एकूण 2889 परिणाम
मे 26, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे. राज्यात जास्त मागणी असलेल्या कालावधीत आवश्‍यकतेनुसार प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जात आहे. कोयना धरणातील १०० टीएमसी पाण्याचा प्रथमच वीजनिर्मिती व सिंचनासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे धरणात खडखडाट झाला आहे. सद्यःस्थितीत...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 25, 2019
मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या महाआघाडीत सहभागी झालेल्या दोन लहान पक्षांना तीनपैकी एकही जागा मिळाली नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला एक, आमदार रवी...
मे 24, 2019
सांगली - सांगली मतदारसंघात काही मंडळींनी जातीचा विषारी प्रयोग केला; मात्र जनतेने त्यांना चपराक दिली. सुसंस्कृत जिल्ह्यात ते प्रयोग चालले नाहीत. केंद्र, राज्याच्या कामांचा धडाका आणि माझी पाच वर्षांतील धडपड या जोरावर पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवता आला. तो मी नम्रतेने जनतेच्या चरणी अर्पण करतो...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी अखेर सुमारे...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत.  दरम्यान दुसऱ्या फेरीत संजयकाका पाटील (भाजप)...
मे 22, 2019
सांगली - येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रियांका सुनील चव्हाण (वय 21, रा. काकानगर) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 21, 2019
कोल्हापूर - महावितरणच्या कोल्हापूर व सांगली परिमंडलातील (सर्कल) वीज बिल थकबाकी दरवर्षी वाढत असून, हा आकडा आता १११४ कोटी ३५ लाख ४६ हजारांवर पोचला आहे. शेतकरी वर्गाची थकबाकी सुमारे ८९१ कोटी २ लाख ७७ हजार इतकी झाली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विजेचा वापर आवश्‍यक असताना या विभागाची थकबाकी मात्र १० कोटी...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 20, 2019
सांगली - विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मतमोजणी करावी, असा शासनाचा नियम आहे. पण खर्‍या अर्थाने सर्वच केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.  सांगली येथे आज...
मे 19, 2019
सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे. कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते. मिरचीला उन्हाळ्यात...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 18, 2019
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युती, आघाडीबरोबरच वंचित आघाडी किती प्रभाव टाकते, यावरच विधानसभेचा सारा पट अवलंबून असेल. वंचित आघाडी कुठे आणि किती मते घेते, यानुसारच विधानसभेसाठी गणिते आखली जातील.  हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ...
मे 17, 2019
मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती.  सुमारे दोन हजारांहून...
मे 16, 2019
सांगली - कोपलेला सूर्य...तापलेली जमीन...पाण्यासाठी वणवण आणि जनावरांसाठी चारा नाही. अशा दुष्काळात माणसांचीही होरपळ होते आहे...हे वर्णन आहे. कृष्णाकाठच्याच सांगली जिल्ह्यातले! सिंचन योजना, जलसंधारणाची कामे यांमुळे एक काळ टॅंकरमुक्‍त म्हणून, तसेच जलयुक्‍त शिवारात राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या या...
मे 15, 2019
आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची...