफवांचे पीक उगवते. अशा ‘फेक न्यूज’, अफवा व ४०० प्रक्षोभक पोस्ट राज्य सायबर विभागाच्या रडारवर आल्या असून, त्यांची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात ९१...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई: चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली असला तरी दुसऱ्या सहामाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.  खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाल्यास ओघ...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सोमवारी (ता. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर विधानसभेतील उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल फोन, कॅमेरा, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गॅझेट...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले....
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
आपला मेकओव्हर करण्यासाठी बॉलीवूडमधील सगळेच अभिनेते आणि अभिनेत्या काहीना-काहीतरी करत असतात. कोणी आपल्या जबड्याचं ऑपरेशन तर कुणी आपल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी. याच यादीत आता बॉलीवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीचं नाव पुढे आलंय. ही अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा. हो, पुन्हा एकदा अनुष्काने आपला नवा लुक...
ऑक्टोबर 18, 2019
डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय. वयाच्या 80 व्या वर्षातही तरुणांनाही लाज वाटेल, असा उत्साह त्यांच्यात दिसून आला. साताऱ्यात झालेल्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : ''आमच्यासमोर कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाही. शेंडाही नाही आणि बुडकाही नाही अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, तर राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर है, आधे उधर है अशी झाली आहे. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यामुळे महाराष्ट्राने गेल्या पाच...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलूंड येथे ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पीएमसीच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाला असून आजची ही चौथी घटना आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी बॅंकेतून पैसे काढता न...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदान व मतमोजणी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील 224 सराईत गुन्हेगारांना या काळात शहरात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र मतदानाच्या दिवशी त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यात आला आहे. मनाई आदेशाचा...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : मलबार हिल भागात 14 वर्षांपूर्वी पाच जणांनी काही हजारांसाठी मित्राचीच हत्या केली होती. मारेकऱ्यांनी त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून चादरीत बांधले आणि गाठोडे राजभवनामागील समुद्रात फेकून मुंबईबाहेर पळ काढला होता. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी दोन आरोपींना दिल्लीतून अटक केली आहे.  नौदलाच्या...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महाडमध्येही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.  भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना देण्यात...
ऑक्टोबर 18, 2019
कर्जत: मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने महाआघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. खोपोली, खालापूरनंतर गुरुवारी सायंकाळी आमदार लाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नेरळ शहरातून भव्य प्रचारफेरी काढली.  येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते तथा माजी सरपंच भगवान चंचे...