एकूण 125 परिणाम
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
एप्रिल 15, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघामध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा हे येथून मैदानात उतरले असून 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर सिन्हा हे आता तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. सिन्हांची येथे केंद्रीय मंत्री रविशंकर...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : "चौकीदार' या कॉंग्रेस नेतृत्वाच्या आरोपाचा चपखल उपयोग करूनच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजपच्या साऱ्या नेत्यांनी कंबर कसली असून, सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या ट्विटर नावामागे "चौकीदार' अशी जोड दिली. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अशी पाटी गळ्यात अडकवून घेण्यास साफ नकार दिला...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार...
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 29, 2018
रामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो? सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो? शिवसेनेला हे सहजशक्‍य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते...
डिसेंबर 29, 2018
सामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नांकडेही आपल्याकडचे झाडून सारे पक्ष कसे निव्वळ राजकीय लाभ-हानीच्या चष्म्यातून पाहतात, याचा प्रत्यय सध्या "तोंडी तलाक'च्या विधेयकासंदर्भात जे काही चालू आहे, त्यावरून येत आहे. वास्तविक तलाकपीडितांच्या मुक्तीचे हे विधेयक मंजूर होणे मुस्लिम महिलांच्या हिताचे आहे की नाही, यावर...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात जागावाटपावर आज (रविवार) एकमत झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष असलेला संयुक्त जनता दल (जेडीयू) 17, लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) 6 तर भाजप 17 जागांवर निवडणूक लढविणार आहे, याबाबतची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) उपेंद्र कुशवाह यांना 'मर्यादेत रहा', अशा शब्दांत इशारा देण्यात आला आहे. ...
ऑक्टोबर 14, 2018
पाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा दरोडेखोरांबरोबरच्या चकमकीत मृत्यू झाला. पाटण्यातील पोलिस भवनाला 320 कोटी रुपये खर्च आला आहे. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथील ठाण्यात पोलिस अधिकारी आशिष नेमणुकीस...
ऑक्टोबर 11, 2018
पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर एका तरुणाने चप्पल फेकली. त्यानंतर त्या तरुणाने आरक्षणाचा विरोध करत घोषणाबाजी केली. याप्रकारानंतर संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला मारहाण केली. त्यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांच्या हवाली केले. नितीशकुमार संयुक्त जनता दलाच्या एका कार्यक्रमात...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
ऑगस्ट 27, 2018
पाटणा : राखी पौर्णिमेनिमित्त बिहार सरकारच्या वतीने रविवारी वन संरक्षण दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इको पार्क येथे वृक्षारोपण आणि झाडांना राखी बांधली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...