एकूण 25 परिणाम
November 30, 2020
मुंबई: मुंबईत कोरोना आजाराचे प्रमाण कमी होण्याबरोबरच मृतांची संख्याही नोंदली कमी गेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत 61 टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार असे स्पष्ट होते की, मुंबईकर कोरोनाबरोबर ध्यैर्याने लढत आहेत. देशाच्या उत्तर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव...
November 24, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 37 हजार 975 रुग्णांचं निदान झालं असून 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 91 लाख 77 हजार 841 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 34 हजार 218 झाला असल्याची...
November 23, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील 4-5 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णवाढ 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 44 हजार 059 रुग्णांचे निदान झाले असून 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या अगोदर कोरोनाचे रुग्णवाढ कमी झाली होती. प्रतिदिन...
November 20, 2020
मुंबई, ता. 20  : महाराष्ट्रातील महामार्गांवर मोठ्या व्यापारी वाहनांवर आकारण्यात येत असलेल्या टोलच्या रकमेत दहा टक्के वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयास ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ने विरोध केला आहे.  राज्य सरकारने नुकताच यासंदर्भात निर्णय घेतला आहे. छोट्या वाहनांना टोलमधून सूट मिळते किंवा...
November 20, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती....
November 18, 2020
अहमदाबाद - गुजरातमधील वडोदरा इथं भीषण अपघात झाला असून दोन ट्रकच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.  वडोदरा क्रॉसिंग हायवेवर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. दोन्ही ट्रक समोर समोर...
November 17, 2020
नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशातील प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 29 हजार 164 रुग्णांचं निदान झालं असून 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील कोरोना (COVID19) बाधितांचा आकडा 88 लाख 74 हजार 291 वर गेला आहे तर एकून मृत्यूंची संख्या 1 लाख 30 हजार 519 झाली...
November 15, 2020
मुंबईः  दिवाळीचा सण आणि त्यात जोडून रविवार, त्या पार्श्वभूमीवर सलग सुट्यांचा परिणाम मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे सहित सर्व प्रमुख रस्त्यावर झाला. एक्स्प्रेस वे सहित खालापुरातील अन्य सर्वच प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास खालापूर टोल नाक्यावर...
November 09, 2020
नवी दिल्ली: देशात गेल्या 7 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन 40 ते 50 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार 903 रुग्णांचं निदान झालं असून 490 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 85 लाख 53 हजार 657 झाली असून 1 लाख 26 हजार 611...
November 06, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाचे जवळपास 48 हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 670 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन 47 हजार 638 रुग्णांचं निदान झालं आहे. आतापर्यंत देशातील कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 84 लाख 11 हजार 724 झाली आहे. तर कोरोनामुळे देशातील 1 लाख 24 हजार 985 लोकांचा...
November 05, 2020
नवी दिल्ली: काही दिवसांपुर्वी कोरोनाचा देशातील प्रभाव उतरताना दिसला होता. प्रतिदिन कोरोना रुग्णांची वाढ 40 हजारांच्या आत आली होती. पण नंतर कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 50 हजार 209 रुग्णांचे निदान झालं असून 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना...
November 04, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची दुसरी लाट येत असताना भारतातील कोरोना रुग्ण कमी जास्त होताना दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 514 रुग्णांचा मृत्यू होऊन 46 हजार 254 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. आतापर्यंत देशात 83 लाख 13 हजार 877 जणांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोनाने (COVID19) मृत्यू...
November 01, 2020
नवी दिल्ली : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. युरोपातील काही देशांत आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट आधीपेक्षाही गंभीर मानली जात आहे. त्यामुळे त्या देशांत  पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला आहे. भारतात देखील आता पहिली लाट येऊन गेली असून...
October 31, 2020
नवी दिल्ली - भारतातील नव्या कोरोना रुग्णांचा वेग मंदावला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून देशात आतापर्यंत एकूण 81 लाख जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच दिलासादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. देशात 3 ऑगस्टनंतर ऑक्टोबर...
October 29, 2020
नवी दिल्ली - भारतातील कोरोना ससंर्गाचा वेग सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला तरी धोका कमी झालेला नाही. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 80 लाखांच्यावर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात देशात 49 हजार 881 नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा...
October 27, 2020
नवी दिल्ली- भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 36,469 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 18 जूलैनंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 79,46,429 इतका झाला आहे. सोमवारी 488 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे....
October 26, 2020
नवी दिल्ली- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 79 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे...
October 11, 2020
मुंबईः  ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, दुसरीकडे कोरोना या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. त्यात जिल्ह्यात काही दिवसांपासून जिल्ह्यात तिशीच्या आत असलेल्या मृतांच्या आकडेवारीने 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 29, 2020
मुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे. त्याविषयी जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे. आपल्यापैकी अनेकजण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) आणि उच्च रक्तदाब यांसारख्या...