एकूण 93 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
बंगळूर - राज्यातील युती सरकारचा मीच संकटमोचक असल्याने मला समन्वय समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ते रविवारी (ता.३०) म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते.  सिद्धरामय्या म्हणाले, ‘युती सरकार अडचणीत येऊ नये, हे पाहण्यासाठी मला समन्वय समितीचे...
ऑगस्ट 25, 2018
हसन (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही आघाडीमध्ये दुय्यम स्थान स्वीकारावे लागलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखविली आहे. 'मला जनतेचा पाठिंबा आहे. मी मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेईन', असे वक्तव्य...
जुलै 20, 2018
बंगळूर - राज्यातील काँग्रेस आमदारांत बंडखोरीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रिपद गमावण्याची भीती असल्याने बेळगाव जिल्ह्यातील मंत्री रमेश जारकीहोळी आपल्या दहापेक्षा अधिक समर्थक...
जुलै 19, 2018
बेंगलोर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधान पदासाठी नंबर एकचे उमेदवार आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याची गरज आहे. देशात एकाच पक्षाच्या बहुमतातील सरकारपेक्षा आघाडी सरकारने चांगले प्रशासान दिले आहे. असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी व्यक्त केले....
जून 30, 2018
बंगळुरु : काँग्रेस आणि जेडीएसचे नाराज आमदार आमच्या संपर्कात असून, ते भाजपमध्ये प्रवेशास तयार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली. तसेच बंगळुरूमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीला 'अपवित्र आघाडी...
जून 30, 2018
बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार स्थिर असून ते कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगत सरकारच्या स्थैर्याबाबत निर्माण झालेल्या चर्चेस पूर्णविराम दिला.  काही दिवसांपूर्वी सिद्धरामय्या यांच्या व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओवरून चर्चेस उधाण आले...
जून 06, 2018
बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या समर्थकानी या...
जून 04, 2018
बंगळुरू : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या असमाधानकारक कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एस. आर. पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.  पाटील यांनी 25 मे रोजी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविला होता....
जून 01, 2018
महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना या "सख्ख्या मित्रा'वर मात करून पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद मात्र भारतीय जनता पक्षाला साजरा करता आला नाही! याचे कारण त्याचवेळी भंडाऱ्याची एक जागा गमवावी लागली तर उत्तर प्रदेशातील कैराना या बहुचर्चित मतदारसंघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप...
मे 28, 2018
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला ग्रामदैवत सिद्धेश्‍वराचे नाव द्यावे या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आमच्या बाजूनेच न्याय मिळेल असा विश्‍वास आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी न्यायप्रविष्ट बाबीचा विचार न करता विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव...
मे 24, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सरकार अस्तित्वात आले असून, जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीनंतर भाजपकडून आता विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी दावा केला जात आहे. यासाठी भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी आज (गुरुवार)...
मे 20, 2018
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बहुमतासाठी लागणारी 'मॅजिक फिगर' गाठता आली नाही. भाजपला फक्त 7 जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही परिस्थिती भाजपला सत्ता स्थापन करू द्यायचे नाही, हे काँग्रेसने ठरविले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मे 20, 2018
कर्नाटकच्या निवडणुकांनी एकाच पक्षाला पुन्हा संधी न देण्याचा परिपाठ पाळला, तसंच दीर्घ काळात कुणालाही सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळत नाही, ही पंरपरा खंडित करण्याचा विडा उचलणाऱ्या सिद्धरामय्यांना हे आव्हान पेललं नाही. मतं वाढूनही कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात जागा गमावाव्या लागल्या, तर...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकात विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असल्याचे सांगत धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या निर्णयाचे स्वागत केले. भाजपला हे बहुमत सिद्ध करण्यात अपयश येईल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.  येडियुरप्पा यांनी कालच (ता. 17)...
मे 18, 2018
सोलापूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदार संघांत भाजपचे बहुतांश उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लिंगायत फॅक्‍टर निर्णायक भूमिका बजावणार असून, हक्काचा मतदार काँग्रेसपासून दूरावण्याची शक्‍यता आहे. ...
मे 18, 2018
काँग्रेसने विधिनिषेध गुंडाळून ठेवत राजकीय क्‍लृप्त्या लढवल्या, तेव्हा टीकास्त्र सोडणाऱ्या भाजपने कर्नाटकात काँग्रेसचेच अनुकरण केले आहे. तेथे ‘येनकेन प्रकारेण’ सत्तास्थापनेसाठी भाजप किती व्याकूळ झाला आहे, हेच यातून दिसले. लोकशाही राज्यपद्धतीत सरकार कोणाचे, या प्रश्‍नाचे उत्तर मतदारराजाने द्यायचे...
मे 16, 2018
बेळगाव - भाजपच्या "ऑपरेशन कमळ' पासून वाचण्यासाठी धजद आणि कॉंग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. सत्ता स्थापनेपर्यंत कॉंग्रेस आणि धजदने आपल्या आमदारांना राज्याबाहेरील रिसॉर्टवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या दोन्ही पक्षांना "ऑपरेशन कमळ'ची भीती आहे. कॉंग्रेसने खासगी रिसॉर्टमध्ये आमदारांची...
मे 16, 2018
बेळगाव - बंगळूर शहरातील मतदानाची घटलेली टक्केवारी आणि "नोटा' यामुळे भाजपला 14 जागांवर फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून आठ आमदारांची आवश्‍यकता आहे.  बंगळूर शहरातील मतदानाची टक्‍केवारी वाढली असती तर कदाचित बंगळूरमधील भाजपच्या जागा वाढल्या...
मे 16, 2018
बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप, काँग्रेस-जेडीएसकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला तीन आमदारांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले. कर्नाटक...
मे 16, 2018
बंगळूर : काल (ता. 15) कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाल्यानंतर प्रथम भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने त्यांचेच सरकार स्थापन होईल असे चित्र होते, मात्र भाजपला 104 जागा मिळाल्या व सरकार स्थापनेसाठी 112 जागा असणे आवश्यक असते. याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला बिनशर्त पाठिंबा...