एकूण 1420 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
बेलापूर - मुंबईचे महापौर शिवसेना-भाजपने अडीच- अडीच वर्षे वाटून घ्यावे आणि युतीचा तिढा आपापसात सोडवावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. बेलापूर येथील गोवर्धनी सेवा संस्थेच्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. ...
फेब्रुवारी 27, 2017
नांदेड : मुंबई महापालिकेत कॉंग्रेस अाणि राष्ट्रवादीची संख्या मर्यादीत अाहे. मुंबईमध्ये महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी (ता. २६) नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण भाजप...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबईच्या नव्या महापौराला आता समुद्राची हवा अनुभवता येणार नाही. महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू झाल्यावर सध्याचे दादरमधील महापौर निवास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नव्या महापौराला आता भायखळ्यामधील राणीच्या...
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीला पक्षांतर्गत दुफळीसह सामोरे गेलेल्या कॉंग्रेसमध्ये निवडणुकीनंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरूनही विसंवाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत सशर्त पाठिंबा देण्याचे सूचित केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा...
फेब्रुवारी 26, 2017
महापालिका निवडणुकीत सुमारे 88 हजार नोटा मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा तब्बल 87 हजार 719 मतदारांनी नन ऑफ द अबाव्ह अर्थात नोटाचा (NOTA) वापर केल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. ठाणे महापालिकेतही 81 हजार 888 मतदारांनी या पर्यायाचा वापर केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे....
फेब्रुवारी 26, 2017
मुंबई - दोन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावर झालेल्या लोकलच्या गोंधळप्रकरणी मोटरमन चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. सिग्नलकडे दुर्लक्ष करून लोकल भलत्याच ट्रॅकवर नेल्याने गर्दीच्या वेळी रेल्वे सेवेचे बारा वाजले. आपत्कालीन ब्रेक यंत्रणा सुरू झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला...
फेब्रुवारी 25, 2017
गुप्त वाटाघाटी सुरू मुंबई: मुंबई महापालिकेत 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत गुप्त वाटाघाटी सुरू केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍...
फेब्रुवारी 25, 2017
मातब्बर नगरसेवक हारले; "मॅजिक फिगर'चे स्वप्न भंगले मुंबई - अटीतटीच्या झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर- मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा जोमाने फडकला नाही. प्रभाग रचनेतील बदलामुळे शिवसेनेच्या नऊ दिग्गजांना पालिकेचे दरवाजे बंद झाले. त्याचा फटका थेट शिवसेनेच्या 114 या "मॅजिक फिगर'ला बसला...
फेब्रुवारी 25, 2017
दादरमध्ये शिवसेनेचा विजय; अनेक दिग्गजांना दणका मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दादरवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना व मनसे पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या गडावर झेंडा फडकवला होता. हा पराभव जिव्हारी...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मनसेने स्वबळावर महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. आता या पक्षाचे...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महत्त्वाकांक्षी मेट्रो-3 प्रकल्पासाठी झाडे कापण्यास दिलेली अंतरिम मनाई मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यात येईल, असे न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर बेसुमार झाडांची कत्तल सुरूच राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होऊन दुसऱ्या...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई- महापालिका निवडणुकीत मुंबईतील प्रभाग क्रमांक 166 मधून निवडून आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संतोष तुर्डे यांच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. तुर्डे यांच्यासह त्यांचे तीन कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई एकहाती जिंकणारच, या शिवसेनेच्या अतिआत्मविश्‍वासाला टाचणी लावत भाजपने शिवसेनेच्या बरोबरीने जागा मिळवल्या आणि मुंबईत आपलाही आवाज बुलंद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपच्या या मुसंडीमुळे 1997 नंतर प्रथमच शिवसेनेवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते. शिवसेना-भाजपच्या...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. अंतर्गत...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईची मराठी व अमराठी, अशी राजकीय विभागणी झाली आहे. भाजपने काही प्रमाणात मराठी विभागांत जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना सर्वात मोठा फायदा गुजराती व हिंदी भाषिक मतदारांचा झाला आहे. पश्‍चिम उपनगरांतील अमराठी मतांचा भाजपला सर्वाधिक फायदा झाला; तर शिवसेनेला...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईतील वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीसंदर्भात अधिक तपासणी करून कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी दिली. या जाहिरातीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे हक्काचे मतदान गमवावे लागलेले उमेदवार निवडणूक प्रक्रियेलाच न्यायालयात अव्हान देण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकीत मुंबईतील तब्बल 11 लाख मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने उमेदवारांसह मतदारही संतापले होते. अशा परिस्थितीत निसटता पराभव पदरी...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई - निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांना उमेदवारी मिळवण्याचे टेन्शन होते. उमेदवारी मिळाल्यावर प्रचारासाठी चाललेला आटापिटा... उन्हातान्हात तहान-भूक विसरून केलेला प्रचार... त्यामुळे जेवण-खाण्याकडे आणि कुटुंबाकडे झालेले दुर्लक्ष, अशी महापालिका निवडणुकीत उमेदवारांची अवस्था होती. मंगळवारी मतदान...
फेब्रुवारी 22, 2017
मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपला अनुकूल मुंबई - महानगरपालिकांच्या सत्तासंग्रामात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये "कॉंटे की टक्कर' होईल. येथे शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार असल्या तरीसुद्धा भाजप मात्र दुसऱ्या स्थानी राहील. राज्याची सांस्कृतिक...