एकूण 1733 परिणाम
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजारपेठही व्यापाऱ्यांकडून बंद...
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि महानियोजनकार...
मे 17, 2019
मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 16, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 16, 2019
पुणे -  दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात ११ जूनपर्यंत नैॡत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी बरसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. मॉन्सून सहा जूनला केरळमध्ये दाखल होणार असला तरीही सर्वसाधारणच्या तुलनेत चार ते पाच दिवस हा मॉन्सून उशिरा दाखल होत आहे.  यंदा देशात सरासरीच्या ९६...
मे 15, 2019
कोयनानगर - कोयना धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. शिल्लक दहा टीएमसी पाणीसाठ्यांवर पश्‍चिमेकडील वीजनिर्मितीसाठी संबंधित वीज कंपनीने अधिकार सांगितला आहे. अशा स्थितीत कर्नाटकला कोयनेतून पाणी द्यायचा विचार झाल्यास ते वीज निर्मितीसाठीचा पश्‍चिमेकडील शिल्लक पाणीसाठ्यातून द्यावे, अशी अपेक्षा सांगली पाटबंधारे...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 14, 2019
वाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी मातीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही बाब मानोरा...
मे 13, 2019
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९...
मे 13, 2019
कऱ्हाड : स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक पटकविणाऱ्या येथील पालिकेला स्वच्छतेत आघाडीवर राहण्यासाठी सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग घटल्यामुळे पालिकेच्या अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाकडे तोकडी संख्या आहे. पालिकेला दोनशे...
मे 13, 2019
लोणेरे (रायगड) : महाड तालुक्यातील सापेतर्फे गोवेले व टोळ बुद्रुक गावाच्या हद्दीत स्टोन क्रशरचे दोन कारखाने आहेत. दगड क्रश करण्याच्या नावाखाली जाडी वाळू क्रश करण्याचा धंदा दिवसाढवळ्या सुरु आहे, मात्र याकडे महाड महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.    सापे तर्फे गोवेले येथे मे स्टार ट्रेडर्स व टोळ बु....
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 12, 2019
औरंगाबाद : हवमानाच्या अंदाजावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता आठवड्याभरातून दोन वेळा हवामानाचा अंदाज कळविण्यात येणार आहे.  महावेधच्या माध्यमातून जवळपास 80 लाख शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहचविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. ...
मे 11, 2019
सावंतवाडी : नरेंद्र डोंगर परिसरातील शौचालयाच्या टाकीत पडलेल्या रेड्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर यांनी भेट दिली व मदत कार्यात सहभाग घेतला होता. गव्याला...
मे 10, 2019
संगमेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्‍यातील करजुवे खाडीपट्ट्यामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनावर महसूल विभागाने धाड टाकून वाळूमाफियांना चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत 6 सक्‍शन पंप व 4 बोटी नष्ट केल्या. याची किंमत 30 लाखांहून अधिक असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. ही कारवाईला 9 मे...
मे 09, 2019
गडहिंग्लज - येथील सुरेश देवेकर यांच्या राहत्या घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले. 45 हजार रोकडसह दीड तोळ्याच्या सोन्याचे दागिने व धान्य, संसारिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ही...
मे 09, 2019
कोल्हापूर - अकरावी-बारावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या गुणांची पद्धत बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता गुणांची खिरापत बंद होणार असून प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीची...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 08, 2019
उमरगा - कुन्हाळी (ता. उमरगा) येथील शिक्षित शेतकरी वैशाली कैलास आष्टे यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून जरबेरा फुलाचे उपादन घेऊन समृद्धी साधली आहे....