एकूण 756 परिणाम
एप्रिल 06, 2017
नवी मुंबई - बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. कामावर उशिरा येणारे लेटलतीफ, ओळखपत्र न घालणे व जेवणाच्या वेळेत टाईमपास करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर...
एप्रिल 05, 2017
नवीन पनवेल - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल महामार्गालगतचे २३० बार व देशी बार बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत; तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पनवेल उरण परिसरातून तब्बल दीडशे कोटींचा महसूल बुडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - शिर्डीत रामनवमीच्या दिवशी मोठा उत्सव केला जातो. याच पार्श्‍वभूमीवर शहरातील राम मंदिरांबरोबरच साईबाबा मंदिरांतही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. करावे गावातील साई वाडीमधील साईबाबा मंदिरातही रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले...
एप्रिल 05, 2017
नवी मुंबई - तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर गावठाणांसह शहरातील भूमाफियांनी डोके वर काढले असून बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू केला आहे. घणसोलीतील गोठिवली, ऐरोली, कोपरखैरणे येथील बेकायदा इमारतींची थांबलेली बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांतील कर्मचारी...
एप्रिल 05, 2017
उलवा - ‘भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातोय, विकास म्हणजे नेमके काय, हेच काहींना कळत नाही. विकासात भूमिपुत्रांना प्राधान्य हवेच, शहरी संस्कृतीत गावपण लोप पावता कामा नये, त्यासाठी गावकऱ्यांनी मतभेद विसरून एकजुटीने राहायला हवे’, असे मत ‘साम टीव्ही’चे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले. ते ‘मशाल’ सामाजिक...
मार्च 25, 2017
मुंबई - नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी मुद्रांक शुल्क विभागाचे महासंचालक एन. रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मुंडे यांच्याबरोबर आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केल्या आहेत.  नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे...
मार्च 22, 2017
नवी मुंबई - कलेद्वारे समाजाचे मनोरंजन, प्रबोधन करणारे कलावंत काळाच्या ओघात दुर्लक्षित होतात. या कलावंतांसाठी राज्य सरकार दत्तक योजना सुरू करणार आहे, अशी घोषणा मंगळवारी (ता. 21) सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य...
मार्च 21, 2017
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी; नगरसेवकांची समजूत नवी मुंबई - स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर "मातोश्री'वर गेल्यानंतर मिटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी...
मार्च 20, 2017
नवी मुंबई - स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षाचे नेते विजय चौगुले यांच्यातील वाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उफाळून आला. महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडताना केलेल्या भाषणात सभापती पाटील यांनी चौगुले यांचे नाव न घेतल्याने शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला; तर...
मार्च 20, 2017
नवी मुंबई - प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी नवी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनांचे पडसाद शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. राष्ट्रवादीचे विनोद म्हात्रे यांनी दिलेल्या लक्षवेधीवरून सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. राज्याच्या नगरविकास खात्यातर्फे मुंबई महानगर प्रदेश...
मार्च 17, 2017
नवी मुंबई - विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेल्या उपोषणाला तीन दिवस उलटल्यानंतर गुरुवारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाशी सरकारने चर्चा केली. या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. मात्र सरकारने केवळ जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचे...
मार्च 10, 2017
नवी मुंबई -  महापालिकेकडून सर्वाधिक कामे ए. के. इलेक्‍ट्रिकल्सला देण्यात येत असून, त्यांची कामे असमाधानकारक आहेत. त्यामुळे त्यांची कंत्राटे रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली. दरम्यान, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत शहरातील 14 कोटींच्या...
मार्च 10, 2017
नवी मुंबई - फळांचा राजा म्हणजे कोकणचा हापूस अशी ओळख असलेल्या आंब्याला यंदा केरळ, कर्नाटकच्या आंब्यांकडून कडवी टक्कर मिळत आहे. परराज्यातील परंतु मूळचा कोकणचा असलेल्या या आंब्यांची चव आणि कमी असलेल्या किमती कोकणातील हापूसला मात देत आहेत. यामुळे या आंब्याची किंमत जवळपास चाळीस टक्‍क्‍यांनी घसरली आहे. ...
मार्च 08, 2017
ठाणे - वेदनेनंतरची पहिली आरोळी म्हणजे "आई'. प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठीच जगत असते. त्यांचे आयुष्य उजळवण्यासाठी स्वत: अंधाराचा सामना करत असते. अशाच प्रकारे इथल्या एका आईने मुलाला किडनी दान करून पुनर्जन्म दिला.  शिळ डायघरजवळील नारिवली गावातील भीमाबाई धनाजी गोरपेकर (46) यांनी आपली एक किडनी...
मार्च 04, 2017
मुंबई / नवी मुंबई - अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. वांद्रे पश्‍चिमेकडील अपक्ष नगरसेविका मुमताज खान यांनीही भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 84 वर पोचले आहे. दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या मध्यस्थीमुळे गवळी यांनी भाजपसोबत जाण्याचा...
मार्च 04, 2017
नवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले. बारावीचा गुरुवारचा (ता.2) मराठीचा पेपर फुटल्याची अफवा सोशल साईटवर पसरली होती. काही सोशल साईट्‌सवर मराठीच्या प्रश्‍नपत्रिकेचे...
फेब्रुवारी 27, 2017
बेलापूर - मुंबईचे महापौर शिवसेना-भाजपने अडीच- अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि युतीचा तिढा आपापसात सोडवावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. बेलापूर येथील गोवर्धनी सेवा संस्थेच्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. ...
फेब्रुवारी 24, 2017
नवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल केले असल्याची...
फेब्रुवारी 20, 2017
नवी मुंबई - उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 35 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या घरामागे एका वाहनतळ अनिवार्य असेल, तरच बांधकाम परवानगी देण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. महासभेने मंजुरी दिल्यास लहान आकाराची घरे अडचणीत येतील, असा दावा नगरसेवकांनी केला. तर महापालिकेच्या...
फेब्रुवारी 18, 2017
कोपरखैरणे - नवी मुंबई पोलिसांना काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, महिनाअखेरपर्यंत मिळणाऱ्या पगारासाठी आता १० तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे, तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनियमित पगाराबरोबरच विविध बिलेही रखडली आहेत. या परिस्थितीत दर महिन्याच्या शेवटी घरातील आर्थिक ओढाताण...