एकूण 129 परिणाम
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 10, 2019
कोल्हापूर - आम्ही ठरवून हातकणंगले लोकसभा मतदार संघात उभी-आडवी पेरणी केली. गेली दोन वर्षे या मतदार संघात मी बहुजनांचा खासदार करण्याचा विचार पेरत होतो. यासाठी मतदार संघात चांगली बांधणी केली होती. मशागत केली, पेरणी केली. मात्र पिक दुसऱ्यानेच कापले. माझी मनापासून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती...
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 26, 2019
सांगली - द्राक्ष व डाळिंब बागांचे पाऊस, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे आच्छादन (शेडनेट) प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत सातत्याने विधिमंडळात पाठपुरावा...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 23, 2019
शिराळा - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्राथमिक मतांचे आकडे आमदार शिवाजीराव नाईक गटाला सूचक इशारा देणारे ठरले आहेत. खासदार राजू शेट्टी यांना येथे सात हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. विधानसभेसाठी नाईक यांना ‘सावध’ करणारा हा आकडा आहे; मात्र देशभरात भाजपची त्सुनामी पाहता...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 23, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टींनी 23 हजारांचे मताधिक्‍य घेतले होते. आता जयंतराव सोबत असूनही तेवढे मताधिक्‍य टिकवणे शेट्टींना यावेळी अशक्‍य झाले. शेट्टींना पराभूत करायचेच या इराद्याने विरोधकांनी जातीसह काढलेली सर्व अस्त्रे आणि साखर...
मे 18, 2019
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ...
मे 12, 2019
इस्लामपूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब रामचंद्र महाडिक (वय 71) यांचे आज दुपारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व नानासाहेबांचे जेष्ठ बंधू महादेवराव महाडिक यांनी नानासाहेब महाडिक यांच्या मृत्युबाबत सायंकाळी पाचच्या...
एप्रिल 25, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा  मतदारसंघात जयंत पाटील विरुद्ध राजू शेट्टी वगळून परपंरागत विरोधकांचा लोकसभा निवडणुकीत सामना पाहायला मिळाला. विधानसभेची झलकच पाहायला मिळाली. तरी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात एकत्र आलेले जयंत पाटील विरोधक विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बेडक्‍या फुगवण्याच्या मन:...
एप्रिल 23, 2019
सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत वाळवा तालुक्यातील ताखराळे येथे मतदान केले तर मंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब मरळनाथपूर (ता. वाळवा) मतदानाचा हक्क बजावला. यासह सांगली येथे विविध ठिकाणी मान्यवरांसह नागरिकांनी केलेल्या मतदानाची छायाचित्रे...
एप्रिल 20, 2019
शिराळा - शेट्टींना फक्त विरोध करणे हेच माहीत आहे. विरोध स्वतःच्या स्वार्थासाठी नसावा, तो लोकहितासाठी असावा, हेच त्यांना कळले नसल्याने हा मतदारसंघ १० वर्षे इतर मतदारसंघांच्या तुलनेत मागे राहिला आहे. धैर्यशील माने यांना संधी द्या. आम्ही पाच वर्षांचा विचार करत नाही, तर पुढील ५० वर्षांचा विचार करीत आहे...
एप्रिल 19, 2019
शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांचेकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी दिली. विकासराव देशमुख यांनी युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना काल गुरुवारी...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर -  खासदार राजू शेट्टी यांनी एक नोट, एक वोट संकल्पना राबवली आहे. मात्र, त्यांचा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता आणि एका गावचा उपसरंपच असणाऱ्या व्यक्तिच्या घरात एका डब्यात 75 लाख रुपये सापडले. हा पैशाचा डबा कोण देतं, येवढे पैसे आले कोठून? असा सवाल राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. तसेच ...
एप्रिल 18, 2019
शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांनी आपला स्वाभिमानीचा बिल्ला व मनात स्वाभिमान कायम ठेवून बहुजनांचा चेहरा व युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशी घोषणा देशमुख यांनी कोल्हापूर येथे केली. यावेळी मंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी नेते पाशा...