एकूण 327 परिणाम
एप्रिल 17, 2019
वाडा : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कुणबी समाज हा कायम काँग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील हे काँग्रेस सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज आपल्या पाठीशी आहे, असे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या सभेत काढले.  काँग्रेस,राष्ट्रवादी...
एप्रिल 15, 2019
महाराष्ट्रातील पालघर हा तसा सर्वात तरुण जिल्हा. पालघर जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आणि आदिवासी पाड्यांचा. येथील आदिवासी संस्कृतीतील वारली चित्रकला, पारंपरिक गाणी-नृत्य तसेच खाद्य पदार्थ म्हणजे संपूर्ण देशाची शान ! अशा या जिल्ह्यातील माळकरी-पाडा या छोट्याशा वस्तीवरील मधुकर त्याच्या बहुविविध कौशल्य...
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती असते. त्यामुळे...
एप्रिल 11, 2019
किन्हवली :  साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांविरोधात वधू कविता दामोदर फर्डे हिने आज (दि.11) सकाळी 11:30 पासून किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे....
एप्रिल 11, 2019
पालघर: सोशल मीडियावर सध्या एका पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण, या पत्रिकेमध्ये एक वर व दोन वधूंची नावे आहेत. यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याची अनेकांना उत्सुकता लागली असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. परंतु, खरे कारण नेमके काय आहे? हे अनेकांना समजत...
एप्रिल 05, 2019
युती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...
मार्च 30, 2019
विरार - लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पालघर लोकसभा मतदारसंघ सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. युती-आघाडीपूर्वी एकमेकांवर निशाणा साधणारे पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले आहेत; तर उमेदवारीसाठीही पक्षांची अदलाबदली सुरू आहे. पक्षांच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत....
मार्च 29, 2019
रायगड, पालघर, ठाणे, कल्याण, भिवंडी या मुंबईनजीकच्या लोकसभा मतदारसंघांत सर्वाधिक चर्चा सध्या पालघरची आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षाही युतीमध्ये मनोमिलन नेत्यांचे नेत्यांशी झाले आणि कार्यकर्त्यांच्या भावभावनांची प्रतारणा करण्यात आली, याची चर्चा रंगू लागली आहे. भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी झाल्या...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेत ‘माझं ते माझं अन्‌ तुझ्याकडचंही माझंच’ अशी खेळी खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याआधी शिवसेनेने भाजपला...
मार्च 27, 2019
मुंबई - पालघर लोकसभेची जागा कोण लढणार, याचे उत्तर अखेर मिळाले आहे. दोन दिवसांपासून चर्चेत असलेले भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिवसेनेच्या तिकिटावर पालघरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गावित यांनी आज "मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला....
मार्च 26, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची समजूत काढली असून, तर पालघरमध्ये शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सोमवारी दुपारी 'मातोश्री'वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र...
मार्च 25, 2019
पालघर: पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सर्वाधिक अशा 20 जागांवर विजय मिळला आहे. निकालानंतर युतीला बहुमत मिळालेलं असलं, तरीसुद्धा नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्या आहेत. नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून आणण्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रवादीला फायदा झाला आहे. पालघर...
मार्च 25, 2019
मुंबई: पालघरमध्ये शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा यांना डच्चू दिला असून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. पालघर लोकसभेसाठी युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.यावेळी...
मार्च 25, 2019
भांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची अदलाबदल होईल, अशीही चर्चा आज होती. भाजपच्या अमराठी उमेदवारासमोर मनसेची मराठी मते राष्ट्रवादीचे संजय पाटील खेचून घेणार का, असा महत्त्वाचा प्रश्‍न इथे आहे...
मार्च 25, 2019
मुंबई - ईशान्य मुंबई व पालघर या मतदारसंघांची सेना-भाजपमध्ये अदलाबदल होण्याची कुजबूज सुरू झाल्याने पूर्व उपनगरांत त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपच्या घाटकोपरमधील एका वजनदार नेत्याच्या पुत्राला शिवसेनेच्या कोट्यातून तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे. भाजपचा हा नेता कोण, यावर कोणीही ‘प्रकाश’ टाकू शकले...
मार्च 24, 2019
पालघर : नाशिक जव्हार रोडवर तोरंगना घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी आहेत.  गुजरातच्या सुरत शहरातील बस क्रमांक जीजे 17 यूयू 1148 या खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बस तोरंगणा घाटात 25 फूट खोल दरीत...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने शेतात काही उगवले नाही. चारही बाजूंनी उजाड झालेली शेती. भोवती उंच डोंगर, माळरान. शिवगड तांड्यापुढं सिंदोन गाव... रखरखत्या उन्हातून रस्त्याच्या डाव्या बाजूला दादासाहेब दौलतराव शिंदे यांची डाळिंबानं लगडलेली बाग. तहानेनं व्याकूळ होऊन गेल्यानंतर समोर...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रशांत किशोर यांनी...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला...