एकूण 172 परिणाम
जून 22, 2019
नाशिक - पंचवटीतील पेठ रस्त्यावरील घरगुती वादातून पोलिस पित्याने शुक्रवारी दुपारी केलेल्या गोळीबारात सोनू ऊर्फ अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५), शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) या सावत्र मुलांचा मृत्यू झाला. संजय अंबादास भोये (५३, रा. पंचवटी) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, घटनेनंतर तो स्वत: पंचवटी...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 18, 2019
कोट्यवधींच्या मालमत्तेवर वाढले अतिक्रमण, बोर्डासह सरकार उदासीन औरंगाबाद - मागील काही वर्षांत महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जमिनी गिळंकृत करून त्यावर पक्की बांधकामे करण्याचा सपाटाच सुरू आहे. महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जवळपास 60 ते 70 टक्के जमिनींवर अतिक्रमणे झालेली असताना ती...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...
जून 07, 2019
नाशिक - गोदावरीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी पुन्हा दुसऱ्यांदा लुप्त होणार आहे. एवढेच नव्हे, तर निलगंगा नदीपात्रावर काँक्रिटीकरण करण्यासाठी पालिकेने खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे यापूर्वी एकदा काँक्रिटीकरण केलेल्या नद्यांवर पुन्हा दुसऱ्यांदा (लेअर) काँक्रिटीकरणाचे केवळ कारण दिले जात आहे...
जून 05, 2019
नागपूर - आयटीआयअंतर्गत अभ्यासक्रमासाठी २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी १ लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी हाच आकडा १ लाख ३९ हजार ४९२ इतका होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन हजार १९२ जागा कमी झाल्या आहेत. राज्यात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण वाढावे यासाठी आयटीआयच्या माध्यमातून...
जून 01, 2019
नाशिक - विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर संबंधिताने पाचपट झाडे लावण्याचा नियम आहे. पण पूर्णवेळ यंत्रणेअभावी त्याचे उल्लंघन होते. त्यावर उपाय म्हणून वृक्षतोडीनंतरही झाडे न लावणाऱ्यांना दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.  राज्यस्तरीय...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील पाच...
मे 28, 2019
नाशिक - राज्यातील विकास प्रक्रिया व टप्पे जाणून घेत सरकारी यंत्रणेचे कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ आणि निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांना मिळावा म्हणून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातंर्गत 2019-20 मध्ये 50 तरुणांना संधी मिळणार असून, त्यात एकतृतीयांश तरुणी असतील....
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 17, 2019
नाशिक - कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकऱ्यांच्या बहुप्रलंबित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणच्या एकत्रित प्रयत्नांतून "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प लासलगाव (जि. नाशिक) येथे कार्यान्वित...
मे 13, 2019
येरवडा - राज्याच्या विविध कारागृहांतील कैद्यांनी हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकामातून 2018-19 या आर्थिक वर्षात तेवीस कोटी, तर शेती, मत्स्यव्यवसाय, सेंद्रिय खत निर्मिती यातून चार कोटी अशी 27 कोटींची कमाई कारागृहांना करून दिली आहे, अशी राज्याचे कारागृह महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली...
मे 12, 2019
नाशिक - तीन रुग्णांसाठी एक परिचारिका असावी, असा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा (परिचर्या परिषद) निर्णय असला, तरी आजपर्यंत कधीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी नर्सिंग कौन्सिलनेही कुणाचे कान धरले नाहीत. परिणामी, आता एकेका परिचारिकेला तब्बल साठ रुग्णांची सेवाशुश्रूषा करावी लागत असल्याचे चित्र...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...