एकूण 741 परिणाम
जुलै 12, 2019
वाशी -  ‘एपीएमसीत कचऱ्यामुळे दुर्गंधी’ या मथळ्याखाली गुरुवारी (ता.११) ‘सकाळ’च्या नवी मुंबई टुडे या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत भाजीपाला व फळबाजार परिसर स्वच्छ केला.  एपीएमसी परिसरात उघड्यावर भाजीपाला व फळे टाकली जातात. पावसामुळे हा भाजीपाला व फळे सडून...
जुलै 11, 2019
नवी मुंबई : आगीच्या घटनांमध्ये होरपळून अनेकांचा जीव धोक्‍यात आल्यानंतरही इमारतींमधील आग प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या तब्बल 579 इमारतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दणका दिला आहे. रहिवासी, वाणिज्यिक, शाळा, रुग्णालये, मॉल, हॉटेल व लॉन्ड्री आदी इमारतींचा यात समावेश आहे. येत्या...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
जुलै 10, 2019
मुंबई : तुर्भे पोलिसांनी बुधवारी (ता. 10) पहाटे तुर्भे एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या गोडाऊनवर छापा मारुन त्याठिकाणी पूर्वीपासून साठवून ठेवलेला व एका मोठया कंटेनरमध्ये आढळून आलेला तब्बल सव्वाकोटी रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. हरियाणा राज्यात पाठवण्यासाठी आलेला मद्याचा साठा तब्बल 60 लाख...
जुलै 09, 2019
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सध्या आपल्या विचित्र वागण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. जजमेंटल है क्‍या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेवेळी सोमवारी कंगनाने एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीवर नाहक टीका केली. तिच्या पाठाेपाठ तिची बहीण रंगोली हिची जीभ पुन्हा घसरली आहे. तिने माध्यमांच्या प्रतिनिधींना थेट विकाऊ...
जुलै 09, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू आणि मातामृत्यूला आळा घालण्यात यंत्रणांना काही अंशी यश आले असले, तरी त्याचा आलेख आणखी खाली आणण्यासाठी गंभीर बालक व माता यांच्यावर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आहे त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी नवी टेलीमेडिसीन उपचार पद्धती सुरू करण्याची संकल्पना माजी...
जुलै 09, 2019
नवी मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर चोरांचा सुळसुळाट वाढला असून दोन दिवसांत जुईनगर आणि नेरूळ रेल्वेस्थानकाजवळ लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.   शुक्रवारी (ता. 5) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आनंदराव माने नेरूळ...
जुलै 09, 2019
मुंबई : पनवेलच्या भंगारपाडा परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. प्रेम सुभाष चव्हाण (19) असे या तरुणाचे नाव असून, न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.  घटनेतील अल्पवयीन मुलगी व आरोपी प्रेम चव्हाण या दोघांचे कुटुंबीय...
जुलै 09, 2019
मुंबईः नवी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने तुर्भे परिसरातील दगडखाण वसाहतींना पुरते धुवून काढले. पावसाच्या जलप्रलयाने तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गाव व ओमकार शेठ, पेंटर शेठ क्वारी येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने पालिका आयुक्त डॉ एन रामस्वामी यांनी आज मंगळवारी (ता. 9)...
जुलै 09, 2019
खारघर : बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावर येत्या डिसेंबर महिन्यात मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असून मेट्रोचे सहा डब्बे पुढील महिन्यात येणार असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सकाळशी बोलताना सांगितले. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचे काम 2011मध्ये सुरू करण्यात आले. गेल्या नऊ...
जुलै 09, 2019
वाशी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय कक्षात असणाऱ्या उपाहारगृहामध्ये कर्मचारी जेवण करत असताना अन्नामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार शनिवारी (ता.6) सायंकाळी घडला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपाहारगृहांच्या स्वयंपाकगृहामध्ये पाहिले असता बेसिनमध्ये मृतावस्थेतील उंदीर पाण्यावर तरंगतना आढळून...
जुलै 09, 2019
वाशी - पाऊस आणि कांदाभजी हे ठरलेले समीकरण. पावसाला सुरुवात झाल्यामुळे हॉटेल, स्टॉल, घरांत कांदाभजीच्या फर्माइशी वाढल्या आहेत. परंतु, हा आनंद फार काळ टिकण्याची शक्‍यता नाही. मान्सून सुरू झाल्यापासून राज्यभरातून कांद्याची आवक रोडावली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर किलोमागे पाच रुपयांनी वाढले...
जुलै 08, 2019
ठाणे:  देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. याच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल...
जुलै 08, 2019
मुंबई : रिक्षा चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यावर आज (सोमवार) परिवहन सचिव यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, तासभर चर्चा होऊन देखील काही तोडगा निघू शकला नाही. अखेर बैठक निष्फळ ठरली असून, रिक्षा चालक-मालक बेमुदत संपावर जाण्यासाठी ठाम आहे.  राज्यातील ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना...
जुलै 08, 2019
रत्नागिरी - संवेदनशील हापूस वातावरणातील बदलांच्या तडाख्यात सापडतो. हापूसला परदेशात मोठी मागणी असून अमेरिकेतील निर्यातीचा टक्‍का दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रारण प्रक्रिया (irradiation) करून निर्यात होते. कोकणातून थेट निर्यातीसाठी प्रारण केंद्र जैतापूर येथे झाले, तर निश्‍चितच त्याचा फायदा होऊ शकतो...
जुलै 07, 2019
खारघर : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरातून   झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्यात मनसोक्त भिजून पर्यटकांनी पावसाचा आनंद घेतला. रविवार सुट्टीचा दिवस आणि सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पाऊस चालू होता. गोल्फ कोर्स लगत असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारा आणि धामोला नाल्यात  भिजण्यासाठी...
जुलै 05, 2019
नवी मुंबई - कळंबोलीतील सुधागड शाळेजवळ टाइम बाँब ठेवणाऱ्या त्रिकुटाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शाळेजवळ राहणाऱ्या एका विकसकाकडून दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने त्याला धमकावण्यासाठी त्याच्या घराजवळ कमी क्षमतेचा बाँबस्फोट घडविण्याचा त्यांचा कट होता. या तिघांपैकी एकाच्या घरातून...
जुलै 03, 2019
मुंबई : मालाड परिसरात रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यात सोमवारी रात्री चारचाकी अडकल्यामुळे दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. इरफान खान व गुलशन शेख अशी मृतांची नावे आहेत. रेल्वेमार्गाखालील सब-वेमध्ये साठलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी बंद पडली. इंजिन बंद पडल्यामुळे आणि पाण्याच्या...
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...
जुलै 02, 2019
मुंबई : मुंबईत पावसाचा जोर कायम असुन गेल्या 24 तासात शहरात 400 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.गेल्या 40 वर्षातील हा रेकॉर्ड असून 1974 मध्ये आणि त्यानंतर 2005 मध्ये अश्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला होता.यानंतर आजचा पाऊस हा मुंबईच्या इतिहासातील दोन क्रमांकाचा पाऊस झाला आहे. तीन तासांत कुठे...