एकूण 48 परिणाम
November 29, 2020
मेढा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याची एक संस्कृती आणि विचार आहे, तो अखेरपर्यंत जिवंत ठेवणार असून दुसरा विचार येथे येऊ देणार नाही, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्यापूर्वी आलेले दीपक पवार काही काळातच निघून गेल्याने त्याचीच चर्चा रंगली होती.   मेढा...
November 26, 2020
फलटण (जि. सातारा) : राज्य शेती महामंडळ खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याच्या रामराजे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, त्याच समितीने कामगारांबाबत केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नसल्याने कामगार कुटुंबांची अवस्था बिकट आहे. शासनाने त्याबाबत...
November 22, 2020
कोरेगाव (जि. सातारा) : 'पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक काही लोकांना दाखवून देण्यासाठी आहे', अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला. ही निवडणूक राज्याच्या राजकीय इतिहासाचा 'टर्निंग पॉईंट' ठरणार असून, महाविकास आघाडीतील तिन्ही...
November 22, 2020
सातारा : राज्याचा विकास करताना निवडणुकीत दिलेली आश्‍वासने व वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे ही ठाकरे सरकारची भूमिका आहे. संकटावर मात करत राज्य पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी महाविकास आघाडीचे सरकार डगमगणार नाही. आम्ही...
November 21, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना मतदान करून घेण्यासाठी नियोजनपूर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामध्ये गाफिल राहून चालणार नाही. या निवडणुकीचे महत्त्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपूर्णतः सातारा जिल्हा व तालुक्‍यांवर माझे पूर्ण लक्ष...
November 18, 2020
कोळकी (जि. सातारा) : झिरपवाडी (ता. फलटण) येथे अनेक वर्षे धूळ खात पडून असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन) कोविड, तसेच इतर संसर्गजन्य आजारांसाठी रुग्णालय सुरू करण्याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक...
November 17, 2020
सातारा  : भाजपच्या मेळाव्यात महाविकास आघाडी सरकारने हौदोस मांडला आहे, असा उल्लेख प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकताच केला होता. त्यावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी "हैदोस म्हणजे काय याचा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट केला पाहिजे असे उत्तर दिले आहे.  पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या...
November 16, 2020
सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. या निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार आहे. सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.   पुणे पदवीधर विधानसभा व शिक्षक मतदारसंघाच्या...
November 14, 2020
मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले असताना दुसरीकडे पेरलेले बियाणे उगवले नसल्याने आता काय करायचे? असा प्रश्न काही शेतकऱ्यांना पडलेला आहे. शिवाय पेरणीचा वेळ निघून गेली आहे. या बोगस बियाणामुळे नुकसान झालेले भात उत्पादक शेतकरी...
November 14, 2020
सातारा : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमधील 33 अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तालुका आरोग्य विभागात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मदतीला काही कर्मचारी मानधन तत्त्वावर घेतली जातात.  तुम्ही एकी ठेवा, बाकीचे मी बघतो; रामराजेंनी दिला...
November 14, 2020
सातारा : सातारा जिल्हा कारागृह परिसरातील नवीन बांधकामासाठी असणारे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, त्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतचा निर्णय घेतल्याने शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आभार मानले आहेत.  साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात जिल्हा कारागृह...
November 14, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : दहा वर्षांपासून रखडेलेला येथील हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लागल्याचे जाहीर करूनही तब्बल सात महिने झाले. मात्र, अद्यापही तो प्रश्न मार्गी लागलेला नाही. निर्णय होऊनही दहा वर्षांत तब्बल पाचव्यांदा अंमलबजावणी न झाल्याने हॉकर्स झोनचा आराखडा कागदावरच राहिला आहे. पालिका व पोलिसांमध्ये...
November 14, 2020
महाबळेश्वर : दिवाळी सणानिमित्त महाबळेश्वर पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ''कोवड १९''च्या प्रादूर्भावात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता देखील दिला...
November 14, 2020
बिजवडी (जि. सातारा) : माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्व जण एकत्र आलात; पण मला बोलवले नाही. मी आलो असतो, तर आज येथील चित्र वेगळेच असते. निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचे मी बघतो, असे सूचक वक्तव्य...
November 13, 2020
आसू (जि.सातारा) : गोखळी (ता. फलटण) येथील सहा वर्षांच्या स्वरा भागवत हिने 12 तास सायकलिंग करून 143 किलोमीटर अंतर पार करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वराचे विशेष कौतुक करून सत्कार केला.   एवढ्या लहान वयात स्वराने व्यायामचा...
November 12, 2020
कोरेगाव (जि. सातारा) : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीमुळे कोरेगाव शहरासह तालुक्‍यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन आणि सातारारोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून, यासंदर्भात सुरक्षिततेचे नियम तयार करून त्यासाठीच्या कार्यवाहीबाबत...
November 11, 2020
मसूर (जि. सातारा) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मसूर गटात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ येथे जुन्या बस स्थानक चौकात करण्यात आला.  केंद्र सरकारने शेतकरी...
November 11, 2020
सातारा : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र येथे सुरू केले जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर...
November 11, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : शहरामध्ये भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. नागरिकांची हेळसांड न होता भुयारी गटार योजनेचे काम करण्याबाबतच्या सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे...
November 08, 2020
सोलापूर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पश्‍चिम महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न आता जवळपास मार्गी लागला आहे. पुणे पदवीधर मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र अद्यापही मिळत नसल्याने, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला...