एकूण 52 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
ठाणे : अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वत्र पोलिस उभे करणे शक्‍य नसल्याने परदेशातील पद्धतीनुसार मोठा गाजावाजा करून ठाणे शहरात सीसी टीव्हींचे जाळे उभारण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हे सीसी टीव्ही उभारण्यात आले आहेत. ठाण्यातील नगरसेवकांच्या निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन बसविण्यात...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. मुंबई...
नोव्हेंबर 07, 2019
ठाणे : शहरातील अनेक पदपथ म्हणजे टपऱ्या उभारण्याचे ठिकाण झाले होते. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही त्यावर कारवाई होत नव्हती. याबाबतच्या तक्रारी वाढून पदपथ चालण्यासाठीही शिल्लक राहिले नसल्याची दखल घेऊन अखेर शहरातील पदपथ तीन दिवसांत मोकळे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर...
नोव्हेंबर 06, 2019
ठाणे : जुने पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अनेक रेल्वे स्थानकातील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु महिनोंमहिने या पुलांच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील पादचारी पुलाच्या दुरुस्तीविषयी नागरिकांनी...
नोव्हेंबर 05, 2019
कळवा : दिवाळी संपून आठवडा उलटत आला तरी कळवा बाजारपेठ परिसरातील गावदेवी मैदानावर फटाके दुकानदारांनी केलेला केरकचरा महापालिकेच्या स्वच्छता विभागाने उचललेला नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सुट्टीत या मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या बच्चेकंपनीचा हिरमोड झाला आहे. हा कचरा त्वरित साफ करण्याची मागणी येथील...
नोव्हेंबर 04, 2019
ठाणे : स्मार्ट शहराकडे झेपावणाऱ्या ठाणे शहराला लागलेले कोंडीचे ग्रहण सोडवण्यासाठी दीड वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या वागळे इस्टेट रस्ता क्र. 33 वरील ज्ञानेश्‍वर नगर ते कामगार रुग्णालय या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काहीअंशी पूर्ण झाले; मात्र कॉंक्रीटचा रस्ता उभारताना भूमिगत जलवाहिनी बाधित झाल्याने...
नोव्हेंबर 01, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत 2015 मध्ये 27 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या परिसरातील ग्रामस्थांनी या निर्णयाला सातत्याने विरोध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची घोषणाही केली होती. परंतु चार वर्षे उलटून गेल्यानंतरही...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 10, 2019
भिवंडी : वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा मोटरसायकलस्वारांनी हेल्मेट वापरावे, मोटार वाहनचालकांनी सीट बेल्ट लावून प्रवास सुखकर करावा, असे लोकोपयोगी संदेश भिवंडी वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. ९) दुपारी प्रतीकात्मक गणपतीद्वारे वाहनचालकांना दिले. संदेश देतानाच ते वाहनचालकांच्या हातात मोदकही...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर...
ऑगस्ट 22, 2019
नवी मुंबई : शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या वेगासोबत विकासाच्या गतीचा ताळमेळ बसवा, याकरीता महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांवर भर दिला आहे. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही गती मंद होऊ नये, म्हणून तब्बल ५८३ कोटींची विकासकामे सर्वसाधारण सभेत...
ऑगस्ट 21, 2019
  ठाणे : घोडबंदर रोडवरील थीम पार्कच्या चौकशी अहवालाचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. अशावेळी लोकमान्यनगर येथील बॉलीवूड पार्कमधील आठ कोटींची शिल्पे गेली कुठे? असा प्रश्न आजच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. पण यावेळी थीम पार्क, बॉलीवूड पार्क या दोन्ही विषयाची सरमिसळ झाल्याने आठ...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुंबई पालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. समाज माध्यमांद्वारे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पालिकेचा प्रयत्न असून, आता केवळ एका क्‍लिकवर नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. पालिका या कामासाठी महाराष्ट्र माहिती...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : मुंबईत आग लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून यातील जास्त घटना या शॉर्टसर्किट झाल्यामुळे होत असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे मुंबईत १ ऑक्‍टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९  या केवळ सहा महिन्यांच्या काळात आग लागणे, घरांची पडझड अशा एकूण चार हजार ३१८ घटना घडल्या असून त्यात आगीच्या एक...
ऑगस्ट 14, 2019
ठाणे : वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता यावा यासाठी शहरातील रस्त्यांचे वारंवार रुंदीकरण करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. फेरीवाल्यांचा त्रास तर नवीन नाही पण आता पुन्हा गॅरेजधारक आणि कार डेकोर दुकानदारांनी पुन्हा एकदा रस्त्याचा ताबा घेण्यास सुरुवात केल्याने...