एकूण 22 परिणाम
February 17, 2021
नवी दिल्ली : सिंघु बॉर्डरवर एका आंदोलकाच्या हल्ल्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील एका SHO ला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हरप्रीत सिंह नावाच्या एका आंदोलकाने एका पोलिस कर्मचाऱ्याची कार बळजबरीने हिसकावून पळून जात होता. जेंव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला तेंव्हा मुकरबा चौकाच्या जवळ...
February 16, 2021
मुंबई: माझ्या कोणत्याही ट्विटमुळे  हिंसाचार झालेला नाही आणि त्यातून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी हेतू सिद्ध होत नाही, असा दावा मुंबई उच्च न्यायालयात अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वतीने सोमवारी करण्यात आला. वांद्रे न्यायालयाने कंगनाच्या काही ट्विट विरोधात फौजदारी फिर्याद नोंदविण्याचे आणि चौकशी...
February 12, 2021
नवी दिल्ली : बंगालमध्ये येत्या काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सध्याचे राजकीय वातावरण अगदी गरमागरम आहे. या निवडणुकीत कशाही प्रकारे आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक आमदारांनी यापूर्वीच...
February 09, 2021
राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसलं. अनेकदा त्यांना पाणी प्यावं लागलं. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-...
February 09, 2021
नवी दिल्ली- २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर्स निर्धारित मार्ग सोडून दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले होते. यावेळी अनेक आंदोलकांनी धुसघूस घातला होता....
February 03, 2021
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने प्रजासत्ताक दिनादिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या तपासाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना सरकारसमोर आपलं मत नोंदवण्यास सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेत या प्रकरणाच्या तपासासह सुप्रीम...
January 29, 2021
मुंबई  : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशात वाढता पाठिंबा मिळत होता. त्यामुळे मोदी सरकारनेच जाणून-बुजून आंदोलनाला हिंसक वळण दिले. हिंसेचे हे सर्व षड्यंत्र मोदी सरकारचेच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar)  यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे  प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील...
January 28, 2021
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर परेडमध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यात संघर्षाचं वातावरण पहायला मिळालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुरुवारी सिव्हील लाईनच्या तीरथराम शाह हॉस्पिटल आणि सुश्रुत ट्रॉमा...
January 26, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आजच्या 62व्या दिवशी थोडे हिंसक वळण लागले. इतक्या दिवसांच्या आंदोलनानंतरही त्यावर तोडगा निघत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांची नियोजित  'किसान गणतंत्र परेड'  अर्थात ट्रॅक्टर परेड मार्ग बदलून दिल्ली शहरात घुसली. पोलिसांनी हे...
January 22, 2021
चेन्नई - दक्षिणेकडील राज्यांमध्ये हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी गर्भवती हत्तीणीचा तोंडात फटाके फुटल्यानं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता माणसाच्या क्रूरतेचा कळस असलेली आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तामिळनाडुतील निलगिरी इथं एका व्यक्तीने पेटती टायर हत्तीवर फेकली होती....
January 09, 2021
नवी दिल्ली : शुक्रवारी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हिंसेला चिथावणी देणारी वक्तव्ये होण्याची जोखीम असल्याकारणाने ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. @realDonaldTrump अकाऊंटवरील ट्वीट्सच्या संदर्भांना पाहिलं गेलं...
January 08, 2021
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या कॅपिटलवर बुधवारी झालेल्या हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी म्हटलंय की, सर्व अमेरिकेन नागरिकांप्रमाणेच मी देखील हिंसा, अराजकता आणि झालेल्या झटापटीवर नाराज आहे. इमारतीला सुरक्षित करण्यासाठी आणि घुसखोरांना बाहेर...
January 07, 2021
1) Breaking News : ट्रम्प समर्थकांकडून US Capitol मध्ये तोडफोड; अभुतपूर्व असा गोंधळ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी...
January 07, 2021
नवी दिल्ली : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर सुरु असलेला वितंडवाद आज टोकाला गेलेला पहायला मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक...
January 07, 2021
वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर अद्यापही वितंडवाद सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर...
January 03, 2021
चेन्नई- तमिळनाडूमध्ये यावर्षी एप्रिल-मे मध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अभिनयातून राजकारणात आलेले कमल हासन सध्या चर्चेत आहेत. याचदरम्यान टि्वटरवरील त्यांच्या एका पोस्टवरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याबाबत...
December 12, 2020
बंगळुरु- बंगळुरु जवळील आयफोनचे उत्पादन करण्याऱ्या कंपनीत संतप्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने वेतन कपात केल्यामुळे तोडफोड केली. हे कर्मचारी विस्ट्रॉन कॉर्पोरेशनसाठी काम करतात. या कंपनीचे तैवान येथे मुख्यालय आहे. पोलिसांनी दिलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील नरसापुरा...
December 10, 2020
मुंबई - एकीकडे जाहिरांतीमध्ये महिलांपेक्षा पुरुषांना दिले जाणारं झुकते माप , त्याशिवाय त्या जाहिरातीतून महिलांवर केली जाणारी शेलकी टिप्पणी यामुळे त्या जाहिरातीवर टीका केली जाते. आता अशाच एका जाहिरातीवर महिला अभिनेत्रीनं परखड मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे सबंधित जाहिरातीमध्ये महिलेवर नव्हे तर...
December 03, 2020
भोपाळ- मी निर्णय घेतला आहे की राज्यात शेतकरी जितके उत्पादन घेतील, तितका माल विकत घेतला जाईल. पण, अन्य राज्यातून कोणी येथे आपला शेतमाल विकायला आला, आजूबाजूच्या राज्यातून येऊन येथे कोणी माल विकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा ट्रक जप्त करण्यात येईल आणि संबंधितांना अटक करण्यात येईल, असं मध्य प्रदेशचे...
November 28, 2020
मुंबई - शहरातील वांद्रे परिसरातील कराची बेकरीच्या नावाला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. स्थानिक मनसे नेत्यानेही बेकरीच्या मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीशीला बेकरीच्या मालकाने उत्तर दिले आहे.  हेही वाचा - आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही पण...