एकूण 283 परिणाम
डिसेंबर 27, 2017
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यापासून समृद्धी महामार्गबाधितांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करूनही मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेलजवळ आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. शिवडे येथील "समृद्धी'बाधितांनी गेल्या वर्षापासून जमिनी...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - चांदवड शस्त्रसाठा प्रकरणामध्ये पाचव्या संशयिताला अटक करण्यात आली असून, चांदवड न्यायालयाने त्यास येत्या 28 तारखेपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच नाशिक ग्रामीण पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने शिवडीतून (मुंबई) दोघांना अटक केल्याचे वृत्त "सकाळ'ने दोन...
डिसेंबर 20, 2017
नाशिक रोड - मध्य रेल्वेच्या मार्गावर मंगळवारी सकाळी आसनगावजवळ लोहमार्गाला तडे गेल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. मुंबईकडून नाशिकरोडकडे येणाऱ्या मार्गावर सकाळी नऊच्या सुमारास आसनगावजवळ लोहमार्गाला तडे गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे या...
डिसेंबर 19, 2017
नाशिक - नाशिक कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधलेल्या जेल रोड येथील "कॅथेड्रल'चे उद्या (ता. 19) सकाळी अकरा वाजता कार्डिनल ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कॅथेड्रलमधील प्रतिष्ठापना व उद्‌घाटनासाठी विविध भागातील ख्रिस्ती धर्मगुरू उपस्थित राहत आहेत. येथील या चर्चच्या ऐतिहासिक...
नोव्हेंबर 30, 2017
नाशिक - केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला असताना "एमएमटीसी'ने दोन हजार टन कांद्याच्या आयातीसाठी जागतिक निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. शिवाय निर्यातमूल्य टनाला 850 डॉलर करत एक प्रकारची निर्यातबंदीची भूमिका सरकारने स्वीकारली असताना कांदा साठवणुकीचा जाच होण्याच्या भीतीने व्यापाऱ्यांनी...
नोव्हेंबर 27, 2017
खामखेडा (नाशिक): ऍग्रोवन व महाधन यांच्या संयुक्त विद्यामाने खामखेडा (ता. देवळा) येथे दर्जेदार कांदा पिकं नियोजनांसाठी शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. शेतकरी परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच संतोष मोरे यांनी केले. केव्हीके वडेल (ता. मालेगाव) कार्यक्रम सहाय्यक प्रा. महेंद्र...
नोव्हेंबर 26, 2017
नाशिक : सर्वच क्षेत्रांत आज झपाट्याने बदल होत आहेत. याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही पारंपरिक किंवा विशिष्ट शाखेतील शिक्षणाच्या जोडीला कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी 'यिन-सिमॅसिस...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - सरकारच्या सार्वजनिक उद्योगांमधील वाढता हस्तक्षेप अन्‌ खासगी क्षेत्राला चालना देत कामगारविरोधी कायद्याच्या वाढलेल्या अंमलबजावणीच्या निषेधार्थ गुरुवारपासून (ता. ९) तीन दिवस नवी दिल्लीत ‘सेंट्रल पब्लिक सेक्‍टर्स युनियन’तर्फे धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होत ओझरच्या एचएएल कारखान्याला...
नोव्हेंबर 08, 2017
नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे...
नोव्हेंबर 06, 2017
नाशिक - ज्येष्ठ नागरिक म्हटले, की चिडचिड करणारे. कुटुंबांमध्ये वाद घालण्यात रस असणारे अशी काहीशी प्रतिमा झालेली असताना ज्येष्ठांकडून आरोग्य अन्‌ करमणूकविषयक साहित्य तेही ‘इलेक्ट्रॉनिक्‍स गॅझेट’च्या पडद्यावर वाचन केले जातयं. हो! ‘स्क्रीन’वर वाचन करणाऱ्यांचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांपर्यंत पोचलय. अगदी...
नोव्हेंबर 04, 2017
मालेगाव - "खंडेरायाच्या स्वागताला चंदनपुरी सजली, बानूबाईच्या रणरागिणींनी कंबर कसली, अन्‌ बाटली फुटली, अन्‌ बाई बाटली फुटली...' हाच भाव चंदनपुरीसह जिल्ह्यातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर होता. खंडेराव - बानूबाईच्या श्रीक्षेत्र चंदनपुरीत आज दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात बाटली आडवी झाली. एकूण...
ऑक्टोबर 25, 2017
जेल रोड - नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुलाफेस्टमध्ये विक्रीची संधी मिळणार आहे. तशा आशयाचे पत्र कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना मिळाल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले.  नाशिकला होणाऱ्या सुलाफेस्टला जगभरातून पर्यटक हजेरी...
ऑक्टोबर 22, 2017
नाशिक - राज्यात सुमारे 3238 पाटबंधारे प्रकल्प असून त्यात सरासरी आठ टक्के गाळ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेली काही वर्षे हा चिंतेचा, चिंतनाचा विषय झाल्याने गाळ काढण्यासाठी शासनाने धोरणात बदल केलाय. स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. एक ट्रक गाळ काढला, तर एक टॅंकर पाणी वाढते हा साधा हिशेब आहे....
ऑक्टोबर 11, 2017
नाशिक - सातपूरमधील महापालिकेचा जलतरण तलाव... वेळ सकाळची. वीस फूट पाण्यात सरसर पोहणारी विशेष मुले साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतात. पाणी म्हटले की घाबरायला होते. पण विशेष मुलांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट केली. त्यांच्या आरोग्यातही सुधारणा होत आहे. ही सारी किमया अनिल निगळ यांच्या...
ऑक्टोबर 05, 2017
नाशिक - लहान मुले काय अन्‌ कशाशी खेळतील याचा भरवसा नसतो. नऊ वर्षांच्या मुलीने सेफ्टी पीन तोंडात टाकली. ती घशात अडकली अन्‌ तिची बोलण्याची अन्‌ गिळण्याची प्रक्रियाच बंद झाली. खासगी रुग्णालयात उपचार करणे अशक्‍य असल्याने पालकांनी मंगळवारी (ता. 3) रात्री तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. आज सकाळी...
ऑक्टोबर 01, 2017
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता मोहिम राबविली जाते आहे. या मोहिमेला प्रतिसाद देण्यासाठी "सकाळ' माध्यम समुहाने पुढाकार घेत आज (रविवार) नाशिकची ग्रामदैवत कालिका देवी मंदिर परिसरात स्वच्छता केली. नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर परिसरात अस्वच्छता पसरली होती. ही गोष्ट...
सप्टेंबर 29, 2017
नाशिक - नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) असलेल्या कक्षातील इन्क्‍युबेटरच्या कमतरतेमुळे बालमृत्यू प्रकरण "सकाळ'मधून उजेडात आल्यानंतर गुरुवारअखेर तीन नवीन इन्क्‍युबेटर दाखल झाले आहेत. सहा इन्क्‍युबेटर दोन दिवसांत येणार असून, उर्वरित सात आठवडाभरात...
सप्टेंबर 28, 2017
नाशिक - स्थायी समितीत मंजूर केलेल्या विषयांवरून सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याविरोधात भूमिका घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या चार नगरसेवकांना शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी कानपिचक्‍या देत सबुरीचा सल्ला दिला.  सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभा...
सप्टेंबर 26, 2017
नाशिक - ग्रामदैवत श्री कालिका यात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. दर्शनाबरोबरच विविध खेळण्यांचा आनंद आज बच्चेकंपनीसह ज्येष्ठांनीही घेतला. यात्रेमुळे येथील अर्थकारणासही गती मिळाली आहे. तत्पूर्वी आज सकाळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी...
सप्टेंबर 25, 2017
नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र आदिशक्‍तीची उपासना सुरू असताना त्याचे औचित्य साधत या महिन्याचा ‘सकाळ कलांगण’ उपक्रम भद्रकालीदेवी मंदिरात घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी होत दिग्गज, तसेच हौशी चित्रकारांनी मंदिर व जुने नाशिक परिसर रंग-रेषांच्या सहाय्याने कॅनव्हासवर उतरवला. काही कलावंतांनी...