एकूण 25 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
आग्रा - बकरी ईद निमित्त जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या ताजमहालमध्ये पर्यटकांना उद्या मोफत प्रवेश करता येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी बकरी ईदनिमित्त ताजमहालमध्ये तब्बल तीन तास मोफत प्रवेश देण्याचा निर्णय भारतीय पुरातत्व विभागाने घेतला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.  भारतीय...
जुलै 22, 2019
मुंबई - गेट वे ऑफ इंडियाजवळील ताजमहाल हॉटेलच्या बाजूला असलेल्या चर्चिल चेंबर इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी झाला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आज दुपारी ही भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.  कुलाबा येथील चर्चिल...
जून 09, 2019
पुणे : पॅरिसला न जाता भारतात, अगदी पुण्यात आयफेल टॉवरसमोर उभे राहून सेल्फी काढायचा आहे का? पिसाचा कललेला मनोरा (इटली), ईजिप्तमधलं विशाल पिरॅमिड आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आश्चर्य मानल्या जाणाऱ्या अशा सात वास्तू पहायला सहकारनगरमध्ये चला जगातल्या सात नवलाईच्या वास्तूरचना सहकारनगरधील यशवंतराव...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...
मार्च 12, 2019
कोल्हापूर - येथे महिनाभर रंगलेल्या राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दादरच्या कलाकृती संस्थेच्या ‘सवेरेवाली गाडी’ या नाटकाने पहिला क्रमांक पटकावला. दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे पुण्याच्या उद्‌गार संस्थेच्या ‘बैतुल सुरूर’ आणि नागपूरच्या बहुजन रंगभूमी संस्थेच्या ‘भारतीय रंगमंच के आद्य...
मार्च 06, 2019
मध्यरात्रीनंतर अनोळखी शहरात उतरलो होतो. मनात भीतीची भिंत उभी. पण त्या भिंतीपार जायचा विश्‍वासही मिळाला. काही घटना माणूस आयुष्यभर विसरत नाही. त्या कायमच्या मनामध्ये राहतात. बरीच वर्षे झाली. मी आणि माझे पती आमच्या लग्नानंतर बंगलोरला फिरावयास गेलो होतो. तिथून आम्ही तीन दिवसांसाठी जवळच्या स्थळांना भेट...
जानेवारी 28, 2019
बंगळूरूः हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका, तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते. इतिहास लिहायचा की वाचायचा हे तुम्हीच ठरवा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कोडागूमध्ये रविवारी (ता. 27) झालेल्या...
जानेवारी 22, 2019
पुणे - ‘‘गेल्या साडेचार वर्षांमध्ये आम्ही जे भोगतो आहे, त्याला ‘सामाजिक समतेचे प्रवाह’ या पुस्तकातून उत्तर दिले आहे. सर्वधर्मसमभावाची चळवळ नाजूक आहे, त्यामुळे कोणत्याही एका समाजाच्या नेतृत्वाला चळवळ बळी तर पडत नाही ना, याचा विचार करावा लागतो,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - ब्रिटिश वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले मुंबईचे प्रवेशद्वार अर्थात ‘गेटवे ऑफ इंडिया’ची दिमाखदार भव्यदिव्य वास्तू पाहून पर्यटक सुखावून जातो. ‘गेटवे’च्या परिसरात आल्यावर फेसाळणारा समुद्र आणि पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या सान्निध्यात तो हरखून जातो. मात्र, आजूबाजूला टॅक्‍सी चालकांकडून होणारी...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका "हायब्रीड एरो' नौकेद्वारे हा प्रवास प्रत्यक्षात शक्‍य होणार आहे. यातील सारे अडथळे दूर करून आगामी 26 जानेवारीला ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार आहे, असे केंद्रीय परिवहन, महामार्ग...
ऑगस्ट 12, 2018
मी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या पिढ्यांसाठी काय निर्माण करतो आहे, याचा विचार आपण करायला नको का? अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्याला आपसूकच मिळाला आहे; पण आपल्या पुढच्या पिढ्यांचे डोळेही...
ऑगस्ट 12, 2018
पारंपरिक बंदिशरचना सुंदर आहेत, यात शंकाच नाही; पण माणसाला नावीन्याची ओढ असतेच. पारंपरिक बंदिशींमधले विषय व शब्दरचना पाहिली तर बऱ्याचदा तोच तोचपणा जाणवतो. "सास-ननंदिया', "जेठनिया' आदी नातेसंबंधाच्या अनेक बंदिशी आढळतात. इतर काव्यात अनेकविध विषय जर रसिकांना भावतात तर मग गायनातल्या बंदिशींमध्येसुद्धा...
जुलै 14, 2018
इतिहास म्हटला, की अलीकडे आपल्याकडे अनेकांचे बाहू फुरफुरू लागतात, छाती अभिमानाने फुलून येते वगैरे. परंतु याच इतिहासाच्या, संस्कृतीच्या खुणा जपण्याबाबत मात्र समाजात कमालीची अनास्था दिसते. समाजातच अनास्था असल्यावर सरकारे तरी कशाला हातपाय हलवितील? ही अवस्था देशाच्या विविध भागांतील अनेक ऐतिहासिक...
जुलै 11, 2018
नवी दिल्ली : जगातील सात आर्श्चयांपैकी एक असलेल्या ताजमहालबाबत आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मत नोंदविले. न्यायालयाने सांगितले, की ताजमहाल बंद करा, त्याला नष्ट करा किंवा त्याची योग्यप्रकारे देखभाल करा, असे सर्वोच्च न्यायालाने केंद्र सरकारला सांगितले. ताजमहालची योग्यरितीने देखभाल...
मे 27, 2018
पुणे : वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्यशिल्प म्हणजे ताजमहाल. जगाला मोहिनी घातलेल्या या वास्तूचा ताबा कुणाकडे असावा, हा प्रश्‍न अठराव्या शतकात निर्माण झाला होता. हा ताबा लष्कराकडे असावा की मुलकी प्रशासनाकडे, या संदर्भात पत्रव्यवहार झाले. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या छायाप्रतींचे जतन पुण्यात होत आहे. ...
मे 07, 2018
ख्यातनाम ब्रिटिश विनोदकार पी. जी. वूडहाउस यांची कन्या लिओनारा निवर्तली, तेव्हा हादरून गेलेल्या अवस्थेत ते म्हणाले होते, "मला वाटलं की ती अमर आहे...' मराठी मनामनांवर निर्विवाद अधिराज्य गाजविणारे विख्यात भावगीत आणि गजलगायक अरुण दाते यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलासक्‍त मनाची हीच...
मे 06, 2018
जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाचा रंग पिवळट पडतो आहे आणि त्याची सरकारला काहीही काळजी नसल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने या आठवड्यात केली. त्याच वेळी दिल्लीतील लाल किल्ल्याचे व्यवस्थापन एका खासगी कंपनीला दिल्याने गदारोळ उठला. देशातील वारसास्थळांबद्दल सरकारबरोबरच स्थानिक नागरिक आणि...
मे 02, 2018
नवी दिल्ली : जगातील सात आश्‍चर्यांमध्ये गणना केली जाणाऱ्या आग्रा येथील ताजमहालाच्या रंगात झालेल्या बदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने देश-विदेशांतील तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि डागडुजी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचनाही न्यायालयाने...
एप्रिल 26, 2018
मिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय? तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत मिरजमार्गे नवनव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने देशाचा बहुतांश प्रवास एका टप्प्यात करणे  शक्‍य झाले आहे. दक्षिणेत पाँडेचेरीपासून उत्तरेत...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - क्रिकेटमध्ये जसा सचिन, गाण्यात लता दीदी तसेच अपंग पुनर्वसनात काम करणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांसाठी स्टीफन हॉकिंग म्हणजे सळसळती प्रेरणा देणारं व्यक्तिमत्त्व. नव्वदच्या दशकाची सुरुवात असेल; त्यांचं मुंबईत व्याख्यान होणार असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही मुंबई गाठली... त्यावेळी त्यांच्याशी...