एकूण 250 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...
मे 24, 2019
मराठवाड्यातील निकाल धक्कादायक ठरले काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासाठी. तथापि, युतीला मिळालेले यश त्यांच्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद मानले पाहिजे. शिवसेनेचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता मराठवाड्यातील उरलेल्या सात मतदारसंघांत शिवसेना- भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला....
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 परभणी ः शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी 'काटे की टक्कर' झाली पण, सरतेशेवटी शिवसेनेच्या संजय जाधव यांची सरशी झालेली पाहायला मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांचाही यावेळी चांगलाच जोर दिसून आला. परभणी लोकसभा मतदारसंघात ...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
सोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.  सोलापुरात...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर परिसरात घडली....
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
मे 09, 2019
परभणी - स्वांतत्र्योत्तर काळापासून परभणी जिल्ह्यातील ६५ गावांच्या भाळी दुष्काळ गोंदला गेला आहे. जलसिंचनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने या ६५ गावांमध्ये पाण्याच्या प्रश्नाने आता उग्ररूप धारण केले आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाची दाहकता सहन केलेल्या या ६५ गावांतील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध...
मे 08, 2019
औरंगाबाद : महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत मराठवाडा आणि खान्देशामध्ये वर्षभरात तब्बल 19 हजार 844 वीज चोऱ्या उघड केल्या आहेत. या वीजचोरांकडून सहा कोटी दोन लाख रुपये वसुल करण्यात आले असून, 166 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागातील औरंगाबाद...
मे 06, 2019
परभणीतील ४६ गावे, पाच वाड्यांत ५८ टॅंकरने पाणीपुरवठा परभणी - मे महिना सुरू होताच पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून आता बहुतांष गावांतील पाणीपुरवठ्याचे श्रोत आटले असून ग्रामस्थ रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. आतापर्यंत २१८ गावांतील २७३ विहिरींचे...
मे 06, 2019
विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून इच्छुकांनी पक्षीय उमेदवारांसाठी काम केले आहे. पण पक्षीय आघाडी, युतीने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. त्यामुळे बंडखोरीही सतावणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा झडताहेत. परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा...
मे 05, 2019
परभणी : जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सततचा दुष्काळ व पाऊसमान कमी झाल्यामुळे नदीपात्र कोरडे पडले तर बोअरचे पाणी अटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोअर-दुधना प्रकल्पातून जिल्ह्यातील नदी पात्रात त्वरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी) येथे...
एप्रिल 29, 2019
धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणी; पिण्याच्या पाण्याचे संकट गडद औरंगाबाद - यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील सर्व ८७२ धरणांत केवळ ३.२५ टक्‍केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सूर्य आग ओकत असतानाच धरणातील पाणीसाठा किरकोळ स्वरूपात शिल्लक राहिल्याने येत्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट अधिक गडद होण्याची...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
एप्रिल 25, 2019
परभणी : परभणीत उष्णतेच्या लाटेने कहर केला असून गुरुवारी (ता.25) यंदाच्या आतापर्यंतच्या तापमानाचा उच्चांक गाठला गेला आहे. आग ओकणाऱ्या सुर्यप्रकाशाने परभणीकर हैरान झाले असून गुरुवारी पारा तब्बल 45 अंशावर पोचला आहे. मार्च महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परभणी तापली आहे. अख्खा मार्च महिणाभर तापमान 40...
एप्रिल 25, 2019
परभणी - परभणीत उष्णतेची लाट पुन्हा सक्रिय झाली असून, बुधवारी (ता. २४) पारा ४४.०१ अंशांवर पोचल्याने उष्णतेचा कहर सुरू झाला आहे. यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वोच्च तापमान आहे. तसेच नांदेड ४३.२९, हिंगोली ३९ अंशांवर तापमान होते.  दर उन्हाळ्यात परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होते. यंदा मार्चपासून लाट...