एकूण 276 परिणाम
मे 24, 2019
मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार...
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत असतात आणि...
मे 18, 2019
पुणे - विश्‍वास, दयाळूपणा, क्रूरता आणि राजकारण अशा अनेक भावभावना लोकसंगीताच्या माध्यमातून ‘चांदोबा चांदोबा भागलास का !’ हे बालनाट्य लहानग्यांसमोर आणले आहे. ‘ब्यूटी अँड द बिस्ट’ या लघुकथेवरून हे मराठी बालनाट्य साकारले आहे. यामध्ये थरार-संगीत, माणूसपण, त्याची सौंदर्यदृष्टी आणि त्याचे भावविश्‍व उलगडून...
मे 16, 2019
गावातल्या मित्रांना घेऊन ग्रामीण नाटकं करायचो. पुढं आपल्याला जे मनापासून वाटतं, ते समाजासमोर आणलं पाहिजे, या उद्देशानं स्वतः लिखाणही सुरू केलं. अनेक एकांकिका, नाटकं सादर केली. त्यांना अनेक बक्षिसंही मिळाली. मराठी चित्रपटांसह दूरचित्रवाणी मालिकांतून मिळालेल्या संधींचंही सोनं केलं... ज्येष्ठ अभिनेते...
मे 10, 2019
मी लहानाचा मोठा झालो, तो मंगळवार पेठेतल्या सणगर गल्लीत. त्यामुळं ओघानंच पेठेचे संस्कार रुजले. दररोज आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी घडायच्या आणि आपणही आपल्याला जे मनापासून वाटतं त्याबाबत व्यक्त झालं पाहिजे, असं वाटायचं. आजवर पस्तीसहून अधिक चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. सध्या तीन...
मे 07, 2019
खंडोबा तालीम परिसरात लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पेठेतल्या संस्कारातच जडणघडण झाली. स्वतःतील कलाकार खऱ्या अर्थानं जागा झाला तो इथेच आणि मग सुरू झाला रंगमंचावरचा प्रवास. भास्कर जाधव दिग्दर्शित ‘नटसम्राट’, ‘गुंता’ अशी नाटकं केली आणि वीस वर्षापूर्वी याच क्षेत्रात करियर करायचं म्हणून मुंबई गाठली. आजवर...
एप्रिल 30, 2019
कोल्हापूरची असल्याचा सार्थ अभिमान नक्कीच आहे. कारण मला खऱ्या अर्थाने गायिका म्हणून ओळख मिळवून दिली ती याच कलापूरने. जन्म कोल्हापूरचा. शिक्षण कोल्हापुरातच झाले आणि विवाहानंतर आता मुंबईत स्थायिक आहे. गाणे तर सुरूच आहे. पण, संगीत नाटकांची परंपरा आजच्या काळातही सुरूच राहिली पाहिजे, या एकमेव उद्देशाने...
एप्रिल 28, 2019
मी राधानगरी तालुक्‍यातील येळवडे गावचा. गावातील सोंगी भजन म्हणजे आमच्या कलाविष्काराचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर चित्रपटातच आपल्याला करिअर करायचं असल्याची खूणगाठ बांधली आणि सव्वीस वर्षांपूर्वी शहरात आलो. आजवर अनेक चित्रपट केले. अडचणी तर होत्याच पण कधीही डगमगलो नाही. अभिनयाबरोबरच...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 28, 2019
राहाता : भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषण करीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रक्तदाब कमी झाल्याने आज अचानक भोवळ आली. जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना तत्काळ आधार दिला. घशाला कोरड पडल्याने त्यांनी साखरमिश्रित लिंबू-पाणी पिऊन चॉकलेट खाल्ले....
एप्रिल 26, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजूर केला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर विखे-पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली. राधाकृष्ण विखे...
एप्रिल 24, 2019
निफाड (नाशिक): दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ निफाड जिल्हा नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होती. अर्धनग्न अवस्थेतील कृष्णा डोंगरे नावाचा शेतकरी स्टेजवर आला. शेतीला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत शर्ट न...
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 20, 2019
आम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध? पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी पुढे आले आणि ‘सत्तारूढ पक्षाला मतदान करू नका, आपसांत तेढ निर्माण करणाऱ्या पक्षाला मत देऊ नका,’ अशा आशयाचे पत्रक त्यांनी काढले. लगोलग जवळपास तेवढ्याच...
एप्रिल 19, 2019
पुणे - कुणाला रंगमंचावरील चेटकिणीची जादू बघायची असते, तर कुणाला राक्षसाला हरविणारा राजपुत्र हवाहवासा वाटत असतो. मोर, चिमणी, लांडगा, हत्ती, माकड यांसारख्या पक्षी व प्राण्यांचे जगही अनेकांना अनुभवायचे असते. राजा, राणी, राजकन्या, परी, सात बुटके आदींच्या गोष्टी डोळ्यांसमोर साकार होत असल्याची मौज...
एप्रिल 18, 2019
जिंदादिली कोल्हापूरनं स्वाभिमान शिकवला. अनुभवांची शिदोरी दिली आणि चांगल्या माणसांचा गोतावळाही दिला. त्याच बळावर मुंबईत पाय घट्ट रोवून उभा आहे. जाहिराती, चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठीची डिझाईन्स आम्ही बनवत असतो. नवनिर्मितीच्या या आनंदात कोल्हापूरनं दिलेली कलात्मक दृष्टी नेहमीच वेगळं काही तरी करण्याची...
एप्रिल 18, 2019
The Lok Sabha poll campaign has reached its peak. Congress President Rahul Gandhi is holding rallies all over the country and severely criticising the National Democratic Alliance government’s style of functioning.spoke openly and freely in detail about Congress Party’s manifesto, GST, Kashmir...
एप्रिल 18, 2019
पुणे - निसर्गाने अंधत्व देऊन आयुष्यात अंधार लादला असला, तरी इच्छाशक्ती असेल, त्यावर मात करता येते, याचा उत्तम अनुभव म्हणजे अंध कलाकारांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’... यातून नाटक ही डोळस माणसांची कला आहे, हा समज त्यांनी दूर केलाच आणि स्वत:ला दिसत नसले, तरी डोळस माणसांना व्यावसायिक नाटक पाहिल्याचे...
एप्रिल 17, 2019
स्थळ - चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह...वेळ - सकाळी पावणेअकराची...लोकसभा मतदानासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भरलेले सभागृह...काही क्षणात पडदा उघडतो आणि सुरु होतो " निवडणूक 206 पिंपरी ' या नाटकाचा प्रयोग...रंगमंचावर हे काय सुरु आहे...याची दबक्‍या आवाजात कूजबूज सुरु होते, अखेरीस...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...