एकूण 146 परिणाम
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : मलेरिया या दुर्धर आजाराने आत्तापर्यंत अनेकजण ग्रस्त असतील. अशा लोकांना या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणतीही प्रतिबंधक लस उपलब्ध नव्हती. परिणामी अनेक मलेरियाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आता या आजारावर जगातील पहिली लस आणली आहे. आफ्रिकेत ही लस उपलब्ध करून देण्यात आली. आफ्रिकेतील...
मार्च 24, 2019
नागपूर - मनपाचा आरोग्य विभाग स्वाइन फ्लू प्रतिबंधाबाबत सुस्त आहे. मनपाच्या एकाही हेल्थपोस्टमध्ये गर्भवतींना स्वाइन फ्लूचे लसीकरण होत नाही. विशेष म्हणजे नागपूर विभागात २४१ स्वाइन फ्लू बाधितांपैकी १७१ लागणग्रस्त नागपुरात आहेत. त्या तुलनेत एकूण २२ मृत्यूंमध्ये १३ मृत्यू नागपूर शहरातील असूनही...
मार्च 14, 2019
सन २०१२-१३ चा गुणवंत अधिकारी/कर्मचारी हा पुरस्कार माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रला मिळाला. वरिष्ठ व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, पती डॉ. संतोष शिंदे यांची शांत, संयमी, प्रेमळ साथ; आई-वडिलांचा, सासूबाईंचा आशीर्वादाचा हात, हे माझ्या कारकिर्दीचे खंबीर आधारस्तंभ आहेत. कमी दिवसांतला व कमी...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - पशुगणनेचे काम लवकर व्हावे यासाठी यावर्षी पशुप्रगणकांच्या हाती टॅब दिले आहेत. पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आहे. यामुळे पशुगणनेच्या कामाचे वांधे झाले आहेत.  या महिनाअखेरपर्यंत पशुगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र आतापर्यंत फक्‍त व्हिलेज मॅपिंगचे शंभर टक्‍के काम झाले असले तरी प्रत्यक्षात...
मार्च 11, 2019
पुणे - शासनातर्फे राबविण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेत रविवारी पुणे शहरात 2 लाख 36 हजार 731 बालकांना लस देण्यात आली. पुणे महापालिकेतर्फे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकार यांच्या हस्ते कै. कलावती मावळे रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव, डॉ....
मार्च 07, 2019
मुंबई - राज्यात दहा मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, सुमारे एक कोटी 22 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यभर 82 हजार 719 पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. 0 ते 5 वर्षे वयोगटांतील सर्व मुला-मुलींना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - शहरात भटक्‍या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयांत गेल्या १५ दिवसांपासून ॲन्टी रेबीज लस उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयातून ती घेण्यासाठी १५ हजारांचा भुर्दंड भरावा लागतो. शहरात ७५ हजार भटकी कुत्री आहेत. रात्रीच्या वेळी...
फेब्रुवारी 21, 2019
पुणे : ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव अशी लक्षणे असल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे जा. ही सामान्य फ्लूप्रमाणेच स्वाइन फ्लूचीही लक्षणे असल्याने डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे; तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भवती अशा जोखमीच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - हवामानातील बदलामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून, आतापर्यंत 145 रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्‍मीर या राज्यांतही या आजाराने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या आजारावरील प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सर्वेक्षण, निदान, उपचार,...
फेब्रुवारी 14, 2019
भवानीनगर - सरकारी दवाखान्यातील सेवा अधिक बळकट करून गावातच रुग्णांना आरोग्याच्या सेवा अधिकाधिक पोचविण्यासाठी जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. मात्र, जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण जिल्हाच ‘आरोग्यवर्धिनी’...
जानेवारी 29, 2019
अलीकडच्या काळात विशेषतः गेल्या पाच-सहा वर्षांत देशातील वातावरण बिघडतेय. समाजात एक प्रकारची असहिष्णुता पसरवली जात आहे. पण, या कठीण प्रसंगातही देशातील जनता विविधतेतून एकतेचे सूत्र जोपासत प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यास सक्षम आहे. माझे एक डॉक्‍टर मित्र आहेत. त्यांच्याशी सामाजिक सौहार्द या विषयावर चर्चा...
जानेवारी 25, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेतील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) मेअखेर पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे आरोग्य सेवेचे आयुक्त अनुपकुमार यादव यांनी गुरुवारी (ता. 24) स्पष्ट केले. त्यांनी तासभर केलेल्या पाहणीत रुग्णांशी संवाद साधत प्रसूती, एनबीएसयू, ओपीडी, औषधी व रुग्णालयातील...
जानेवारी 24, 2019
पुणे - गोवर आणि रुबेला (एमआर) याची लस आता महापालिकेने खासगी दवाखान्यांमधूनही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शाळेत आणि महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ही लस न घेतलेल्या मुला-मुलींसाठी हा तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.  शहरात २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले....
जानेवारी 16, 2019
खामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ७९  हजार ६४६ बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली. दरम्यान, अद्याप ५९ हजार ६०३ बालकांचे लसीकरण बाकी आहे. मालेगाव तालुक्यात १, ०९, ९४६ व त्या खालोखाल बागलाण तालुक्यात १,०१, ७६८ ...
जानेवारी 15, 2019
सातारा - जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आजवर सहा लाख ७७ हजार ६६६ मुलांना लसीकरण केले आहे. आता ५५ हजार ९०४ मुलांना लसीकरण करणे बाकी असून, त्यात प्राधान्याने सातारा शहर, महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील काही भागातील मुलांचा समावेश आहे. देशभरात गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ...
जानेवारी 14, 2019
पुणे - पुण्यातील गोवर-रुबेलाचे लसीकरण सुरक्षित झाले असून, काही मुले घाबरल्याने त्यांना ‘रिॲक्‍शन’ आली असेल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी बैठकीत व्यक्त केली. या रिॲक्‍शनमध्ये गंभीर असे काही नव्हते, यावरही त्यांनी शिक्कामोर्बत केले.  पुण्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी...
जानेवारी 10, 2019
नवी मुंबई - बहुप्रतीक्षित महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नवी मुंबईतील हे पहिलेच अत्याधुनिक पशुरुग्णालय असेल.  पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने शहरातील भटक्‍या आणि पाळीव प्राण्यांवर वैद्यकीय उपचार...
जानेवारी 07, 2019
नवी मुंबई - अपंगत्व, शारीरिक व्यंग यांसारख्या आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठीच्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला नवी मुंबईत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरात अवघ्या तीन महिन्यांत सुमारे साडे पाच लाख मुलांना ही लस टोचण्यात आली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेने केंद्र आणि राज्य सरकारमार्फत...
जानेवारी 03, 2019
येवला - गोवर-रुबेला (एमआर) लसीकरणाबाबत विविध ठिकाणी गैरसमज असतानाच ही लस घेतल्यानंतर आठ दिवसांनी त्रास होऊन आठवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे. अंदरसूल येथे हा प्रकार घडला असून, आरोग्याधिकाऱ्यांनी मात्र लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली....