एकूण 2602 परिणाम
डिसेंबर 19, 2018
वर्धा : केवळ परिचर्येपुरतेच नव्हे तर एकूणच वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रीय पुरावाधिष्ठित शुश्रूषा आणि आरोग्यसेवेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. या क्षेत्रातील प्रत्येकाच्या दैनंदिन कार्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे, असे प्रतिपादन कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा दत्ता मेघे...
डिसेंबर 19, 2018
नागपूर : शहरात वीज हजार इमारती तीस वर्षांवरील आहे. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार 30 वर्षांवरील इमारतीचे ऑडिट करणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र, या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असून या 20 हजार इमारती कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या इमारतीतील लाखावर नागरिकांचा जीव धोक्‍यात...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
डिसेंबर 18, 2018
पुणे : शहरातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुण्यात येत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. . @PuneCityTraffic @PuneCityPolice @PMCPune Are there any Traffic Diversions on 18...
डिसेंबर 18, 2018
नाशिक - भारत प्रतिभूती मुद्रणालयात मृत व शारीरिकदृष्ट्या अकार्यक्षम कामगारांचे वारस प्रेसमध्ये नोकरी मिळावी यासाठी एका बाजूला प्रतीक्षा यादीवर आहेत, तर दुसरीकडे मात्र प्रेसमधून निवृत्त झालेल्या ६३ निवृत्त कामगारांना पुन्हा कामावर घेतले गेले आहे. प्रेसच्या स्थापनेपासून प्रथमच असा प्रकार घडला आहे....
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान व्यक्त...
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "एसआयपी'चा...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 17, 2018
पुणे - बालविश्‍वांच्या कल्पनाशक्तीला भरारी देणारी, देशातील सर्वांत मोठी असणारी "सकाळ चित्रकला स्पर्धा' रविवारी महाराष्ट्र आणि गोव्यात सुमारे दोन हजार केंद्रांवर उत्स्फूर्तपणे पार पडली. महानगरांपासून ते खेड्यापाड्यांतील केंद्रांवर चिमुकल्यांनी स्पर्धेसाठी गर्दी केली होती. पुणे विभाग...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव...
डिसेंबर 15, 2018
पुणे : "अंतराळात कोणत्याही ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी आढळून आलेली नाही. मग पृथ्वीवर असे काय वेगळे आहे, याचे कुतूहल जागृत व्हायला हवे. खगोलजीवशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या अभ्यासाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञान संवाद वाढवायला हवा,'' असे...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ""मायमराठीची दशा केविलवाणी झाली आहे. आता ही मायमराठी असण्यापेक्षा "मम्मीमराठी' झाली आहे. शेकडो इंग्रजी शब्द गनिमी काव्याने मराठीत शिरले आहेत. मराठी भाषेच्या झालेल्या चिंधड्या पाहवत नाही. मराठी शब्द लोप पावत असल्याचा खेद वाटतो. मराठी माणसं लढाऊ वृत्तीचे असतानाही मराठी भाषेच्या अस्तित्वाच्या...
डिसेंबर 15, 2018
लातूर : वेस्टर्न म्युझिक आणि फिल्म म्युझिकप्रमाणेच शास्त्रीय संगीतालाही लोकाश्रय मिळाला पाहिजे. ज्या संगीतात सुसंस्कृता ठासून भरलेली आहे, जे संगीत तुम्हाला मन:शांती देते त्यापासून दूर जाणे योग्य नाही. त्यासाठी शास्त्रीय संगीतातील कलाकारांनीही आपले गाणे खणखणीत ठेवावे आणि श्रोत्यांनी अधिक जाणकार...
डिसेंबर 15, 2018
अकलूज : उपमुख्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते-पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी आज येथे बंद खोलीत चर्चा केली. सध्याच्या दोलायमान राजकीय वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन नेत्यांत काय चर्चा झाली असावी याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.  राष्ट्रवादी...
डिसेंबर 15, 2018
नाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून चांगले अनुदान मिळेल, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे अनुदानाचा विषय राज्याकडे आल्यास अटी अन्‌ शर्तीमध्ये मदत लटकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू...
डिसेंबर 15, 2018
"ऑनलाइन काय शोधलं जातं यावरून तुमच्या समाजाला काय हवं आहे, याची थोडी झलक पाहायला मिळते', असं हल्ली म्हणतात. "गुगल' या जगविख्यात सर्च इंजिनद्वारे दरवर्षी डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला जाणारा "इयर इन सर्च' या अहवालातून नेमकं हेच सगळं दिसतं. समाजातल्या सध्याच्या ट्रेंड्‌सचा आरसाच यातून समोर येत असतो. ...
डिसेंबर 15, 2018
सोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर लोकवस्तीमध्ये दिसून येत आहे. कोणतेही वन्यजीव लोकवस्तीमध्ये दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाला कळवावे. वन्यजीव आपल्याकडे येत नाही तर आपण...
डिसेंबर 15, 2018
बारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो? शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे अशा महत्त्वपूर्ण टिप्सपासून ते कामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ या सल्ल्यापर्यंत अभिषेक ढवाण या...
डिसेंबर 14, 2018
आर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून येतो. पंतप्रधान थेरेसा मे यांचे पद टिकले असले, तरी पेच मिटलेला नाही. इ च्छित मुक्कामी पोचण्यासाठी अडथळा ओलांडून धड उडी मारता येत नाही आणि मागे...
डिसेंबर 13, 2018
यावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सूर्यवंशी यास राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. आज एटीएसच्या पथकासोबत गावात आल्यामुळे त्याचे घर व...