एकूण 424 परिणाम
मे 18, 2019
मुंबई : सरकारच्या निर्णयानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करणे आवश्‍यक असते. परंतु, राज्य परिवहन विभागातील ज्येष्ठता यादी सात वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजात अडचणी येत असून, मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नतीही रखडली आहे. राज्य परिवहन विभागातील...
मे 14, 2019
लातूर - हौसेला कुठलेही मोल नसते, असे म्हटले जाते. त्यामुळेच कोणी हौसेपोटी तर कोणी श्रद्धेपोटी आपल्या नव्या वाहनांसाठी दहा हजार रुपयांपासून तब्बल तीन लाख रुपयांचे शुल्क भरून पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेत आहेत. लातुरातील वाहनचालकांमध्ये चॉईस नंबरची ही क्रेझ वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे...
मे 14, 2019
वाशी - ऐरोली रेल्वेस्थानकाच्या बाहेर रस्त्यात रिक्षा उभ्या करून रिक्षा प्रवाशांची चढ-उतार करणाऱ्या रिक्षांवर रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सोमवारी (ता. 13) सकाळी आठच्या सुमारास हल्ला चढवत सुमारे 10 ते 15 रिक्षांची तोडफोड केली. या वेळी रिक्षांच्या काचा, इंडिकेटर...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
मे 07, 2019
औरंगाबाद - एकीकडे ऑनलाइन कारभाराला चालना देण्यासाठी पोलिस आयुक्त, उपायुक्तांकडून प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ऑनलाइन पावत्यांऐवजी चक्क शंभर रुपयांची मागणी काही वाहतूक पोलिसांकडून होत असल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे व्यक्त झाल्या. याला वेळीच आवर घालण्याची गरज...
मे 07, 2019
पुणे - पुरेशी तपासणी न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (आरटीओ) कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. पुरेशी माहिती नसल्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे, असे न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि एन. एम....
मे 07, 2019
ठाणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) कारभार खासगी दलाल हाताळत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील मर्फी येथील कार्यालयात बेकायदा प्रवेश करून पाच व्यक्ती अभिलेख हाताळण्याबरोबर येथील संगणकावर काम करत असल्याचे आरटीओच्या दक्षता पथकाने उघडकीस आणले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी पाच...
मे 06, 2019
औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका...
मे 06, 2019
सातारा - शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात काही कंपन्यांनी हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे. दुचाकी वाहनांबाबतही याची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यात २००० मध्ये अधिनियम ५० अंतर्गत...
मे 05, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी भेट दिली. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास ‘आरटीओ’तील कामकाज  ठप्प होते.  कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून गेल्याने विविध कामांसाठी आलेले नागरिक...
मे 05, 2019
पुणे : वाहनांसाठीचे पसंती क्रमांकांचे (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने लिलाव होणार आहेत. त्यासाठी परिवहन कार्यालयाने नियमावलीत बदल केले आहेत. नॅशनल इन्फर्मेटिक्‍स सेंटरच्या (एनआयसी) माध्यमातून संगणकीय प्रणाली निर्माण केली आहे. त्यामुळे पसंती क्रमांकांची "ऑफलाइन' पद्धत लवकरच बंद होणार आहे. परिवहन...
मे 04, 2019
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) पाहणी करण्यासाठी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी आरटीओ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेतल्याने सुमारे दीड तास आरटीओतील कामकाज ठप्प होते.   कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कर्मचारी बैठकीसाठी निघून गेल्याने विविध कामांसाठी...
एप्रिल 30, 2019
पुणे -  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे सध्या कारवाई दरम्यान पकडलेल्या वाहनांचे गोदाम झाले आहे. या वाहनांनी ‘आरटीओ’चा परिसर पूर्ण भरला असून, येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. आरटीओकडून कारवाई करून पकडलेली वाहने कार्यालयाच्या आवारामध्येच उभी केली जातात. ठराविक...
एप्रिल 26, 2019
टेकाडी - टेकाडी फाट्यापर्यंत होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या क्षेत्रातील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आले असताना वाहनांच्या आवागमनात भर पडली आहे. क्षेत्रातील नागरिकांना मात्र आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रोडवर कोळसा ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे हा पेच...
एप्रिल 25, 2019
मुंबई - प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या तपासणीसाठी असलेली प्रतीक्षा यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाच हजार रुपयांत डावलली जात आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात पाच हजार रुपये देणाऱ्या व्यक्तीला पुढील क्रमांक दिला जात असल्याचे उघड झाले आहे. अन्य परिवहन कार्यालयांतही असे लाचखोरीचे प्रकार सुरू...
एप्रिल 16, 2019
मुंबई - परिवहन विभागाने 1400 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या आणि 375 लिटरपेक्षा लहान डिकी असलेल्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना न देण्याचे निर्देश 1 एप्रिलला दिले होते. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी हा निर्णय 15 दिवसांत मागे घेतला आहे. प्रत्येक आरटीओ विभागात सर्व वाहनांना टुरिस्ट टॅक्‍सी परवाना...
एप्रिल 16, 2019
कऱ्हाड - येथील बस स्थानक आणि कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात मनमानी पद्धतीने रिक्षा लावल्या जात आहेत. वाहतूक पोलिस तेथे तैनात असतानाही अस्ताव्यस्तपणाचे प्रकार घडत असल्याने वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. काही रिक्षाचालकांकडून तर मुद्दामपणे रिक्षा आडव्या लावल्या जात आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी...
एप्रिल 13, 2019
सातारा - इन्शुरन्सप्रमाणे पीयूसी सर्टिफिकेटची माहितीही वाहन-४ प्रणालीवर ऑनलाइन भरणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे गाडी न पाहताच दिल्या जाणाऱ्या पियुसीचा तसेच पियुसीच न काढण्याच्या प्रकारांना लगाम बसणार आहे.  वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामधून विषारी वायू बाहेर पडत असतात. वाहनाच्या...
एप्रिल 12, 2019
सातारा - परिवहन विभागाने इन्शुरन्स कंपन्यांना वाहनांच्या इन्शुरन्सची माहिती वाहन- ४ या प्रणालीवर भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये चालणारा बोगस इन्शुरन्सचा बाजार थांबणार आहे. वाहनाची नोंदणी, ट्रान्स्फर, पासिंग या गोष्टी करताना सर्व कागदपत्रे पूर्ण असावी लागतात....
एप्रिल 07, 2019
पुणे :  जांभुळवाडी येथील जांभुळवाडी तलावाचे थोडे सुशोभिकरण झाले आहे. वॉकिंग ट्रॅकपण तयार केला आहे. वाढत्यावस्तीमुळे नागरिक सकाळ-सांयकाळी येथे  फिरायला येतात. काही सहकुटुंब मुलाबाळांसोबत तरुण-तरुणी सुद्धा फिरायला येतात. मात्र खटकणारी गोष्ट म्हणजे जांभुळवाडी तलावाशेजारी पुणे जिल्हापरिषदेच्या ग्रामीण...