एकूण 910 परिणाम
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- पीआरपी व मित्रपक्षांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली असून, या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा बुधवारी (२० फेब्रुवारी) नांदेडमध्ये आयोजित केली आहे.  या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी...
फेब्रुवारी 18, 2019
मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेच्या ज्या मोजक्‍या मतदारसंघांकडे...
फेब्रुवारी 18, 2019
बारामती शहर : आपलं वय काय... आपली राजकीय कारकीर्द काय... स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते...आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना 'शकूनी मामा'ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्यावर ...
फेब्रुवारी 18, 2019
सातारा - लोकसभेच्या रणांगणातील योद्‌ध्यांची यादी तयार होत असतानाच राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील सुभेदारांनी बंडाचे निशाण जोरात फडकवायला सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या एकंदर राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंमत देणार का, की पक्षाचा निर्णय अंतिम...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त...
फेब्रुवारी 16, 2019
सातारा - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या काही समर्थकांनी आज थेट बारामती गाठत खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचे काम न करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांना स्पष्ट सांगून टाकला. त्यामुळे खासदार उदयनराजे यांच्या विरोधातील राष्ट्रवादी अंतर्गत मोर्चेबांधणीने पुन्हा...
फेब्रुवारी 16, 2019
सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याचे मानून प्रचाराच्या आघाडीवर हालचाली सुरू आहेत. तर गड राखण्यासाठी भाजप सरसावत असला तरी उमेदवार कोण, यावर एकमत न झाल्याने काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोलापूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आतापर्यंतच्या एकोणीसपैकी केवळ सहा...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीची तयारीही असल्याची चर्चा झाली....
फेब्रुवारी 15, 2019
सोलापूर : गेल्या वर्षभरापासून मतदारांचा काँग्रेसकडे झुकलेला कल पाहता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीतील यशाबाबत आत्मविश्‍वास वाढला आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांत काही प्रमाणात असलेल्या उदासीनतेमुळे त्यांच्या आत्मविश्‍वासाला तडा जाण्याची शक्‍यता आहे.  सोलापुरातील एका खासगी...
फेब्रुवारी 15, 2019
बारामती - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, देश शहीद जवानांच्या पाठीशी उभा आहे. मात्र देशाचे संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला अपयश आल्याचे निदर्शक आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढातून आव्हान देण्याची तयारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दाखवली आहे. पत्रकारांशी गुरुवारी बोलताना ते म्हणाले, ‘‘आपला पक्ष भाजपचा घटक पक्ष म्हणूनच निवडणुकांना सामोरा जाईल पण ‘कमळ’ या...
फेब्रुवारी 15, 2019
मोदी यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा सर्व विरोधी नेत्यांचा प्रयत्न असला, तरी त्याला एकसंध स्वरूप येण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर धडकावले. पुलवामा...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- लोकसभेचे पडघम वाजायला सुरवात झाली असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्‍त सभा 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर दुसरी संयुक्‍त सभा 23 फेब्रुवारी रोजी बीडला परळी येथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेस-...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई: "कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः माढाः 'भाजपने जागा सोडल्यास शरद पवारांविरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल,' असं म्हणत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट पवारांना आव्हान दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून...
फेब्रुवारी 14, 2019
करमाळा -  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार हेच निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय शिंदे...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्रातील जागावाटप अंतिम झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील चर्चेनंतर हा निर्णय झाला. मात्र, कोण किती जागा लढविणार, याचा तपशील समजलेला नाही. गेल्या...