एकूण 15 परिणाम
November 15, 2020
मुंबईः रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी 13 नोव्हेंबरला पुरातन वास्तु पर्यटकांसाठी खुल्या केल्या असल्या तरी मात्र दिवाळीच्या कार्यालयांना सलग सुट्टया असल्यामुळे प्रवासी बोट वाहतुकदारांना याचा फटका सहन करावा लागत आहे. जोडून सुट्टया घेऊन आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावे लागल्याने तीव्र नाराजी पाहावयास...
November 15, 2020
मुंबईः  गेल्या 2 वर्ष रखडलेल्या नवीन पत्री पुलाच्या कामाला वेग आला आहे. गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबर आणि 28 आणि 29 नोव्हेंबरला मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर वाहतूक पोलिसांनी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर रात्री 10 ते पहाटे 5 च्या काळात पत्री पूलवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय...
November 12, 2020
मुंबईः  यंदा कोरोनामुळे दीपावली जरी साधेपणाने साजरी करण्याचे सरकारी आवाहन असले तरी ही लोकांना दिवाळ सणानिमित्त दोन दिवसावर आलेल्या दिवाळी खरेदीस उत्साह पाहायला मिळतोय. दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि...
November 09, 2020
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्‍शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण दिशेच्या उड्डाणपुलाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 9) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. नव्या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ठाण्याला जाण्यासाठी चांगली कनेक्‍टिव्हिटी...
November 06, 2020
मुंबई: वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी वाहन चालकाचा परवाना रद्द करणारी तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात येणारेत.  मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली आहे. वाहतूक पोलिसांवर होत असलेल्या...
October 31, 2020
पॅरिस : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  फ्रान्ससह युरोपातील अन्य काही देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची नामुष्की ओढावली आहे. फ्रान्सने लॉकडाउची घोषणा देखील केली. यामुळे पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी वाहनांच्या जवळपास 730 किलोमीटर (454 मैल) लांबच्या लांब रांगा...
October 26, 2020
कटक: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामध्ये मग कोणताही फोटो, एखादा व्हिडिओ अथवा मिम्स असू शकते. काही लोकांच्या चांगल्या कामांचीही सोशल मीडियावर स्तूती होताना दिसते आणि त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. सध्या असाच एक ओडिसामधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल...
October 24, 2020
मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतूक पोलिसाच्या कॉलरवर थेट हात घालण्यात आलाय. काळबादेवी परिसरात कर्तव्यावर असताना एकनाथ पोटे नामक ट्राफिक पोलिसाने वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यास सुरवात केली. कारवाई करताना ट्राफिक पोलिसाने अपशब्द वापरलेत असं या महिलेलंचं म्हणणं आहे. दरम्यान या...
October 20, 2020
खोपोल ः खोपोली पेण राज्य महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे; मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना गाडी चालवताना त्रास होत आहे; तर या रस्त्याला लागून असलेल्या स्टील कारखान्यामधून दररोज जा-ये करीत असलेली अवजड वाहनांची संख्या वाढले आहे. हे अवजड वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत...
October 20, 2020
मुंबईः कल्याणमधील दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला वेग आला आहे. चौथ्या टप्यात पत्रीपूल गर्डर ठेवण्याचे काम सोमवारपासून म्हणजेच 19 ऑक्टोबर ते गुरुवार  22 ऑक्टोबर रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रीपुलावरील वाहतूक बंद करण्यात येईल. या आठवड्यात रेल्वेच्या वरिष्ठ...
October 12, 2020
विरार ः वसई विरार शहरात सध्या वाहतुक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. वसई पूर्व पश्‍चिम ब्रिजवर रोज गर्दी होत असतानाच आता विरार पूर्व पश्‍चिम ब्रिजवरही वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. रोज सायंकाळी सात वाजताच सुमारास विरार फ्लायओव्हर ब्रीजवर वाहनांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होते. जवळपास तीन किमी लांब...
October 06, 2020
काबुल - अफगाणिस्तानचा सलामीवीर नजीबुल्लाह तारकाई याचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी कारने दिलेल्या धडकेत नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला होता. नंगरहार इथं रस्ता ओलांडताना एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. यामध्ये नजीबुल्लाह तारकाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नजीबुल्लाहच्या निधनाचे...
October 01, 2020
ठाणे : कोरोनामुळे नोकरी-व्यवसायाला घरघर लागली असताना एकीकडे 1 ऑक्‍टोबरपासून टोलदरात वाढ करण्यात आल्यामुळे वाहनचालकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे या टोल दरवाढीची अनेक वाहनचालकांना कल्पनाच नसल्याने टोलनाक्‍यांवर वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. टोल दरवाढीमुळे सकाळ-संध्याकाळी पूर्वद्रुतगती...
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे.  रेल्वे सेवा विस्कळीत  चर्चगेट ते...
September 19, 2020
मुंबई : मुंबई उपनगरामधून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल रेल्वेचा आज अपघात झालाय. उपनगरीय रेल्वेचे डबे रुळावरून घसरलेत. या अपघातामुळे आटगाव ते कसारा या डाऊन मार्गावरील सेंट्रल रेल्वेची उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत ...