एकूण 218 परिणाम
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 16, 2018
चित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या "शून्य उत्तराची बेरीज' या पुस्तकात वाचायला मिळते. उराशी बाळगलेल्या प्रत्येक सुखस्वप्नांची राखरांगोळी होत असताना जिद्दीनं उभी राहून आशावाद आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर स्वत:ची...
डिसेंबर 16, 2018
कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन...
डिसेंबर 15, 2018
"लय भारी' या यशस्वी चित्रपटानंतर रितेश देशमुखचा "माऊली' हा चित्रपट आला आहे. "लय भारी' हा रितेशचा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. त्यामधील रितेशचा लाजबाब अभिनय, श्रवणीय संगीत, निशिकांत कामतचे नेटके दिग्दर्शन, दमदार संवाद अशा काही बाबींमुळे हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला होता. त्यामुळे "माऊली'...
डिसेंबर 11, 2018
पुणे : ''साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्य वतीने 23, 24 डिसेंबरला आयोजित केलेल्या जाणाऱ्या 18 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो भूषविणार आहेत.'' ,अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप...
डिसेंबर 09, 2018
पणजीमध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडला. नात्यांचे कंगोरे उलगडत नेणारे, माणूसपणाचा शोध घेणारे चित्रपट हे यंदाच्या इफ्फीचं वैशिष्ट्य. कॅलिडोस्कोपमध्ये कसं मूळ विशिष्ट आकारांच्या मिश्रणातून एकेक वेगवेगळे आकार दिसत जातात, तसेच हे चित्रपट म्हणजे "नात्यांचे कॅलिडोस्कोप' होते. दोन...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
डिसेंबर 06, 2018
मुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅडेड की पुशअप या विनोदी सीरिजमध्ये तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेतझळकणार आहेत....
डिसेंबर 04, 2018
पुणे - वाचकांना भावलेल्या साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या लघुकथा आता इंग्रजी भाषेतील वाचकांसाठीही उपलब्ध होणार आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 14 डिसेंबरला या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा गदिमा साहित्य कला अकादमी व प्रा....
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
डिसेंबर 02, 2018
सर्वच देवदेवतांविषयी भारतीय जनमानसात पूज्य भक्तिभाव असला, तरी गणपतीविषयी प्रत्येकाच्या मनात काहीसा वेगळा, संवेदनशील श्रद्धाभाव आहे. अग्रपूजेचा मानही श्रीगणेशाला आहे. विशेषत: आपल्या महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या मनात गणपतीविषयी विशेष श्रद्धाभाव आहे. गणपती उत्सव हे मराठी मातीचं वैशिष्ट्य आहे....
नोव्हेंबर 26, 2018
महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - लय - तालाच्या भाषेतून त्या चौघी जणी एकमेकींशी हितगुज करीत होत्या. पदन्यास, वैविध्यपूर्ण हस्तके व मुद्राभिनयाच्या साहाय्याने त्या निरनिराळ्या कथाप्रसंगांना जिवंत करीत होत्या. आपापली स्वतंत्र छटा जपूनही त्या नृत्याच्या माध्यमातून कमालीची एकरूपता साधत असल्याचे रविवारी दिसून आले. तीन पिढ्यांच्या...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 25, 2018
भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे आणि या "खेळा'...
नोव्हेंबर 24, 2018
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) तिसरा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाचा एक वेगळाच चेहरा समोर आणणारा "डिव्हाइन विंड' या अल्जेरियाच्या व अनोख्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या युक्रेनच्या "व्हेन द ट्रिज फॉल्स' या दोन चित्रपटांनी गाजवला. प्रेक्षकांना आजही रांगांमध्ये ताटकळावे लागले...
नोव्हेंबर 23, 2018
किरवंत... स्मशानात मर्तिकाचं काम करणारा भटजी. मराठीतच नव्हे तर भारतीय साहित्यात स्मशानकर्मे करणाऱ्या ब्राह्मणाची समस्या, कैफियत मांडली गेलेली नव्हती. कुठं सापडला हा किरवंत?  करीरोडचा एक नाट्यमित्र सुहास व्यवहारे. माझी "कुणाचे ओझे' ही एकांकिका एका स्पर्धेसाठी करीत होता. त्यापूर्वी "घोटभर पाणी' ही...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - गणिताचे पाढे, विज्ञानाचे धडे, भाषेचे व्याकरण यांची घोकंपट्टी होणाऱ्या वर्गांमध्ये आता संगीताचे सूरही निनादणार आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्यांदाच गायन आणि वादन या कलांचे धडे गिरविण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात  काही निवडक...