एकूण 1483 परिणाम
फेब्रुवारी 06, 2018
चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा घोषणेसाठी जिल्हा संघर्ष समितीच्यावतीने 26 जानेवारी व 5 फेब्रुवारी अशा दोन मुदती राज्य सरकारला दिल्या होत्या. पण यावर अद्याप कार्यवाही न झाल्याने सोमवारपासून  (ता. 5 ) बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.  प्रारंभी विविध संघटनांच्या वतीने बसवेश्‍वर सर्कलमध्ये रास्तारोको करण्यात...
फेब्रुवारी 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात मागासवर्गीयांसाठी घसघशीत तरतूद केल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दावे केले असले, तरी प्रत्यक्षात अनुसूचित जाती, जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यामध्ये सरकारने हात आखडता घेत फसवणूक केली, असे टीकास्त्र दलित संघटनांनी सरकारवर सोडले आहे.  2018-19 च्या...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतनविषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय आणि आगार कार्यालयासमोर 25 जानेवारीला एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी होळी केली होती. या आंदोलनात महामंडळातून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला होता. या कर्मचाऱ्यांना...
फेब्रुवारी 06, 2018
कल्याण - कोरेगाव भीमा दंगलीनंतरच्या "बंद'ला हिंसक वळण लागल्यामुळे राज्यभर अटकसत्र सुरू करण्यात आले होते. या कारवाईत अन्याय झाल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशावरून राज्याचे अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे अध्यक्ष व माजी न्यायाधीश सी. एल. थूल यांनी सोमवारी कल्याण येथून राज्याचा...
फेब्रुवारी 05, 2018
अक्कलकोट : दिनांक २५ जानेवारीला एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय व आगार कार्यालयाच्या समोर होळी करण्याचे आंदोलन केले. या आंदोलनात एसटीतून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता...
फेब्रुवारी 05, 2018
कुडाळ - ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोधच आहे. नारायण राणे आता या प्रकल्पाला विरोध करतात. त्यावेळी जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी त्यांनी पायघड्या घातल्या होत्या, अशी टीका शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात केली. दरम्यान भाजपचे आजचे नेते शिवसेनेला पाण्यात...
फेब्रुवारी 05, 2018
पाली (जि. रायगड) - अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे चाळीसावे अधिवेशन शनिवारी (ता. ३ फेब्रु.) येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयात संपन्न झाले. खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हुसेन दलवाई म्हणाले की, सन 1999 नंतर मंजूर असलेली वर्ग 'क' ...
फेब्रुवारी 05, 2018
परभणी - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सर्व प्रथा मोडीत काढल्या आहेत. दरवर्षी 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो; मात्र यंदा जानेवारीतच अधिवेशनाला सुरवात करून एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी...
फेब्रुवारी 04, 2018
मुंबई : आदिवासींच्या बनावट जमात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकऱ्या बळकावणाऱ्या 11 हजार 770 सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकारच्या सेवेतून एकाच वेळी इतक्‍या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रकार राज्याच्या इतिहासात प्रथमच घडणार...
फेब्रुवारी 03, 2018
कोल्हापूर, ता. 3 : 'शिक्षण बचाओ, देश बचाओ' अशी घोषणा देत 'शिक्षण वाचवा नागरी कृती समिती'तर्फे राज्य शासनाविरूद्ध दसरा चौकात आंदोलन करण्यात आले. शासनाने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. कमी पटसंख्येचे...
फेब्रुवारी 02, 2018
 मिरज - येथील रेल्वे जंक्शनवर रुग्णांसाठी पुरेशा संख्येने  चाकाच्या खुर्च्या उपलब्ध नसल्याने रुग्णांना हमालांनी हातगाड्यावरुन ढकलत नेल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रवासी संघटनांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.  मिरज स्थानकात रुग्णांना हलगर्जीपणाची वागणूक मिळत असल्याचे अनुभव सातत्याने...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात विशेष तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.  दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, ""महागाई...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई : शालार्थ संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे यंदा जानेवारीचा पगार शिक्षकांना अॉफलाईन पद्दतीने दिला जाणार आहे. गुरूवारी रात्री उशिरा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला. शिक्षकांचा वाढता रोष लक्षात घेता शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत अॉफलाईन पगार नाही मिळाला तर  ...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पात विशेष तरतूद नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, 'महागाई...
फेब्रुवारी 02, 2018
मुंबई - स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्राचा कोपरान्‌ कोपरा पिंजून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईहून केवळ एक दिवसासाठी एखाद्या ठिकाणी सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्याची सवय इतिहासजमा करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन लोकसभा मतदारसंघांचा एकत्रित दौरा करणार आहेत....
फेब्रुवारी 01, 2018
कोल्हापूर - धनगर समाज क्रांतिकारी संघातर्फे रविवारी (ता. ४ फेब्रुवारी) धनगर समाज आरक्षण रॅलीचे आयोजन केल्याची माहिती संयोजक, संस्थापक अध्यक्ष विलासराव वाघमोडे (बापू) यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. वाघमोडे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले अनुसूचित जमातींचे एस.टी....
फेब्रुवारी 01, 2018
मुंबई - राज्यातल्या माथाडी कामगारांच्या संघटनांपुढे राज्य सरकार नमले असून, माथाडी मंडळांच्या एकत्रीकरणाचा निर्णय मागे घेतला आहे. यासंदर्भात कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्या दालनात मंगळवारी माथाडी कामगार नेत्यांची बैठक झाली. राज्यातल्या विविध 36 माथाडी बोर्डांचा कारभार सुसूत्र व्हावा, यासाठी...
जानेवारी 30, 2018
नाशिक - महापालिकेच्या शाळांमध्ये सलग बारा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय जाहीर करताना २००३ मध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी दिले. वेतनश्रेणी लागू करण्याच्या निर्णयासह शिक्षक संघटनांच्या समन्वय...
जानेवारी 29, 2018
कल्याण - रेल्वे प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानकातून सुखकर आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध उपाययोजना करत असून पहिल्या टप्यात रेल्वे स्थानकातील कॅन्टीन आणि कार्यालय स्टेशन बाहेर हलविण्यात येणार असून प्रवाशांचे मन प्रसन्न राहावे, यासाठी स्टेशनात रंगरंगोटी आणि विविध चित्र काढण्याचे...
जानेवारी 29, 2018
कल्याण - कल्याण ते इगतपुरी दरम्यान मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा हे रविवार ता 4 फेब्रुवारी 2018 ला पाहणी दौरा करणार असून या दौऱ्यात काही प्रवासी संघटनांनाही ते भेटणार आहेत. मात्र त्यांचा संघटनांना दिलेला वेळ पाहता समस्या काही मांडता न येणार नसल्याने कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटनेने...