एकूण 354 परिणाम
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. ...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या समर्थनार्थ...
जून 01, 2019
जामखेड - 'राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण का करायचे?' असा प्रश्‍न खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपस्थित केला. याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. मला याबाबत काही माहिती नाही. मात्र, याबाबतचा निर्णय चर्चा करूनच घेतला जाईल. परस्पर निर्णय घेता येणार नाही, असे ठाम मत त्यांनी पत्रकार...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती...
मे 28, 2019
दौंड (पुणे) : 'बारामती मतदारसंघात रस्ते, विविध सुविधा होत राहतील, परंतु पाणी नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. पाण्याचे योग्य नियोजन नसेल तर पुढची पिढी आम्हाला 'प्यायला पाणी का नाही ?', असे विचारेल अशी चिंता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.  दौंड तालुक्यात आज...
मे 28, 2019
सर्व विजयी उमेदवार कोट्यधीश; एकाचे शिक्षण पाचवी, तर एक पीएचडीधारक मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 खासदारांपैकी भाजपचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस, "एमआयएम'चा एक व अपक्ष एक असे खासदार विजयी होऊन संसदेत पोचले आहेत. राज्यातील या 48 खासदारांमध्ये 28...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष...
मे 25, 2019
पुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत.   पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात ठेवलेला जनसंपर्क, मोदी...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
मे 24, 2019
बारामती - निवडणूक लोकसभा असो की विधानसभेची, बारामतीत निवडणूक हा उत्सवाचा भाग होती. आताही बारामती राष्ट्रवादी काँग्रेसनेच जिंकली आहे. गतवेळेपेक्षाही अधिक मताधिक्‍य घेतले असले तरी मावळमधील पराभव आणि अपेक्षेपेक्षा कमी जागांवर मिळालेला विजय हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या एवढा जिव्हारी लागला की, आज...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला असला तरी डॉ...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 23, 2019
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपच्या कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यावर सुमारे दीड लाख मताधिक्याने आघाडी घेतली. बारामतीत मतदारसंघात सुळे यांचा विजय झाला असला तरी खडकवालसल्याने मात्र राष्ट्रवादीला चिंतनच नव्हे चिंताही करायला भाग पाडले आहे. लोकसभा निवडणुकीत सुळे...
मे 23, 2019
पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. ...