एकूण 1389 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर मंगळवारी (ता. ८) विजयादशमीच्या दिवशी शहरात देवीचे विर्सजन करण्यात आले. नऊ दिवस-रात्र देवीच्या मंडपासमोर दांडिया खेळत देवीचा जागर करण्यात आला; तर विजयीदशमीच्या दिवशी विर्सजनाच्या वेळी ढोल-ताशांच्या निनादात बेधूंद होऊन, भक्तांनी नाचत विर्सजन मिरवणूक काढून...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली....
ऑक्टोबर 09, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री यांची इंडोनेशिया (बाली) येथे ९ ते १६ आक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या जागतिक आशियाई शिकारी पक्षी संशोधन-संवर्धन परिषदेत ‘गिधाड’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी निवड करण्यात आली आहे.  जगातील ६० ते ७० देशांतून विविध शिकारी पक्षांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतणाऱ्या केलेल्या भाषणामुळे ऐरोलीतील शिवसेना-भाजप महायुतीच्या भिंतींना तडे गेल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना राऊत यांनी नवी मुंबईचा उल्लेख करून माजी मंत्री गणेश नाईक...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 07, 2019
कर्जत (बातमीदार) : कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा सोमवारी (ता. ७) होणार आहे. हा मेळावा कर्जत दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडीच्या प्रचाराची रणनीती...
ऑक्टोबर 04, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली सेक्‍टर ६ येथील माजी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते ऐरोली विभाग कार्यालयापर्यंत प्रचार...
ऑक्टोबर 03, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय उद्योजकांचा दबदबा निर्माण झाला आहे. हे जरी वास्तव असले तरी गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दरवर्षी या संघटनेच्या अध्यक्षपदी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : उच्च दाब वीजवाहिन्यांखालील जागेचा वापर करण्यास महापारेषणने मनाई केलेली असतानाही नवी मुंबई महापालिकेसह सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उच्चदाबाच्या वीजवाहिनीखाली नागरिकांचा वावर; तसेच बांधकाम केले जाऊ नये, अशी सूचना महापारेषणच्या वतीने देण्यात येते. तशा आशयाचे...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : गणेशोत्सवानंतर अगदी आतुरतेने वाट पाहिली जाते ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. यंदा नवरात्रोत्सवास रविवार पासून सुरुवात झाली. उत्सवासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी भक्त बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत; मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शेवंतीचे दर वाढले असल्याने फुलांचा...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने तलाव व्हिजन अंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण करताना गाळ काढणे, गॅब्रीयन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर २० कोटींहून अधिक खर्च केला आहे. मात्र, देखभालीअभावी या तलावांचे विद्रूपीकरण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या तलावांमध्ये कपडे धुण्यास सक्त...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर १५ मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल २७ वर्षांपासून वापरात नसल्याने ही इमारत जीवघेणी झाली आहे. हे ठिकाण गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असून येथे अनैतिक उद्योगही सुरू असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी पावसामुळे मोडकळीस आलेल्या...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणारा सायन-पनवेल...
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने...
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर होत असलेली "वाहतूक कोंडी' ठाणेकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. कोंडीच्या या नियमित त्रासातून सुटका होण्याची चिन्हे दिसत असतानाच, शुक्रवारी ईडीच्या निषेधार्थ मुंबईकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या...